खीमा भरलेल्या मिरच्या

Submitted by रायगड on 6 March, 2013 - 12:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मटण अथवा चिकन खीमा, सिमला मिरच्या अथवा अनाहेम पेप्पर्स, कांदे, आलं-लसूण, टोमॅटो, ग. मसाला, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

चिकन अथवा मटणाचा नेहेमीप्रमाणे खीमा बनवून घ्या. मात्र खीमा झाल्यावर तो घट्ट/दाट बनवण्यासाठी कढईत परतून घ्यावा.
मिरच्यांच्या वरून गोल कापून आतील बिया वगैरे काढून खीमा (दाबून) भरून घ्यायचा. नी ३७५-४०० F ला २० मिनीटे मिरच्या ट्रेवर ठेऊन, oil spray मारून oven मध्ये भाजून घ्यायच्या.

झाल्या मिरच्या तयार!

StuffedPeppers.jpg

अधिक टिपा: 

यामध्ये खीमा झाल्यावर त्यात उकडलेले बटाटे कुस्करून घालून मग कढईत परतून घेऊ शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
Group content visibility: 
Public - accessible to all site users

rmd -- विपु बघ. इथे बडबड करायला काढली तर त्या रायगडाला जाग येऊन मारायची Happy

आम्ही तिथे आलो की या अशा रेसिपीज कुठे जातात याचा विचार करतीये.>>>> मी पण सेम विचार करते आहे Proud

आम्ही तिथे आलो की या अशा रेसिपीज कुठे जातात याचा विचार करतीये.
>> अहो मामी आम्ही तर इथेच असतो तरी दिसत नाहीत..... जौंद्या झालं

चांगल्या भाजल्या गेल्यात.
आम्ही गोल नाही, उभ्या चिरतो(lengthwise) आणि देठ ठेवतो. वरुन चीज घालू शकता. Happy

मस्त !
आमच्याकडे खिमा तयार झाला की, मिरच्यांमध्ये भरायच्या आतच त्याचा खिमा होतो, त्याला पर्याय सांगा बरं Proud

अरेरे. मस्त पैकी खिमा बनवायचा आणि मग त्या उग्रास सिमला मिरच्यांमधे कशाला भरायचा. पाव आणुन मस्त ताव मारायचा. हलके घ्या. Happy

मी बटाटयाच सारण भरून करते मिरच्या. बसल्या बसल्या संपतात. त्याची कृती खालील प्रमाणे
मिरच्यांना मध्ये छेद देऊन बिया काढून टाकायच्या मग त्यात उकडलेला बटाटा, हळद, मीठ, आल - लसुन पेस्ट, थोडस हिंग आणि जरासा लिंबाचा रस याचं मिश्रण भरायचं. मग तुमच्या आवडीप्रमाणे नुसत्या शाल्लो फ्राय किंवा बेसन पिठात घोळून भाजीसारख तळा.