शिंपला केक - मॅडेलिन्स/ (Madeleines)

Submitted by लाजो on 5 March, 2013 - 22:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दीड कप मैदा
३ अंडी
१ कप साखर
३/४ कप बटर
अर्धा टीस्पून बेकिंग पावडर
चिमुटभर मिठ

Med_04.JPG

१ लिंबाची किसलेली साल किंवा व्हॅनिला इसेन्स

क्रमवार पाककृती: 

१. ओव्हन १८० डिग्री सेंटिग्रेड्ला तापत ठेवा.

२. मेडॅलिन पॅन्स ना बटर्/ऑइल स्प्रे मारुन तयार ठेवा.

३. एका बोल मधे अंडी, साखर आणि मिठ फेटा... मिश्रण हलके आणि पांढरे दिसेपर्यंत फेटा.

४. एकीकडे बटर पातळ करुन घ्या.

५. अंड्याच्या फेटलेल्या मिश्रणात चाळलेला मैदा, कोमट असलेले पातळ बटर आणि लिंबाची किसलेली साल / व्हॅनिला इसेन्स घाला आणि नीट मिसळून घ्या.

६. हे वरचे मिश्रण तयार मेडॅलिअन पॅन्स मधे टेबलस्पून ने घाला आणि ओव्हनमधे बेक करायला ठेवा.

७. ८-१० मिनीटात मेडॅलिअन्स फुगतिल. हलका गोल्डन ब्राऊन रंग आला की पॅन लगेच बाहेर काढा कारण पॅन बाहेर काढला तरी मेडॅलिअन्स आत शिजत असतात.

Med_01.JPG

८. ५ मिनिटांनी मेडॅलिअन्स पॅन मधुन काढुन वायर रॅकवर काढा.

९. पूर्ण थंड झाल्याअवर मेडॅलिन्स वर पिठीसाखर भुरभुरा.

Med_03.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके. या प्रमाणात १८-२० मेडॅलिन्स होतात.
अधिक टिपा: 

- मेडॅलिन्स चा पॅन नसेल तर छोट्या पॅटी पॅन्स / मिनी कपकेक पॅन मधे पण मेडॅलिन्स करता येतिल.

- आवडत असेल तर यात कोको पावडर घालुन चॉकलेट मेडॅलिअन्स बनवता येतिल.

Med_Choc1.JPG

- तयार मेडॅलिअन्सचा अर्धा भाग मेल्टेड डार्क्/व्हाईट चॉकलेट मधे डिप करुन चॉक कोटेड मेडॅलिअन्स बनवता येतिल.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसीपी लाजो, नक्की करुन बघेन Happy
पण एक शंका," मिश्रण हलके आणि पांढरे दिसेपर्यंत फेटा." म्ह्णजे कुठली स्टेज? रिबिन स्टेज का?
ह्यात एग यलो पण आहे म्हणजे तो पिवळा रंग पुर्ण जाऊन पांढरं दिसे पर्यंत फेटायचं का?

रचु,

ह्यात एग यलो पण आहे म्हणजे तो पिवळा रंग पुर्ण जाऊन पांढरं दिसे पर्यंत फेटायचं का? <<< अगदी हलके पांढरे म्हणजे साधारण बेज कलर. फार फेटायचे नाही.

मस्त, माझ्या मुलीला खुप आवडतात मॅडेलाईन्स, मिनी कपकेक पॅनमधे बनवले तरी सेमच वेळ ओव्हनमध्ये ठेवायचं कां?

Pages