Submitted by कुमार१ on 5 March, 2013 - 04:54
गावांच्या नावांचा इतिहास वा व्युत्पत्ती इथे लिहावी.जगातील कुठलीही गावे चालतील.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'पळ्ळी' म्हणजे गाव.म्हणून तो
'पळ्ळी' म्हणजे गाव.म्हणून तो शब्द गावांच्या नावात येतो.>> कानडी-तेलुगु-तमिळमधे बर्याचदा ह चा प आणि प चा ह होताना दिसतो. कानडीमधे हळ्ळी म्हणजे गाव.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अच्छा, हीरा..मी नीट वाचलेच
अच्छा, हीरा..मी नीट वाचलेच नाही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रयत्न करते हे शोधायचा.. 'वल्ली' कदाचित संस्कृतमधून आलेलं असू शकेल. गोव्यात नेत्रावळी,सांकवाळ या गावांची पूर्वीची नावे 'नेत्रवल्ली','शंखवल्ली' सांगतात..
<<कानडीमधे हळ्ळी म्हणजे गाव>>
हो.गोव्यातील कुंकळ्ळी गावाच्या नावाची व्युत्पत्ती अशीच सांगतात. 'कुंकहळ्ळी' चे नंतर कुंकळ्ळी झाले. जिथे कुंकवाचे उत्पादन होते ते कुंकहळ्ळी..नंतर पोर्तुगीजांनी त्याचे 'कुकोळीम' केले.
उदगीर ह्या शहराच्या नावामागील
उदगीर ह्या शहराच्या नावामागील अनेक (दंत)कथा आहेत. त्यापैकी काही:
- १२२८ च्या शिलालेखानुसार बालाघाट डोंगररांगाच्या पुर्वेकडील उदयगिरी डोंगरावरुन उदगीर हे नाव पडले.
- करबसव पोथीनुसार कृतयुगातील उदलिंग ऋषींच्या नावाने तेथील वस्तीस उदगीर असे नाव पडले.
- अजुन एका दंतकथेप्रमाणे या शहराचा संबंध महाभारताशी जोडला जातो. उद्दालक ऋषींच्या मुळे उदगीर हे नाव पडले असावे.
- श्रद्धेनुसार, उदागीर महाराजांच्या वास्तव्यामुळे आणि त्यांच्या किल्ल्यातील समाधीमुळे उदगीर हे नाव रुढ झाले. लोकमानसात 'उदागीर बाबांचे उदगीर' असेच समीकरण पक्के बसले आहे.
- वि.का. राजवाडे यांच्या अभ्यासाप्रमाणे दोन शक्यता आहेत. उद्दालक वनस्पतीच्या नावावरुन उदगीर हे नाव रुढ झाले असावे. उद्दालक म्हणजे भोकर नवाची वनस्पती. ह्या वनस्पतीवरुन हमराठवाड्यात भोकर (जि. नांदेड) तसेच उदळी, उधलोर ही खानदेशातील गावे आहेतच. ही वनस्पती ह्य भागात मुबलक प्रमाणात होती का याचा पुरावा नाही.
- वि.का. राजवाडे यांच्या नुसार उदक-गिरी ह्या वरुन उदगीर हे नाव पडले असावे. येथील डोंगराला पाण्याचे झरे होते. म्हणुन उदक गिरी आणि त्यावरुन उदगीर.
(संदर्भ आणि अधिक माहितीसाठी: 'उदगीरचा इतिहास' हे पुस्तक)
@ हडपसर - हाडं पसर. आधी असं
@ हडपसर - हाडं पसर. आधी असं म्हणल्यानंतर मला कोणीतरी खोडसाळपणा केलाय असं वाटायचं. पण नंतर कळालं की, मगरपट्ट्याच्या समोर खरोखरीच १ मोठं स्मशान होतं (आमच्या जुन्या कंपनीचं तिथे ऑफिस बांधताना बरेच हाडांचे सांगाडे सापडले होते). पण ह्यावरुनच नावं पडलयं का, ते माहित नाही.
तत्कालिन निजामशाहीतील एक
तत्कालिन निजामशाहीतील एक महत्वाचे शहर असलेल्या उस्मानाबादचे मुळ नाव धारापूर अथवा धाराशिव होते. १९१० मध्ये निजाम मीर उस्मानअलीखाँ याने आपल्या राज्यारोहणप्रसंगी शहरास स्वतःचे नाव दिले. तेव्हापासून शहर उस्मानाबाद नावाने ओळखले जाऊ लागले. हैदराबाद संस्थानाच्या विभागणीनंतर १९५६मध्ये उस्मानाबाद महाराष्ट्रात आले .
अगासी/अगाशी म्हणजे मोकळी
अगासी/अगाशी म्हणजे मोकळी (छप्पर नसलेली) चुनागच्ची किंवा नुसतीच मोकळी जागा. कदाचित 'आकाश' या संस्कृत शब्दावरून आलेला हा शब्द. याची अनेक रूपान्तरे आहेत. आगाशी. आगशी, आकशी,आक्शी, आक्षी, अक्षी, आक्सी, अक्सा वगैरे. अशा जागा बहुधा समुद्रकिनार्यानजीक असतात. म्हणून ही गावेही जास्त करून समुद्रकिनार्यालगत असतात.
संस्कृतमध्ये वापी म्हणजे
संस्कृतमध्ये वापी म्हणजे विहीर किंवा पुष्करिणी. त्यावरून वापी, वावी, बावी, बाव, बावधन, कुंभारबाव, मीठबाव, दहीबाव, पोयबावडी, वगैरे नावे आली आहेत.
पुष्करिणी वरून पोखरण.
फळ-फूल-वृक्षांवरून आंबें, आंबवणें, आंबेगाव, जोगाईचें आंबें (आंबेजोगाई-अलीकडील अंबाजोगाई ) ,अंबड,आंबेडे वगैरे.
वडगाव,(शेरी,धायरी,खुर्द वगैरे), वटोदरा (बडोदा), वडघर, वडखळ,वडाळे वगैरे. पिंपळगाव (निलये,बसवंत वगैरे),राजपिपला,पिपलाया,वगैरे.
चिंचणी, चिंचवली, चिंच बंदर, चिंचपोकळी,चीचपल्ली
हीरा, वटोदरा = वट + उदर हे
हीरा,
वटोदरा = वट + उदर हे मलाही सुचलं होतं. पण अंदाजपंचे वाटेल म्हणून लिहिलं नाही!
थोडं शोधलं तर या नावास पुष्टी देणारी गोष्ट सापडली. ती म्हणजे शहरात खूप वटवृक्ष आहेत.
आ.न.,
-गा.पै.
थँक्यु अशोक..मला खरच माहित
थँक्यु अशोक..मला खरच माहित नव्हतं........:)
माझ्या वडील ज्या कंपनीत काम करत त्या गावाचे नाव मिर्या. याची आख्यायिका अशी सांगतात की हनुमान जेव्हा संजीवनीसाठी द्रोणागिरी पर्वत घेऊन लंकेकडे निघाला होता, तेव्हा त्यातला एक मिरीएवढा तुकडा खाली पडला, तेच हे मिर्या. (आता हनुमान इथे पश्चिम दिशेकडे अरबी समुद्राकडे का आला वगैरे मला माहित नाही हां) >>>>>नंदिनी >>>> मुंबई च्या भाउच्या धक्क्या वरुन अरबी समुद्रातुन बोटिने रेवस बंदरावर जाताना मधे उरण गावचा डोंगर दिसतो...त्यास द्रोणागिरी म्हणतात......त्याची पण सेम स्टोरी.......
मला वाटते 'द्रोणगिरी' हे नाव
मला वाटते 'द्रोणगिरी' हे नाव अगदी अलीकडचे असावे. नवी मुंबई स्थापन झाल्यावर त्यातल्या एका नोडला द्रोणगिरी नाव दिले आहे. आता हे नाव त्या डोंगरावरूनच दिले किंवा कसे ते मात्र ठाऊक नाही. आय. एन. एस.. द्रोणगिरि हे भारतीय नौसेनेच्या एका युद्धनौकेचेही नाव आहे.
आता हे नाव त्या डोंगरावरूनच
आता हे नाव त्या डोंगरावरूनच दिले किंवा कसे ते मात्र ठाऊक नाही>> त्या डोंगरावरूनच दिले. अनिष्काच्या पोस्टनंतर मला पण ती स्टोरी आठवली. मी आधी काम करत होते त्या कंपनीचे साईट ऑफिस द्रोणागिरीलाच होते.
१. "बेळगांव महानगरपालिके' वर
१. "बेळगांव महानगरपालिके' वर महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा फडकल्याने हे गाव परत दोन्ही राज्यात चर्चेला आले आहे.
या निमित्ताने 'बेळगांव' नामाची व्युत्पत्ती+अर्थ.
कन्नड जनता हे गाव आपले आहे म्हणून त्याला 'बेलगावी' असे म्हणतात तर मराठा समाज 'बेळगांव', तर सरकारी दप्तरी नोंद आहे ती 'बेलगाम'... Belagaum. एकदोन वर्षापूर्वी कर्नाटक सरकारने हट्टाने गॅझेटमध्ये या गावाचे नामकरण Belagaavi असे केले. या बदलाला केन्द्र सरकारने स्पष्ट नकार दिल्याने बदल प्रकार थांबला आहे.
"बेळगाव" चा संस्कृतमध्ये उच्चार होतो 'वेलुग्राम' = म्हणजेच बांबूची नगरी. या वेलूवरून बेलू अन् बेलूवरून बेल...बेळगाव असे रुपांतर झाले असे मानले जाते.
२. हुबळी = बंगलोर आणि म्हैसूर नंतर कर्नाटक राज्यातील हे तिसरे मोठे शहर [हुबळी-धारवाड अशी संयुक्त महापालिका आहे]. हुबळीचा कन्नड उच्चार होतो "हुब्बाली...'. यातील 'हु' म्हणजे वृक्ष आणि ब्बाली म्हणजे वेल. झाडाला चिकटलेली वेल म्हणजेच एका अतुट नात्याचे प्रतिक म्हणून हुब्बाली.
आय.टी. मध्ये आज महाराष्ट्रात जे पुण्याला स्थान महत्व प्राप्त झाले आहे, तितके हुबळीला मिळावे असे सध्या प्रयत्न चालू आहेत. शहर सुंदरच आहे.
अशोक पाटील
'हु' म्हणजे वृक्ष >>
'हु' म्हणजे वृक्ष >> अशोककाका, हू म्हणजे फूल.
हुबळी आधीपासूनच उद्योगधंद्याचे शहर आहेच, टाटा, थम्सप अशा कितीतरी कंपन्या आहेत तिथे. आयटीसाठी हुबळीच नव्हे तर हुबळी ते बेळगांव हा पूर्ण पट्टा विकसित करण्याचे सरकारचे धोरण आहे. या धोरणावर आम्ही खास लक्ष ठेवून आहोत; कित्तूर आणि एमकेहुबळीमधे पडीक शेती आहे!!
"...हू म्हणजे
"...हू म्हणजे फूल...."
नंदिनी.... अरेच्या, ती माहिती लिहिण्यापूर्वी हुबळीत असलेल्या बहिणीला आणि तिथेच शिक्षण पूर्ण केलेल्या भाचीला त्याबद्दल विचारले होते ना !! भाचीच म्हणाली, "मामा, हु म्हणजे झाड आणि बल्ली - वेल.... Creeping Flower kind..." ~ झाडाला लगटलेली वेल...अशा अर्थाने.
वेल....चला, फूल तर फूल...निदान वृक्ष, फूल, वेल, पाने...सारे काही एकाच फॅमिलीतील आहेत हेही चांगलेच.
बाकी.... हुबळी आयटीसाठी बिग हब होत आहे हे चांगलेच आहे म्हणा.
अशोककाका, मी शुअर आहे या
अशोककाका, मी शुअर आहे या बाबतीत. हू म्हणजे फूलच. बर्याचशा देवळांमधे हूविन पूजा म्हणून एक पूजेचा प्रकार देखील असतो. ऑनलाईन डिक्शनरीमधे पण तोच अर्थ दिलाय, एक कानडी सिनेमा देखील येऊन गेलाय हू नावाचा.
मी याच धाग्यावर आधी लिहिलं तसं तमिळ-तूळू-कानडीमधे ह आणि प ची अदलबदल झालेली दिसते. म्हणून तूळू आणि तमिळमधे फुलांना "पू" म्हणतात.
झाडाला समानार्थी म्हणून कानडीमधे कुठे हू वापरत असतील तर खरंच माहित नाही.
गूगलभाऊंनी हा एक मजेदार समस शोधून दिला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Englishnalli neenu flower.
Kannadadalli neenu hoo.
Sanskritadalli neenu pushpa.
Ishtella aadaru Hindiyalli maathra neenu fool!
जॅकी चॅनचा चित्रपट आठवला "हू
जॅकी चॅनचा चित्रपट आठवला "हू अॅम आय ?"![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Englishnalli neenu
Englishnalli neenu flower.
Kannadadalli neenu hoo.
Sanskritadalli neenu pushpa.
Ishtella aadaru Hindiyalli maathra neenu fool! >>+११००००
हु म्हणजे फूल. १००%....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अच्छा नंदिनीबाबा.... तुम जिती
अच्छा नंदिनीबाबा.... तुम जिती मै हारा !!
आत्ता वरची 'हु' ची चर्चा + तो गुगलभाऊचा समस...दोन्ही रजनीकडे [हुबळीची भाची] पाठवून देतो....मग ती स्वतःच चेन्नईत तुमच्या दारात उभी राहील आणि मग रंगू दे तुम्हा दोघींचे 'तू तू मै मै....!'
अशोक पाटील
अशोककाका, कैतरी काय हो??
अशोककाका, कैतरी काय हो?? तुमच्याइतका व्यासंग नाही हो माझा. पण कानडी ही मातृभाषा असल्याने (आणि मंगळूरात दीड वर्षे काढल्याने) इतके खात्रीशीर रीत्या सांगू शकते.
रजनी हुबळीत कुठे असते? मी जूनमधे जातेच आहे धारवाडला तेव्हा भेटेन
"हुब्बाली...'. यातील 'हु' म्हणजे वृक्ष आणि ब्बाली म्हणजे वेल. झाडाला चिकटलेली वेल म्हणजेच एका अतुट नात्याचे प्रतिक म्हणून हुब्बाली.>>> आता अर्थ काढल्यास हुब्बाल्ली चा अर्थ फुलांनी डवरलेली वेल असा निघू शकेल.
कोल्हापूर जिल्ह्यात "पुंगाव'
कोल्हापूर जिल्ह्यात "पुंगाव' नावाचे गाव आहे
"पुंस्' म्हणजे "पुरुष' यावरून "पुंगाव" म्हणजे "पुरुषांचे गाव'
निघतो का? तसा तो निघत असेल तर ते नाव का पडले याची माहिती काढावी लागेल.
कोल्हापूरकरांना काही माहिती आहे का?
यावरून मला एक सुचवावेसे
यावरून मला एक सुचवावेसे वाटते.
आता कोल्हापूरकरांना "पुंगाव' विषयी जेवढे कुतूहल वाटेल तेवढे पुण्याच्या व्यक्तीला वाटेल असे नाही त्यामुळे मला वाटते "कोल्हापूर जिल्ह्यातील गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास'' असा धागा काढणे उचित होईल. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यासाठी केले तर ते योग्य ठरेल. कर्नाटकातील गावे असाही स्वतंत्र धागा काढता येईल. कारण तेथे कानडी-मराठी अशा दोन्हीही भाषा अवगत असणाऱ्यांना जास्त रुची वाटेल.
तरी सर्वांनी माझ्या सूचनेचा जरूर विचार करावा. म्हणजे विस्कळीत स्वरूपात संकलन होणार नाही.
अविनाश , सूचना चांगली आहे.
अविनाश , सूचना चांगली आहे.
धाग्याची व्याप्ती वाढवून
धाग्याची व्याप्ती वाढवून थोडे एका राज्याबद्दल लिहीतो. 'झारखंड ' चे २ अर्थ आहेत. १) जंगलांचा प्रदेश , २) सोन्याचा तुकडा ( संथाल भाषा)
'प्लासी' : या गावाजवळ पळसाची
'प्लासी' : या गावाजवळ पळसाची खूप वने होती त्यावरून नाव पडले.
येडे-मच्छिंद्र - सांगली,
येडे-मच्छिंद्र - सांगली, वाळवा - अशी एक आख्यायिका सांगितली जाते कि.. मच्छिंद्रनाथ हे आपल्या प्रवासादरम्यान एका गावाच्या तळया जवळून जात होते त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या जवळील सोन्याची विट त्या तळ्यात टाकली आणि अश्या प्रकारे विट टाकणाऱ्या नाथांना लोक वेडे ( येडे-मछिंन्द्र ) बोलू लागले. यावरून गावाचं नाव येडे-मछिंन्द्र पडले. या गावाच्या अगदी जवळच असणाऱ्या गडावरती मछिंन्द्र नाथांनी समाधी घेतली आहे जो आता किल्ले-मछिंन्द्र या नावाने ओळखला जातो. तसेच शिवकालीन तोफा इ. इ आहेत. सातारच्या प्रति/पत्री सरकार चे निर्माते आणि थोर स्वातंत्र्य संग्रामी क्रांतिसिंह नाना पाटील यांची हीच जन्मभूमी.
गुगल मॅप वरती पहा : http://goo.gl/mW1Gz
manjifera, माझ्या
manjifera,
माझ्या माहितीप्रमाणे मच्छिंद्रनाथांची सोन्याची वीट गोरक्षनाथांनी फेकून दिली होती. हे ठिकाण गर्भगिरी डोंगरापाशी आहे. हा डोंगर नगर जिल्ह्यात आहे.
याची सांगलीजवळच्या गावाशी संगती कशी लावायची? धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
Sangamner- Sangam of Pravara,
Sangamner- Sangam of Pravara, Mhalungi & Adhala
एमके हुबळी म्हणजे मुगुटखान
एमके हुबळी म्हणजे मुगुटखान हुबळी ना? हे नाव कसे पडले असेल?
एमके हुबळी म्हणजे मुगुटखान
एमके हुबळी म्हणजे मुगुटखान हुबळी ना?<<< हो. नाव कसे पडले असेल ते मात्र माहित नाही. इथे नदीकाठी एक सुंदर नरसिंहाचे देऊळ आहे. त्या देवळांत बर्याचदा गेलेय मी.
Hello All ! ! ! ! I'm from
Hello All ! ! ! !
I'm from Delhi ( known as Dilli ).
Mahabharata times known as Indraprastha & Hastinapur.
This city basically got much much later on established by the great Prithviraj Chauhan from Rajasthan, known at that time as " Pithaura Garh ". Was a single group of seven different small villages.
Its also a hidden delta on the river bank of Yamuna, may have got this Del-hi.
The adjacent city developed quite considerably now known as Gurgaon, was actually the city gifted in Mahabharata times by King Dhritarashtra to the Guru Dronacharya. Thus it is known as Guru-Gram, this gram became gaon & guru got converted in Gur, So it's Gurgaon now.
Pages