![paneer franky](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/12/16/paneer%20franky.jpg)
भाजी बनवण्यासाठी साहित्य
मध्यम आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो
लाल पिवळी हिरवी ढोबळी मिरची
गाजर, बिन्स मध्यम आकारात चिरून
फ्रोझन हिरवे मटार, मक्याचे दाणे प्रत्येकी साधारण वाटीभर
२०० ग्रॅम पनीर क्युब्ज्स कापून
भाज्या परतण्यासाठी तेल
आलं लसूण पेस्ट
मुठभर कोथिंबिर बारिक चिरून
हळद, हिंग, लाल तिखट, धणे जिरे पूड, मीरपूड, आमचूर पावडर, साखर
मोझेरेला चिझ बारिक किसलेले
बटर (ऐच्छीक)
रोल्स करिता
टॉर्टीयाज किंवा पोळ्या तयार वापरु शकता.
(माझ्या लेकाला आवडतात म्हणून मी टॉर्टीयाज घरी बनवते )
टॉर्टीयाज बनवण्यासाठी
२ कप ऑल पर्पज फ्लार (कणीक घेउ शकता)
१ १/२ टी स्पून बेकींग पावडर
१ टी स्पून मीठ
२टी स्पून तेल (व्हेजीटेबल ऑईल/ ऑलिव्ह ऑईल किंवा कुठलेही खाद्य तेल)
३/४ कप कोमट दुध
भाजी बनवण्या साठी
फ्राईंग पॅन मधे दोन टेबल्स्पून तेल टाकून तेल तापल्यावर त्यात बारिक चिरलेला कांदा, चिमुट्भर हळद हिंग घालून परतावे.
मग त्यावर रंगीत ढोबळ्यांचे तुकडे टाकावेत. (असे केल्याने कांद्या सोबत ढोबळी मिर्ची चे तुकडे चांगले परतून भाजले जातात. चव छान येते. नाहीतर नुसत्याच शिजल्या जातात. )
कांदा गुलाबीसर झाल्यावर गाजर आणि फरसबी चे तुकडे टाकून त्यावर बारिक चिरलेला टोमॅटो, एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकावी.
नंतर आवडी प्रमाणे कमी अधीक लाल तिखट, अंदाजाने जणे जिरे मिरी पावडर आणी चविप्रमाणे मीठ घालून मग परतून पॅनवर झाकन ठेउन भाजीला एक वाफ काढावी.
पनीर चे क्युब्ज टाकावेत. एक टि स्पून आमचूर पावडर आणि थोडीशी साखर घालून मिसळून पॅन ची आच बंद करावी. वरून मुठभर चिरलेली कोथिंबीर घालावी.
ही भाजी पटकन होते जास्त शिजवण्याची किंवा परतण्याची गरज नसते. थोडिशी क्रंची छान वाटते.
आता भाजी टॉर्टीया किंवा पोळी/ चपाती मध्ये भरून रोल्स बनवायचे.
टॉर्टीयाज बनवण्यासाठी
एका मोठ्या बोल मध्ये ऑल पर्पज फ्लार / कणीक घेउन त्यात मिठ बेकिंग पावडर, तेल टाकून चांगले मिक्स करा. मग त्यात हळूहळू लागेल तसे दुध टाकुन गोळा मळून घ्या. गोळा खूप कडक वाटत असेल तर आणखी थोडे दुध टाकुन पिठ चांगले मळून घ्या. मळलेले पिठ मउ असायला हवे. दहा मिनिटे झाकून ठेवा आणि मग हव्या त्या आकाराच्या गोल पोळ्या लाटून तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्या. त्यावर छान गोल्डन ब्राउन ठिपके आले की मस्त भाजल्या जातात. टॉर्टीयाज लाटताना शक्यतो पातळसर लाटाव्यात. कारण त्यात घातलेल्या बेकींग पावडर मुळे त्या दुप्पट फुगुन आणखी सॉफ्ट बनतात. ह्या टॉर्टीयाज ला तेल लावायला लागत नाही.
( नंतर फोटो टाकते)
आता रोल्स करण्यासाठी
टॉर्टीया ला बटर लाउन तव्यावर ठेवले त्यावर मध्यभागी भाजी घालून वर चिझ टाकले रोल करुन हलकेच गरम केले. रोल उघडू नये म्हणून टूथपिक टोचून देउ शकता. किंवा अॅल्युमिनियम फॉईल मध्ये रॅप करून देउ शकता.
सॅलड/ सेलेरी आणि आवडत्या लाल हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करायला तयार
भाजी ला किंवा पनीर ला झणझणीत पणा हवा असेल तर एक टेबल्स्पून गरम मसाला किंवा ऑल पर्पज किचन किंग मसाला घालावा.
नॉनव्हेज आवडत असेल तर पनीर ऐवजी कोलंबी किंवा चिकन चे तुकडे वापरुन बनवता येईल.
मुंबईतली ही फ्रॅन्की कोलकात्यात ह्याच प्रकारे व्हेजी किंवा पनीर कबाब टाकून काठी रोल्स बनवतात.
मस्त. जाहिरातीत बाबु किंवा
मस्त. जाहिरातीत बाबु किंवा अशोका काठी रोल्स पाहुन तोंडाला पाणी सुटते.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
सुरेख...
सुरेख...
धन्यवाद , हे मुलांना डब्यात
धन्यवाद , हे मुलांना डब्यात पण चांगले.
यम्मी. व्हाईट हाऊस,
यम्मी. व्हाईट हाऊस, हैद्राबादला अशक्य मस्त फ्रँकीज मिळतात. हे पाहून त्याचीच आठवण आली.
धन्यवाद !
धन्यवाद !
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहीये, फोटो अजून भारिये
सहीये, फोटो अजून भारिये![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
यम्मी
यम्मी
वां छान टॉर्टीयाज >>> हे पण
वां छान
टॉर्टीयाज >>> हे पण कसं बनवतात तेपण लिहा की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच..... तोंडाला पाणी
मस्तच..... तोंडाला पाणी सुटले...........
छान पदार्थ आणि छान फोटो.
छान पदार्थ आणि छान फोटो.
यम्मी! मस्त दिसत्येय फ्रँकी
यम्मी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसत्येय फ्रँकी
रेसिपी पण आवडेश
विकडे मधला एक डिनर मेन्यु फिक्स झला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खल्लास फोटो नक्की करुन
खल्लास फोटो
नक्की करुन बघणार.
टॉर्टिया फ्रेश आणि सॉफ्ट, स्पाँजी दिसत आहेत एकदम. प्लीज ते कसे करतेस ते ही लिही.
जल्ला माज्या प्रश्नाचा कोण
जल्ला माज्या प्रश्नाचा कोण उत्तर देणार हाय कां नाय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छान रोल्स आहेत.अजुन काहि नविन
छान रोल्स आहेत.अजुन काहि नविन पहाय्ल मिलाल तर बर होइल.
छान (माझ्या लेकाला आवडतात
छान
(माझ्या लेकाला आवडतात म्हणून मी टॉर्टीयाज घरी बनवते )> रेसिपी प्लीज
लज्जतदार फोटो आणि मस्त कृति.
लज्जतदार फोटो आणि मस्त कृति.
थँक्स ऑल जल्ला माज्या
थँक्स ऑल
जल्ला माज्या प्रश्नाचा कोण उत्तर देणार हाय कां नाय >>>
अॅडलंय बग हयसर वरच हा तुका टॉर्टियाज ची रेस्पी व्हई होती ना ? ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घेशिलच हां
तु केदार कित्याक आरडतंस रे.. वाईच रव..
केदारा
मस्त मस्त . टॉर्टियाज घरी
मस्त मस्त :). टॉर्टियाज घरी बनवण्यासाठी मी कृती शोधतच होते, बरे झाले दिलीस ते :).
बाय द वे, साहित्यात पनीर लिहिलं नाहीयेस ते अॅड करतेस का ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टॉर्टियाच्या कृतीबद्दल
टॉर्टियाच्या कृतीबद्दल धन्यवाद
वरच्या फोटोतल्या टॉर्टियात कणिक आहे का ? त्या फार मस्त दिसत आहेत.
संपदा पनीर खाल्लं लिहीताना
संपदा पनीर खाल्लं लिहीताना
बदल केलाय.
अगो नाही कणिक नाहीये. ऑप्फ्ला वापरलंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओके डॅफो. पुढच्या आठवड्यातले
ओके डॅफो. पुढच्या आठवड्यातले आमचेही एक मील पक्के झाले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहीच आहे फोटो. मला अचानक
सहीच आहे फोटो.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला अचानक टेक्सास गटग झालच पाहिजे असं तीव्रतेन वाटू लागलं आहे
फोटू एकदम लाळ गाळू
फोटू एकदम लाळ गाळू![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला अचानक टेक्सास गटग झालच
मला अचानक टेक्सास गटग झालच पाहिजे असं तीव्रतेन वाटू लागलं आहे >>> नक्की करुया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टॉर्टीयाच्या कृतीबद्दल
टॉर्टीयाच्या कृतीबद्दल धन्यवाद.
आजच करून पाहण्यात येईल.
मस्त! पाकृ आणि फोटो दोन्ही
मस्त! पाकृ आणि फोटो दोन्ही फार आवडले! पोटभरीचे आणि टेस्टी खाणे.
भूक लागली !!!
भूक लागली !!!
टॉर्टीयाच्या कृतीबद्दल थँक यू
टॉर्टीयाच्या कृतीबद्दल थँक यू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages