Submitted by हरिहर on 20 February, 2013 - 11:06
नवीन फ्लॅटमध्ये लादी/फरशी घालावयाची आहे. बिल्डर प्लेन आयव्हरी व्हिट्रीफाईड देणार आहे. मला खरं तर व्हिट्रीफाईड टाइल ऐवजी चांगल्या क्वालिटीची मोझॅक टाइल घालावी अशी इच्छा आहे. पण आता मोझॅक टाइल्स कालबाह्य होत आहेत. मोझॅक टाइलचा मुख्य फायदा म्हणजे वूडन खेरीज अन्य सर्व फरश्या गार पडतात पण मोझॅक टाइल तेव्हढी गार पडत नाही. आता कॉँक्रीट टाइल्स येऊ घातलेल्या आहेत म्हणे. यासंदर्भात कोणाला विशेष माहिती आहे का? तसेच स्वयंपाकघरात कोणती टाइल घालावी हाही एक मोठा प्रश्न आहे. या विषयावर अजाणांनी चर्चा करावी व प्रश्न विचारावेत आणि जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
vitrified tile वरुन
vitrified tile वरुन चालल्यामुळे गुढ्गे दुखीचा त्रास होतो अस मी ऐकून आहे. माझा स्वतःचा अनुभव नाही. त्या फरशा स्वछ करायला फार त्रास होतो हा मात्र माझा स्वतःचा अनुभव आहे. त्या वर पडलेले केस, कचरा निघता निघत नाही. ४५० चौरस फूट फरशी पुसायला २५ मिनिटे. कारण त्या फरशीला traction नाही. अर्थात जर महागातली घेतली तर कदाचीत इतका प्रश्न येणार नाही. दुसरा भाग त्याचे टवके पडन्याचा. त्याला तुम्ही फार काही करू शकत नाही. नान्देड city मध्ये काही मण्ड्ळीन्ची तक्रार होती की त्यान्च्या फरशी वर चहाचे देखील पडलेले डाग निघत न्हव्ते.
शक्य झाल्यास कोटा किन्वा तान्दूर किन्वा इतर नैसर्गिक दगडः जैसल्मेर वगैरे चा पर्याय चोखळून पहा.