Submitted by संयोजक on 13 February, 2013 - 02:31
२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून ओळखला जातो. मायबोलीवर 'मराठी भाषा दिवस' साजरा करण्याचं यंदाचं हे चौथं वर्ष. यानिमित्ताने पुढील कार्यक्रम आयोजित करणार आहोत. या सर्व कार्यक्रमांना दरवर्षीप्रमाणेच मायबोलीकरांचा भरभरून प्रतिसाद मिळेल याची आम्हांला खात्री आहे.
खालील दुव्यांवर उपक्रमांची माहिती मिळेल.
Groups audience:
शेअर करा
नमस्कार, वर नमूद केलेले
नमस्कार,
वर नमूद केलेले उपक्रम बघितले. १ शंका आहे. 'बोल बच्चन बोल' उपक्रम वय वर्ष २ ते ६ साठी आहे, तर, 'सा. न. वि. वि.' उपक्रम वय वर्ष ७ ते १८ साठी आहे. ६ ते ७ या वयोगटासाठी काही उपक्रम असणार आहे का? जसे की आवडीची गोष्ट सांगणे/बनवणे, मराठी अक्षरांपासून चित्र बनवणे इत्यादी.
माझी मुलगी ६+ वर्षांची आहे. बडबडगीतांसाठी मोठी आहे, परंतु, पत्र लिहिण्याइतकं मराठी अजून लिहिता येत नाही.
कुठे विचारायंच, ते न कळल्यामुळे इथेच प्रतिसाद देत आहे.
धन्यवाद.
गायत्री१३, 'बोल बच्चन बोल' या
गायत्री१३, 'बोल बच्चन बोल' या कार्यक्रमासाठी तुमच्या लेकीच्या प्रवेशिकेची आम्ही वाट बघत आहोत.
27 FEBRUARY.....MARATHI
27 FEBRUARY.....MARATHI RAJBHASHA DIN......MARATHI MANSANSATHI ANANDACHA DIVAS...PAN ANANDAPEKSHA VICHAR KARNYACHA DIVAS AHE......MAHARASHTRAT AJ MARATHI BHASHESATHI KAY VISHESH PRAYATNA KELE JATAT V KELE GELE PAHIJET YACHA VICHAR KELA PAHIJE...NUSTE DIVAS SAJRE KARUN HONAR NAHI....MARATHI DINACHYA KHUP KHUP SHUBHECHHA..
ओके. 'बोल बच्चन बोल'
ओके. 'बोल बच्चन बोल' कार्यक्रमासाठी प्रवेशिका पाठवते.
प्रतिसादाची नोंद घेऊन उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
मराठी भाषा प्रसार माध्यमानी
मराठी भाषा प्रसार माध्यमानी इतकी झोडपली आहे
की झी-मराठी वर ही सर्वजण इन्ग्रजी शब्द मराठी व्याकरण वापरून बोलतात.
हे सुधारायचे असेल तर "मराठी भाषा मास" पाळला पाहिजे!
पल्लवी जोशी, गुप्ते इ. लोकाना आधी मराठी प्रति(सह्)शब्द शिकवून मग कार्यक्रम नमूद '(रेकोर्ड) करावा.
सजीव '(लाइव्ह)' प्रसारणात अनावश्यक इन्ग्रजी शब्द वापरल्यास दर शब्दाला पैसे कापले
(एका शब्दाला १ टक्का फी, १०० पेक्षा जास्त चुकाना दन्ड!)
की १ महिन्यात दूरदर्शन वरील व १ वर्षात समाजातील मराठी सुधारेल!
(च्या आयला! हे टन्कायला अर्धा तास लागला!)
कार्यक्रम नमूद '(रेकोर्ड)
कार्यक्रम नमूद '(रेकोर्ड) करावा.
सजीव '(लाइव्ह)' प्रसारणात >>> वाटसरडा, तुम्ही उल्लेखलेले मराठी प्रतिशब्द चुकीचे आहेत. शब्द नुसता मराठी असून उपयोगी नाही, अचूकदेखील असायला हवा.
स.न.वि.वि. मी
स.न.वि.वि.
मी मायबोलीचा सभासद आहे. हा उपक्रम फारच छान आहे. आमच्या सारख्या, ज्यांना मराठी निट येत नाही,
त्यांना हे एक चांगले व्यासपिठ आहे. येथे लिहण्याचा प्रथमच प्रथमच प्रयत्न करत आहे. चुका असल्यास माफ करा.
मी मायबोलीचा चाहता आहेच. सर्वच लेख चांगलेच असतात.
--अरुण नाईक.