बजेट ०७
काय झाले या बजेट मध्ये? चांगले की वाईट? सुधारणा की पोलीटिकल स्पिच?
प्रत्येकजन आपाआपल्या प्रमाने अंदाज काढतो. माझ्या मते हे बजेट न्युट्रल होते. FM नी जास्त जोखीम उचलली नाही. सर्वाना खुष ही केले नाही कोणी रागवले ही नाही.
गेल्या वर्षी पेक्षा ढळक जानवनारी गोष्ट म्हणजे आपली मन्युफॅक्चरींग ग्रोथ ही ८.७ टक्या वरुन ११.३ टक्के झाली आहे. ( जे लोक अस म्हणतात की भारतीय शेअर बाजार फक्त आय टी वर अवलंबुन आहे व तो कधी ही कोसळेल, त्यांनी वरिल वाक्याची नोंद घ्यावी. सर्व उत्पादन करनार्या कंपन्या ह्या फायद्यात आहेत, ते देखील अमेरिके सारखी IT मध्ये गुंतवनुक न करता. )
बजेट मधील काही ठ्ळक मुद्दे मी मांडनार आहे. (माहीती साठी तुम्ही मायाजालात शोध करु शकाल हे मनात ठेवून).
१. गहु व तांदळावर सट्टेबाज सट्ट करु शकनार नाहीत. त्यामुळे ह्या दोन्ही वरचे भाव नियत्रंना असतील.
२. ४००० करोड रु हे ग्रामीन भागातील रस्त्यांसाठी राखीव.
३. स्त्री वर्गा साठी आता आयकर लिमीट ही १४५००० असेन.
४. फॉरेक्स रिझर्व हे सध्या १८० बिलीयन डॉलर्स आहेत.
५. ईफ्लेशन टारगेट हे ५.२ टक्के ते ५.४ टक्के असेन.
६. टेक्नॉलॉजी संबधीत वस्तु जसे Flat screen tv, AC, Laptop, Digital Camera, DVD, Ipod ई स्वस्त होईल.
७. आय टी कंपन्यासाठी MAT नावाचा नविन टॅक्स.
८. सिमेंट कंपन्यांसाठी २ प्रकारची ईक्साईज ड्युटी. - ve गोष्ट.
९. HIV शिक्षणावर भर.
१०. India या व्याखेत बदल.
११.व्यवसाइक सेंवा वर १० टक्के TDS
१२. टुरीझम वाढविन्या साठी तेथे उभारलेल्या स्व्वंवान्ना (हॉटेल वैगरे) ५ वर्षांसाठेई करमुक्ती.
१३. मेडीकल ईव्कीपमेंटस मध्ये ७ टक्यांनी कपात.
१४. ईसॉप वर कर.
१५. डिवीडंड वरील करात वाढ.
१६ मागे मी Auto Ind साठी ED 16 वर आणतील असा अंदाज वर्तविला पण बहुतेक तो FM ला मान्य नाही. auto ind जैसे थे.
असे अनेक मुद्दे आहेत पण मला जे महत्वाचे वाटले ते मी लिहीले. all in all न्युट्रल बजेट.
आता थोडे मार्केट कडे वळुयात.
फेब मधील १४७२३ या उच्चांका वरुन आत परत १२९३८. जवळपास १८०० पॉईंटस्ने करेक्शन झाले आहे. काल जे करेश्कन झाले त्यात (भारतात) चायनाचा हात नाही तर भारतीय गुंतवनुकदारानी बजेट वर दाखविलेली नाराजी आहे. या करेक्शन मुळे अनेक भाग जे महाग झाले होते ते परत एकदा घेऊ शकतो. ही खालील काही भाग घेन्यासाठी सुवर्नसंधी आहे.
टिसीयस, ईन्फी, रोल्टा, लार्सन एन्ड टुब्रो, लक्ष्मी मेटल, सेल ई.
शिवाय ईंडेक्श बेसड फंड मध्ये पैसे गुंतविने योग्य ठरेल. बाजार काही दिवस तरी sideways मध्ये ट्रेड करेल.