२ किंवा ३ रताळी.
१ संतर्याचा ज्युस.
[संतरे नसेल तर एका लिंबाचा रस ]
राजगिरा लाह्या.
[लाह्या नसल्या तर राजगिरा वडी /लाडू घेतल्यास चालेल]
२ चमचे किंवा आवडीप्रमाणे गुलकंद.
एकेरी काजुपाकळ्या.
चवीपुरते मीठ.
२ चमचे तूप.
रताळी छान धुवुन घ्यावी..थोडा वेळ स्वच्छ पाण्यात बुडवुन ठेवावी.
आता तेलाच्या प्लास्टिक पिशवीत किंवा दुधाच्या /तत्सम पिशवीत ही रताळी ठेवुन मावेत फुल पॉवर वर १-१-१ मिनिट भाजुन घ्या.मावे च्या बाहेर काढुन रताळी थंड करा.आता रताळे सुरीने मधुन चिरुन चमच्याने त्यातला गर एका बाऊल मधे काढुन घ्या.
[मावे नसल्यास रताळी ,कूकर मधे वाफवुन घेतली तरी चालतील.पण प्रेशर उतरल्यावर उकडलेली रताळी लगेचच पाण्याबाहेर काढुन ठेवा म्हणजे त्याचा गर पाणचट होणार नाही.साले सोलुन /रताळी आडवी चिरुन गर काढा.म्हणजे रताळ्याचे लांब रेषे गरात येणार नाहीत.]
एका संतर्याचा रस काढुन या गरात घाला.त्यात किंचित मीठ व मावतील तितक्या राजगिर्याच्या लाह्या आणि गुलकंद घालुन हलक्या हाताने मिश्रण कालवुन एक गोळा तयार करा.
राजगिरा वडी/लाडू वापरणार असाल तर त्यावर संतरा रस घाला म्हणजे वड्या/लाडू रसात भिजतील.
[जर लिंबाचा रस वापरला तर मिश्रण ओले करण्या साठी लागेल तसे थोडेसे[१-१ चमचा]दूध घाला.]
आता फ्राय पॅन गॅसवर तापायला ठेवुन त्यात १ टी स्पून तूप घाला.
एका लहान प्लेट मधे थोड्या राजगिरा लाह्या घेवुन तयार मिश्रणाचे साच्याने कटलेट तयार करुन त्यावरदोन्ही बाजुला मधे काजु लावुनहे कटलेट राजगिरा लाह्यात दोन्ही कडुन घोळवावेत व फ्राय पॅन मधे मंद आचेवर दोन्ही बाजुंनी भाजावेत.बाजु बदलली कि फ्राय पॅन वर १ टीस्पून तूप टाकावे.
रताळे आणि राजगिरा फार लौकर भाजला जातो म्हणुन मंद गॅसवर हे कटलेट फ्राय करावे.
रताळे व राजगिरा यात लोहतत्व भरपूर असते.पण राजगिरा लाह्यांना फारशी चव नाही.त्यामुळे खाल्ल्या जात नाहीत.
संतर्याच्या रसाची आंबटगोड चव व गुलकंदाची चव वेगवेगळी जाणवते.
गुलकंदामुळे मी वेगळी साखर घातली नाही.पण संतरा रस व गुलकंद न वापरता जर फक्त लिंबू रस वापरला तर चवीपुरती पिठीसाखर घालावी.
सुलेखा खूप वेगळा आणि
सुलेखा खूप वेगळा आणि नाविन्यपूर्ण पदार्थ!
मस्तच
मस्तच
छान प्रकार. मला मानवेल असाच
छान प्रकार. मला मानवेल असाच !
अवांतर : रताळी प्लॅस्टीकच्या बॅगमधे ठेवून भाजायचे काही खास कारण आहे का ? शक्यतो त्या बॅगा मावेच्या दर्ज्याच्या नसतात. तशीही भाजली जातील. कूकरमधे ठेवताना, पाण्याच्या वर राहतील अशी ठेवायची. म्हणजे पाणचट होत नाहीत.
दिनेशदा,मी बटाटे सुद्धा
दिनेशदा,मी बटाटे सुद्धा एक-दोन चिर लावुन रिकाम्या तेलाच्या पिशवीत ठेवुन भाजते .पिशवी बंद करत नाही.त्यामुळे भाजलेले बटाटे अगदी कोरडे [सुरकुतलेले]पडत नाहीत. कूकरमधे वेगळ्या भांड्यात /किंवा झाकणावर ठेवुन शिजवली तर नक्कीच पाणचट होणार नाही.
भारी आहे रेसिपी
भारी आहे रेसिपी
अत्यंत कल्पक रेसिपी सुलेखा.
अत्यंत कल्पक रेसिपी सुलेखा.
छान रेसिपी...
छान रेसिपी...:स्मित:
अरे वा.......एकदम वेगळी
अरे वा.......एकदम वेगळी रेसीपी
तो प्लेटच्या खालचा क्रोशाचा रुमाल पण एकदम भारीये
मस्त वाटतेय...
मस्त वाटतेय...
सुलेखा किती इनोव्हेटिव्ह आहेस
सुलेखा किती इनोव्हेटिव्ह आहेस गं तु
दक्षे,ब्रेकफास्ट साठी सोप्पे
दक्षे,ब्रेकफास्ट साठी सोप्पे आणि छान [पौष्टीक]आहे.मिश्रण तयार करुन फ्रिज मधे ठेवले तरी चालेल.