Submitted by अंजली on 7 February, 2013 - 08:57
मला पुढच्या आठवड्यात कामानिमीत्त जयपूरला जावे लागणार आहे. मी प्रथमच जयपूरला जात आहे. मी आणि माझी एक सहकारी दोन दिवस तिथे असू. सध्या भारतात - तेही उत्तर भारतात - स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्या असं इथल्या काही प्रवासी साईटसवर वारंवार सांगत आहेत. तिथे रहाण्याजोगी चांगली हॉटेल्स आणि सर्वसाधारणपणे काय काळजी घ्यावी तसेच अजून काही सूचना असतील तर इथे लिहा. जयपूरच्या विमानतळावरून प्रीपेड टॅक्सी वगैरेची सोय असावी असा अंदाज आहे, तो बरोबर आहे का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही आत्ता सहकुटुंब
आम्ही आत्ता सहकुटुंब जानेवारी मधे जयपुर ला ३ दिवस राहुन आलो सुरक्षेच्या दृष्टिने काहि प्रॉब्लेम वाटला नाही.
पण एक म्हणजे रात्री ८.३०/ ९ नतंर रस्त्यावर जास्त कोणी नव्हते ते पण एम. आय. रोड ह्या मध्यवर्ती भागात. ( थंडीमुळे असेल कदाचित...)
धन्यवाद अतरंगी.
धन्यवाद अतरंगी.
अंजली मार्को पोलो यांचा धागा
अंजली मार्को पोलो यांचा धागा आहे जयपुराबद्दल http://www.maayboli.com/node/20552 त्यांनाही विपूत माहिती विचारता येईल.
तिथे प्रतिसादांत देखील काही माहिती आहे.
आपली जयपुरचि भेट कशी झाली?
आपली जयपुरचि भेट कशी झाली? नविन लेख वाचण्याची उत्सुकता आहे!
ख्रिसमसचा आठवडा जयपूर आणि
ख्रिसमसचा आठवडा जयपूर आणि जैसलमेरला जाणार आहोत. कृपया माहिती द्या. 4 ते 8 वर्ष वयाची 4 मुले सोबत आहेत. तिकडे कोणत्या प्रकारचे गरम कपडे लागतील.
इथे कुणी राजस्थान ट्रीपसाठी
इथे कुणी राजस्थान ट्रीपसाठी खात्रीचा ड्रायव्हर आणि कार सुचवू शकेल का/ नंबर देऊ शकेल का?
मी आणि माझी बायको कामानिमित्त
मी आणि माझी बायको कामानिमित्त दीड वर्षे जयपुरमधे राहिलोय. खुप सुरक्षित शहर आहे, फक्त जलुपुरा, हमीद नगर, चांदपुर हे भाग महीलांसाठी फारसे सुरक्षित नाहीत. रात्री अपरात्री भटकू नका.
ओला उबर वापरा, रिक्षा महाग आहेत. जमल्यास ओला उबरचे डेली package घ्या.
रावत मिष्ठान भांडार, अमूल पार्लर आणि कान्हामधे नक्किच खाउन बघा. जर रोडसाइडचे खात असाल तर गौरव टोवरजवळ बरेच चांगले ठेले आहेत.
@प्रथम म्हात्रे - इस्कॉन रोड
@प्रथम म्हात्रे - इस्कॉन रोड कसा आहे? त्याच्या आजू बाजूला बघण्यासारखे काय आहे?
@प्रथम म्हात्रे - इस्कॉन रोड
@प्रथम म्हात्रे - इस्कॉन रोड कसा आहे? त्याच्या आजू बाजूला बघण्यासारखे काय आहे?
>>> तिथून जवळच सिटी पार्क आहे आणि जवळच एक नविन ट्रॅम्पोलीन पार्क झाले आहे. बाकी जयपुर शहर जास्त मोठे नाही, सर्व जवळपासच आहे.