डॉलर विरुध्द रुपया.

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

सध्या रुपया ला चांगले दिवस आले आहेत, हे तसे ईकॉनॉमी सुधारल्याचे लक्षन आहे. पण देशाची अर्थव्यवस्था खरच सुधारली आहे की रुपायाची सध्याची वाढ ही तात्पुरती आहे हा प्रश्न बहुतेकांना आहे.

पण माझ्या मित्रांना वेगळाच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे १ डॉलर ला जिथे ३ वर्षापुर्वी ४८ रु, २ वर्षापुर्वी ४४ रु तिथे आज ४० रु म्हणजे त्यांची बाहेरील देशातील नेटवर्थ, भारतीय रुपयात कन्वर्ट करताना कमी होत आहे.

रुपयाचा जोरदार वाढीमुळे मोठ्या कंपन्याच्या निव्वळ नफ्यात घट होत आहे. जेव्हा रु. ४० ला पहिलेंदा टच झाला त्या दिवशी ईन्फोसीस व टिसीऐस च्या समभागात जोरदार घट झाली. त्यांचा LRP - Long range planning ला जोरदार फटका मिळाला त्यामुळे पुढील वर्षीच्या अंदाजीत नफ्यात त्यांना घट दाखवावी लागली.

मग नक्की काय होनार? रु. आणखी वाढनारा की कमी होनार? डॉलर च का? पॉन्ड मध्ये का फरक होत नाहीये? अशा स्तिथीचा नेमका फायदा कोणाला? बिलीव्ह ईट ऑर नॉट हा फायदा सर्वात जास्त परकिय गुंतवनुक कंपन्यांना होत आहे तो कसा?

परदेशी बन्का आंतरराष्ट्रीय बाजारातुन ५.५ टक्के दराने डॉलर्स उचलतात त्या लगेच भारतात रु. मध्ये बदलबुन भारतातील वित्तीय कंपन्याना कमी मुदतीसाठी १४ ते १५ टक्के दराने कर्जाने देतात. कमीशन वजा जाता ह्या व्यवहारात त्यांना निव्वळ फायदा हा ९ ते १० टक्क्याने होतो. अशा व्यवहारा मुळे सध्या भारतीय बाजारात डॉलर च्या मागनीपेक्षा पुरवठा जास्त आहे, त्यामुले डॉलर ला जास्ट भाव नाही. ( हे अनेक कांरणापैकी एक, जागतीक तेल बाजारात डॉलार पेक्षा युरोला आलेले महत्व, ईराक वॉर, अमेरीकेत ८ ट्रिलीयन वित्तीय तुट ही बाकीची कारन),
तर ह्या परिस्थीत फायदा अभारतीय कंपन्यांनाच. RBI मग काय करते? हा प्रश्न येतो, तर सध्या तरी आपल्याला ( RBI ) महागाई दर नियंत्रनात ठेवायचाय. त्यामुळे सहज मिळनारे डॉलर RBI विकत घेऊ शकत नाही कारण डॉलर जर विकत घेतले तर भारतात उपलब्ध असनार्या रुपयांमध्ये वाढ होईल व परत त्याचा परीनाम अर्थव्यवस्थेवर उलटा होईल म्हणुन तिथे काही करता येत नाही. मध्ये अफवा होती की CRR ५ टक्यानी वाढेल तसा तो RBI ने वाढविला नाही कारण मग त्याचा परीनाम रुपी व्हल्यु अजुन वाढली असती व परदेशी कंपन्यांनी अजुन फायदा करुन घेतला असता.

अमेरीकेत वॉरन बफेट सारख्या मोठ्या गुंतवनुकदाराने २००६ च्या शेवटी त्याचे १ बिलीयन डॉलर्स हे डॉलर पडावेत म्हणुन लावले. ( options money market ) तो देखील डॉलर पडेल म्हणतोय. बिल गेटस एका व्याख्यानात म्हणला की by good ol' $.

जर खरच येत्या दोन वर्षात डॉलर पडला तर मग गार्टनर ने जे भारता विषयी लिहीले ते खरे होऊ शकते. त्यांनी २००३ मध्ये लिहीले होते की २०१५ पर्यंत भारतीय लेबर व अमेरिकन लेबर ह्या आज जो फरक आहे तो राहानार नाही. आपन तिथे जाऊ की नाही हे माहीत नाही पण घसरनारा डॉलर व चढनारा रुपाया पाहीला की मी मात्र खुश होतो.

प्रकार: