Submitted by अजय on 3 February, 2013 - 11:36
माजी कर्णधार "कर्नल" दिलीप वेंगसरकर यांच्याशी गप्पा. BMM 2013 च्या व्यासपीठावर
खणखणीत चौकार षटकारांची आतषबाजी
मुलाखतकार द्वारकानाथ संझगिरी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चला BMM हळू हळू जोर धरू
चला BMM हळू हळू जोर धरू लागलंय..
हो येत्या आठवड्यात बर्याच
हो येत्या आठवड्यात बर्याच कार्यक्रमांवर शिक्कामोर्तब होईल.
हा कार्यक्रम जरा नेहमीपेक्षा
हा कार्यक्रम जरा नेहमीपेक्षा वेगळा दिसतोय.
तुम्हाला शुभेच्छा!
मस्तच. वेंगसरकर आणि संझगिरी.
मस्तच. वेंगसरकर आणि संझगिरी. मजा येणार!
नंतर येथे लिंक मिळेल ना?
मस्त. वाचायची उत्सुकता आहे.
मस्त. वाचायची उत्सुकता आहे.
खूप लहाणपणापासून संझगिरींचे
खूप लहाणपणापासून संझगिरींचे लेख आणि क्रीडावृत्तं वाचत आलो. क्रिकेटमधलं काही कळत नसायचं, पण संझगिरींची खुसखुशीत शैली आवडायची. वेंगसरकरला बघायला आवडायचं. धीरोदात्तपणे तो खेळताना टीव्हीवर बघताना काहीतरी भारी वाटायचं. फोटोही जमवले होते खूप त्याचे. आता या निमित्ताने तो सारा नोस्टॅल्जिया पुन्हा एकदा अनुभवता येईल. शुभेच्छा!
या कार्यक्रमाबद्दल खूपच
या कार्यक्रमाबद्दल खूपच उत्सुकता आहे.
वेंगसरकर आणि संझगिरी. मजा
वेंगसरकर आणि संझगिरी. मजा येणार! >>> +१
मुलाखत वाचायला / बघायला मजा येईल , इथे व्हिडिओ अपलोड करणार का ?
वेंगसरकर आणि संझगिरी. मजा
वेंगसरकर आणि संझगिरी. मजा येणार! >>> +१
इथे व्हिडिओ अपलोड कराच बरका प्लीज !!
मुलाखत छानच झाली. संझगिरीचे
मुलाखत छानच झाली. संझगिरीचे प्रश्न व वेंगसरकरांची बॅटिंग सुन्दर..
कर्नलना माईकचं तंत्र नीट जुळत नसल्याने मधे मधे (मागे बसलेल्यांची) थोडी निराशा झाली.
(त्यांना माईक नाही बॅट द्या, अशी सूचना मी जोरात ओरडून केली)
पण आपण क्रिकेट मधल्या एका दिग्गजाला बघतोय ही जाणीव प्रेक्षकांमधे होती.
खुपच मजा आली हा कार्यक्रम
खुपच मजा आली हा कार्यक्रम बघुन. खुप जुन्या क्लिप्स बघायला मिळाल्या. खुप आठवणी जाग्या झाल्या.
मस्त मस्त मस्त..
.पाकिस्तानी अंपायर आणि
.पाकिस्तानी अंपायर आणि चिक्किखाऊपण्णा...
.ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा 'रडी'चा खेळ...
.हेल्मेट नसताना सुनिल/दिलीपचे खेळणे. अशोक मंकड/ब्रिजेश पटेल आणि फास्ट बॉलर.
.लहानपणच्या गमती जमती.
.वासू परांजपे यांची विनोदबुध्दी..
.दाऊदचं सावट.
.कपिलचा साधेपणा, गणिताचा अभाव..
.दिलिप दोशीची बँटिग..
. मियादादने मारलेला सिक्सर...
एक ना दोन.. खूप चांगले चांगले किस्से ऐकायला मिळाले.
मियादादने मारलेला सिक्सर....
मियादादने मारलेला सिक्सर.... त्याची ती बॅट म्हणे त्याने २६ लोकांना विकली हिच ती सिक्सरची बॅट म्हणुन.
वेस्ट इंडीज्/ऑस्ट्रेलियाच्या
वेस्ट इंडीज्/ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर समोर जावे लागू नये म्हणून मंकड,पटेल वगैरे मंडळी टॉयलेटमधे दडून बसायची म्हणे..
आणि ११ मधे सिलेक्शन झालं की, 'मी का खेळायचं? मी नाही जाणार? दुसरा बघा' असं सांगायचे म्हणे.
संशय होताच पण आता खात्री झाली.
'पण एकाही मराठी खेळाडूने असं कधीही केलं नाही,' या वाक्याला भरपूर टाळ्या पडल्या.
'क्रिकेटचा देव असेल तर तो मराठी असणार. कारण भारतीय क्रिकेटला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा 'कर' आडनांव असलेल्या मराठमोळ्या घरात त्याने एक-एक बॅट्समन जन्माला घातला' हेही प्रेक्षकांना पटलं. (मांजरेकर, गावस्कर, वेंगसरकर... तेंडूलकर...)...
देसाई, सरदेसाईंनी कुठे घोडं मारलंय कुणाचं? (मी आपला मनातच)
'क्रिकेटचा देव असेल तर तो
'क्रिकेटचा देव असेल तर तो मराठी असणार. कारण भारतीय क्रिकेटला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा 'कर' आडनांव असलेल्या मराठमोळ्या घरात त्याने एक-एक बॅट्समन जन्माला घातला' हेही प्रेक्षकांना पटलं. (मांजरेकर, गावस्कर, वेंगसरकर... तेंडूलकर...)...
<<<
वाडेकर राहिला लिस्ट मधे :).
सोलकर पण
सोलकर पण
देसाई तुमच्या काँमेंट BMM
देसाई तुमच्या काँमेंट BMM च्या सर्व प्रोर्ग्रॅमपेक्षा गाजत आहेत सध्या. ठेवा ते वर.
कां.पो.. तरी मी 'मन दुखावतील'
कां.पो.. तरी मी 'मन दुखावतील' म्हणून बर्याच Comment गिळून टाकल्यात
विनय
विनय