Submitted by प्रविण जगताप on 23 January, 2013 - 08:50
नमस्कार मायबोलीकर,
आमचे गुहागर ला जायचे ठरते आहे. मस्त एक दोन दिवस हिंडून बीच वर राहून यायचे असा विचार आहे. आमचा २० जणांचा ग्रूप आहे.
गुहागर ला आधी कधी गेलेलो नाही. कुठे रहावे याबद्दल माहिती हवी आहे. तसेच, गुहागर ला खाण्या-पिण्याची सोय कुठे चांगली आहे हे कोणी सांगू शकेल काय?
सध्या मला दोन-तीन हॉटेल्सची माहिती मिळाली आहे पण तिथे जेवणाची आणि राहण्याची सोय कशी आहे या बद्दल मत हवे आहे.
१ निसर्ग रेसोर्ट्स
२ निसर्गाधारा
३ राजगड
निसर्ग हॉटेल समुद्रकिनाऱ्या पासून जास्त दूर आहे काय ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निसर्ग रेसोर्ट्स चांगली आहे.
निसर्ग रेसोर्ट्स चांगली आहे. जेवणाची आणि राहण्याची सोय चांगली आहे. समुद्रकिनाऱ्या पासून ३ KM दूर आहे.
निसर्ग रिसॉर्ट्स चांगलं आहे
निसर्ग रिसॉर्ट्स चांगलं आहे पण जेवण मला तरी खुप खास वाटलं नाही. (व्हेज नॉन व्हेज दोन्ही) त्यापेक्षा खुप चांगली सोय दुर्गादेवी भक्त निवास मधे झाली (शाकाहारी जेवण रुचकर होतं भक्त निवास मधलं)
प्रविण, या रिसॉर्टचे संपर्क
प्रविण, या रिसॉर्टचे संपर्क क्रमांकपण देऊन ठेव, म्हणजे बाकीच्यांनाही मदत होईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुहागरला कधी गेलो नाही, पण जायचं असल्यास ही माहिती उपयोगी पडेल.
जेवण्यासाठी अन्नपुर्णा मस्त
जेवण्यासाठी अन्नपुर्णा मस्त आहे.
हॉटेल दुर्गा पर्ल.
हॉटेल दुर्गा पर्ल.
ही लिंक
ही लिंक बघा.
http://www.puneritraveller.com/guhagar-hotels.html
बर्याच वेळां जावूनही मीं
बर्याच वेळां जावूनही मीं गुहागरला कधीं राहिलो मात्र नाही. << जेवण्यासाठी अन्नपुर्णा मस्त आहे>> शीं सहमत ; अर्थात, मासेखाऊ असाल तर. मी शाकाहारी नाही जेवलोय तिथं. कांही घरांत रहाण्या-जेवण्याची उत्तम सोय झालीय असं मित्र सांगतात. संध्याकाळीं गुहागर किनारा मस्तच पण दिवसा वेलदूर - एनरॉन परिसराला [ अंतर अंदाजें १२ किमी] एकदां भेट द्यावी असं मला वाटतं.
प्रविण, गुहागरला खरेज प्लेजर
प्रविण,
गुहागरला खरेज प्लेजर लिव्हिंग म्हणून एक मस्त जागा आहे राहण्यासाठी. जेवण पण सुंदर मिळते.
आम्ही राहिलो होतो तिथे. फोटो पहायचे असतील तर खालिल दुव्यावर पहाता येतील
http://www.maayboli.com/node/39548
अतरंगी, मस्त दिसते ही जागा.
अतरंगी, मस्त दिसते ही जागा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
महिति बद्दल धन्यवाद. निसर्ग
महिति बद्दल धन्यवाद.
निसर्ग हॉटेल ठीक वाटते आहे पण ते समुद्र किनाऱ्या पासून जर जास्त दूर आहे असे वाटते.
https://maps.google.co.in/maps?hl=en&q=nisarg+resort+guhagar&ie=UTF-8&ei...
@ कांदापोहे
दुर्गा पर्ल समुद्र किनार्यापासून किती दूर आहे ?
@अतरंगी
प्लेजर लिव्हिंग येथे राहण्याची सोय कशी आहे ? फक्त टेंट आहेत कि चांगल्या रूम पण आहेत ?
हॉटेल राजगड बद्दल कोणाला काही माहिती आहे का ?
प्रकाश रुम्स पण आहेत.
प्रकाश
रुम्स पण आहेत.
हॉटेल राजगड, जेवण आणि
हॉटेल राजगड, जेवण आणि खाण्यापिण्याच्या इतर गोष्टी खूप महाग, राहण्याची सोय पण ठीकठाक, in short २ stars.
गुहागर माझ आजोळ आहे . लहान
गुहागर माझ आजोळ आहे . लहान पणी मे महिन्याच्या सुट्टीत महिना महीना जाऊन राहिलो.आहोत मला मज्जा वाटतेय कि आत्ता गुहागरचा पिकनिक साठी विचार होतोय. गेल्या दहा वर्षात गुहागर ला गेलेच नाही. आजी वारल्या पासून. आत्ता मामीनी घरामध्ये खूप सुधारणा केल्यात त्यामुळे या मे महिन्यात जायचा विचार आहे. इतका स्वछ्य आणि सुंदर समुद्र किनारा दुसरा कुठेही सापडणार नाही. देवीच्या देवळात आत्ता "भक्त निवास" बांधला आहे असे ऐकून आहे. मे महिन्यात गेलात तर भरपूर आंबे खायला मिळतील आमच्या घराच्या माडीवर आंब्याच्या अढी लागलेल्या असत. कधीही माडीवर जावे आणि पाहिजे तेह्व्व्हा पाहिजे तितके आंबे खावेत अशी मज्जा असायची
रोज आमरस / भरपूर वेळा फणसाची भाजी/ फणसाच सांदण . धमाल असायची. आंब्याचा रस आटवून आजी आंब्याच्या पोळ्या करायची त्या माडी वरच्या पत्र्यावर सुकवायला जायचं ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)