Submitted by चिन्नु on 23 January, 2013 - 08:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पुदिना ५-६ काड्या, कोथिंबीर, कडीपत्ता, १ वाटी तांदूळ, मटारदाणे, पाव वाटी, आले लसूण पेस्ट - १ टे. स्पून, तेल, मीठ, १ टे. स्पून दही., आवडीप्रमाणे गाजर, फरसबी अश्या भाज्या- अर्धी वाटी. खडा मसाला - ऑप्शनल, भात शिजवायला गरम पाणी.
क्रमवार पाककृती:
पुदिन्याची पाने दह्यात मिक्स करून पेस्ट करा.
पॅन गॅसवर ठेवा. तेल घाला. खडा मसाला घालत असल्यास आता घाला. कडीपत्ता, कोथिंबीर, आले लसूण पेस्ट घालून परता. तांदूळ घालून परता. मटार व भाज्या घाला. गरम पाणी घालून भात थोडा शिजु द्या. पुदिन्याची पेस्ट घाला. मीठ घाला. भात पूर्ण शिजल्यावर पुलाव तयार!
वाढणी/प्रमाण:
२ जणांसाठी
अधिक टिपा:
१. या पुलावात भाज्या न घालता फक्त मटार घातले तरी छान होतो.
२. खडा मसाला न घातल्यास सौम्य चवीचा पुलाव होतो.
३. पुलावाची शितं मोडायची भिती असल्यास, भाज्यांबरोबरच पुदिन्याची पेस्ट व मीठ घातले तरी चालेल.
माहितीचा स्रोत:
मैत्रिण
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा आज पाकृची बहार दिसतेय
अरे वा
आज पाकृची बहार दिसतेय
(No subject)
छान. कुकरमध्ये लावल्यास भात
छान. कुकरमध्ये लावल्यास भात मोडत नाही.
य्स्स जागु. वरून थोडं तूप
य्स्स जागु. वरून थोडं तूप सोडायचं.
अहाहा....विकांताला नक्की
अहाहा....विकांताला नक्की
मस्त आहे डिश आवडली
मस्त आहे डिश आवडली
(No subject)
छान दिसतोय हा पुलाव. मी
छान दिसतोय हा पुलाव.
मी बासमती तांदळावर एक प्रयोग केला होता. ( आमच्याकडे भारतीय बासमती, व्हाया पोर्तुगाल, विथ पोर्तुगीज लेबल येतो.) पाऊण तास तो नेमक्या दुप्पट पाण्यात भिजवला आणि त्याच पाण्यात शिजवला. शिजवायला वेळ कमी लागला आणि प्रत्येक शीत लांब आणि मोकळे शिजले.
हो दिनेशदा. बासमती तांदूळ इज
हो दिनेशदा. बासमती तांदूळ इज बेस्ट मॅच फोर पुलाव.
छान दिसतोय हा
छान दिसतोय हा पुलाव.>>>>
यावरून आठवले पाकृचा फोटो कुठाय चिन्नुअक्का?? की फोटोसकट खाल्लीत :)...इतकी का छान झाली होती.....?
वैवकु तुझी गझल वाचून जसं
वैवकु तुझी गझल वाचून जसं imagine करतो ना आम्ही तसंच तू पण पुलाव imagine कर हो
पार्टीसाठी केला होता. मीठ कमी झालं आणि शेवटी शितं मोडली सारखं करतांना. म्हणून नाही काढला फोटो. परत केला आणि चांगला झाला/दिसला तर काढेन बर्का फोटू
चिन्नु, मी किन्वा वापरून केला
चिन्नु, मी किन्वा वापरून केला मिंट पुलाव. मस्त झाला होता
अरे वा राखी. I miss quinoa.
अरे वा राखी. I miss quinoa.