Submitted by चिन्नु on 23 January, 2013 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी उकडलेले कॉर्नचे दाणे/ कणीस असल्यास १ उकडून.
चिली सॉस १ टी स्पून किंवा आवडीप्रमाणे,
कडीपत्ता,कोथिंबीर,
लाल मिरचीच्या बिया,
१ हिरवी मिरची भाजून किंवा आवडीप्रमाणे तिखट,
मीठ,
१ टी स्पू. तेल,
फोडणी आवडत असल्यास किंवा ऑप्शनल
आल्याच्या ३-४ काड्या आवडत असल्यास,
पाणी गरजेनुसार
क्रमवार पाककृती:
कॉर्नचे काही दाणे बाजुला काढून ठेवा. हे नंतर सूपमध्ये घालायचे आहेत.
उरलेले दाणे/कीस व हिरवी मिरची मिक्सरमधून भरड काढा.
पॅन गॅसवर ठेवा. तेल घाला. फोडणीचे जिन्नस, लाल मिरचीच्या बिया, कडीपत्ता, कोथिंबीर घाला. मिक्सरमधून काढलेली पेस्ट घाला व परता. एक-दोन मिनिटांनी चिली सॉस घाला. थोडे पाणी घाला. मीठ अॅड्जस्ट करा. एक उकळी आली की गॅस बंद करा. कॉर्नचे दाणे, आले, कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम ओरपा!
वाढणी/प्रमाण:
अंदाजे
अधिक टिपा:
१. आवडत असल्यास हिंग, साखर घालू शकता.
२. चिली सॉस जपून घालावा, ठसका लागतो.
माहितीचा स्रोत:
मैत्रिण
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॉर्नचा कुठलाही प्रकार आवडता.
कॉर्नचा कुठलाही प्रकार आवडता. हा पण करुन बघेन.
आमच्याकडे बाजारात पांढर्या मक्याचे सुकवलेले कोवळे दाणे दिसतात. ते पटकन शिजत असावेत. ते वापरुन बघीन.
थँक्स दा. सूप थोडे गोडसर
थँक्स दा. सूप थोडे गोडसर चवीचे व पाणीदारच होते. यात बेससाठी कुठलेही पीठ वापरत नाही. लिंबु पिळल्यास वेगळी चव येइल.
चिन्नु, फोटो प्लीज. (कायेना
चिन्नु, फोटो प्लीज.
नुसतं वाचलं की डोक्यात घुसत नाही.)
(कायेना की फोटु बघितला तरच माझ्यासारख्या पाककुशल व्यक्तीच्या मनात कुठलीही रेस्पी करण्याची हिंमत येते
रुणु, पुढच्या वेळेस काढेन गं.
रुणु, पुढच्या वेळेस काढेन गं. राहूनच जातं.
हे सूप लेमन कोरियांडर सूपप्रमाणेच पाणीदार असतं.
ओक्के
ओक्के
अरे वा एकदम सोप्पय करुन
अरे वा एकदम सोप्पय
करुन पाहीच
फोटो मात्र हवाच
मिरचिच्या बिया वेगळ्या मिळतात
मिरचिच्या बिया वेगळ्या मिळतात का? कि मिरचितुन काढुन टाकायच्या? किती टाकायच्या?
लाल मिरचीच्या बिया, मिरचीमधून
लाल मिरचीच्या बिया, मिरचीमधून काढून वापरायच्या. सोसत असेल तर तश्याच वापरायच्या किंवा धुवून कोरड्या करून. एक चिमुटभर पुरे. फोडणीच्या जिनसांप्रमाणेच फोडणीत घालायच्या.
चिली -स्वीट कॉर्न सुप थोडा
चिली -स्वीट कॉर्न सुप थोडा बदल केला.वाफवलेल्या स्वीट कॉर्न चे दाणे--यातले अर्धे पाणी घालुन वाटुन गाळुन घेतले कारण दाण्याची सालं/चोथा तोंडात येतील असे वाटले- २ फरस बी व १ इंच गाजर ,कोथिंबीर अगदी बारीक चिरुन ,कढीपत्ता,१ हि.मिरची मधुन चिर देवुन २ तुकडे करुन फोडणीत घातले वरुन रेड चिली सॉस,मिरेपुड,उरलेले स्वीट कॉर्न,मीठ, घातले.चवीला व रंगाला मस्त झाले.
वा वा वा, काय मस्त फोटो है!
वा वा वा, काय मस्त फोटो है!

सुलेखाताई, छान दिस्तय सूप. या थंडीच्या दिवसात मज्जा येते गरमागरम सूपने.
मीपण पुढच्या वेळेस गाळून पाहीन कॉर्न. थोडे भरड असल्यामुळे सूपचे टेक्स्चर बदलते.
थँक्स
घरी चिली सॉस नव्हता, म्हणून
घरी चिली सॉस नव्हता, म्हणून तो गाळून कृतीबरहुकूम करून पाहिलं. साखर घातली नाही..
चवः अप्रतिम.. वरून घातलेले स्वीटकॉर्नचे दाणे घासात आले तर अगदी त्याहून उत्तम.. पाकृसाठी धन्यवाद!!
अर्थातच फोटो काढायला वेळ घालवला नाही
चिली सॉस किंवा टोबॅस्को सॉस
चिली सॉस किंवा टोबॅस्को सॉस हवाच. मस्त झणझणीत होतं हे प्रकरण.
टोबॅस्को पण चालला असता? हे
टोबॅस्को पण चालला असता? हे लक्षातच आलं नाही. हरकत नाही, घरी अजून कॉर्नस शिल्लक आहेत.
खुपच् मस्त आहे हे सुप मि करुन
खुपच् मस्त आहे हे सुप मि करुन बघेन
व्वा..! दिसतंय तर छान.
व्वा..! दिसतंय तर छान. करायलाही सोपे वाटते आहे. मीच करून पाहीन म्हणतो...
आज इथे ढगाळ वातवरण आहे.
आज इथे ढगाळ वातवरण आहे. पावसाची दणदणीत हजेरी लागणारसे दिस्तयं. त्यात आज हे सूप केले. वर आल्याच्या काड्याच घालायचे लिहीले होते, पण आज थोडंसं आलं, हि.मि. आणि कॉर्नच्या दाण्यांबरोबरच मिक्सीत घातले. चिली सॉस घातला नाही. तरी चव चांगली आली होती.