१ वाटी तीळ किंवा दाण्याचा कूट, १ वाटी गूळ, १ टे स्पून साजूक तूप
तीळ मंद आचेवर रंग न बदलू देता भाजून घ्यावेत. एका पसरट ताटात गार करायला ठेवावेत. दाण्याची चिक्की करायची असल्यास भाजलेल्या दाण्यातले १०-१२ दाणे सालं काढून अर्धे करुन घ्यावेत. उरलेल्याचा जरा भरड कूट करावा.
एका थाळ्याला आणि वाटीच्या तळाला (बाहेरुन) तूपाचा हात लावून ठेवावे. कढईत अथवा जरा खोलगट पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात गूळ घालावा. आंच एकदम मंद ठेवावी. गूळ किसलेला नसल्यास कढईतच खडे जरा मऊ करुन फोडावेत. गुळाचा पाक होऊन फसफसायला लागेल. पाक सतत ढवळत रहावा.
एका वाटीत गार पाणी घेऊन त्यात थेंबभर पाक घालावा. पाक लगेच कडक होउन छान खुटखुटीत झाला तर तयार झाला समजायचा (हो, खाऊन बघावा). पाक-चाचणी फेल गेल्यास आणखी थोडा वेळ फसफसु द्यावा. पाक झाल्यावर आंच बंद करावी. आता पाकात भाजलेले तीळ अथवा दाण्याचा कूट घालून भराभरा हलवावे आणि लगेच मिश्रण थाळ्यात घ्यावे. वाटीच्या तळाने सरसर पसरवावे. आपल्या (खाण्याच्या/देण्याच्या) कुवतीप्रमाणे जाडी ठेवावी. गरज पडल्यास थोडा तुपाचा हात लावून एक सारखे करुन घ्यावे. वड्या पाडायच्या असतील त्याप्रमाणे सुरीने थोड्या खाचा करुन घ्याव्यात म्हणजे नंतर वड्या तुटत नाहीत.
पाचेक मिनिटात वड्या बर्यापैकी गार होउन निघायला लागतात. थाळ्याला चिकटल्याच तर थाळा अगदी पाच सेकंद गरम करावा. चिक्की तय्यार!
मी पॉलिश्ड तीळ वापरलेत पण अशा चिक्कीसाठी साधे- गावराण हावरी- तीळ घ्यावेत. मस्त खमंग लागतात ते तीळ.
साक्षीदार हजर हो
साक्षीदार हजर हो
फारच तोंपासु दिसतेय!!
फारच तोंपासु दिसतेय!!
फोटो मस्त आलेत.
फोटो मस्त आलेत.
तो.पासु. आहे. मी प्रयत्न करू
तो.पासु. आहे. मी प्रयत्न करू का चिक्की बनवायचा???
सिंडरेला, साधा गूळ वापरला की चिक्कीचा.
साधा. करुन बघा, सोपा प्रकार
साधा.
करुन बघा, सोपा प्रकार आहे.
वा.. मस्त फोटो !
वा.. मस्त फोटो !
सही! मी करणार नक्की!
सही! मी करणार नक्की!
फोटू मस्त. मी पाऊण पटीत गूळ
फोटू मस्त.
मी पाऊण पटीत गूळ घेते.
भयंकर तोंपासु
भयंकर तोंपासु
हे बरीक छान केलस. पण मला
हे बरीक छान केलस.
पण मला तुझ्या हातचीच खायला, जास्त आवडेल
मस्त मस्त एकदम झकास दिसतीय
मस्त मस्त एकदम झकास दिसतीय चिक्की,
करायला जमेल का नाही माहिती नाही, त्या पाक प्रकाराची जरा भितीच वाटते.
सुरेख!
सुरेख!
सुरेख!
सुरेख!
वा !! काय मस्त दिसताय्त
वा !! काय मस्त दिसताय्त वड्या.. करुन बघायला हव्या..
मस्त झालीये चिक्की.. माझी
मस्त झालीये चिक्की.. माझी एक टीप : गुळात तीळ्/दाणे घालायच्या आधी चिमटीत मावेल इतकाच खायचा सोडा टाकून ढवळून घ्यावे मग मिश्रण घालावे. किचन कट्ट्यावर गोळा तूपावर गोल गोल हाताने दाबून फिरवून लाटण्याने लाटल्यास चिक्की हवी तितकी पातळ होते. चिमटीभर सोड्याने चिक्की खुटखुटीत होते.
शेंगदाणे नाही घातले का
शेंगदाणे नाही घातले का
लै भारी.
लै भारी.
तोंपासु...............
तोंपासु...............
आह! कातिल फोटू
आह! कातिल फोटू
मस्तच.... चिक्कीचा गुळ घातला
मस्तच....
चिक्कीचा गुळ घातला तर ????
धन्यवाद अनघा, पाक जमला तर
धन्यवाद
अनघा, पाक जमला तर छान खुटखुटीत होते चिक्की. सोड्याने खुसखुशीत होते का ?
पाकाचे कौशल्य तर मुख्य आहेच
पाकाचे कौशल्य तर मुख्य आहेच ग, पण चिमुटभर ( प्रत्येक घाण्याला) सोड्याने जास्त खुटखुटीत होते असा अनुभव आहे. अन हो, तीळ नाही भाजले तरी चालतात चिक्कीला. अन मोळी सिंग ( मीठ नसलेली) वापरायची दाणेचिक्कीला.
सुरेख दिसत आहे चिक्की! मस्त!!
सुरेख दिसत आहे चिक्की! मस्त!!
शेवटचा फोटो एकदम कातील.. मी
शेवटचा फोटो एकदम कातील..
मी सेम अशीच गुळा ऐवजी साखरेची करते.. ती पण मस्त खुटखुटित होते
आत नेक्ट बॅच गुळ घालुन करेन..
तीळाचा इतका मोठा पंखा
तीळाचा इतका मोठा पंखा नसल्यामुळे आता हा प्रश्न क्रमप्राप्त आहे. शेंगदाण्याची चिक्की ह्याच कृतीनी बनवता येइल का?
बुवा, दाण्याच्या कुटाची
बुवा, दाण्याच्या कुटाची करणार असाल तर कृतीत प्रमाण दिले आहे. आख्खे भाजलेले दाणे जरा हातानेच सुटे करुन घेतले तर चालतील. डाळ्याची पण चांगली होते ह्या कृतीने.
जो काही घटक घ्याल तो कुरमुरीत होइपर्यंत भाजलाच पाहिजे. नाही तर कच्चट चव लागते.
मस्त !
मस्त !
मस्त दिसते आहे चिक्की. पाक
मस्त दिसते आहे चिक्की.
पाक जमला नाहीतर काय होतं हे कोणीतरी लिहा की.
भुगा नाही तर दगड
भुगा नाही तर दगड
ट्च ट्च सिंडे! 'माझा जमतोच
ट्च ट्च सिंडे! 'माझा जमतोच नेहमी, त्यामुळे काही कल्पना नाही' असं म्हणावं!
Pages