२ वाट्या बासमती तांदळाचा फडफडीत शिजवलेला भात,
पुदिनाच्या १० काड्या,
१ चमचा चणा डाळ, १ सुकी लाल मिरची, फोडणीचे जिन्नस व तेल, मीठ
१/२ वाटी नारळाचा चव.
कडीपत्ता, कोथींबीर.
हिरवी मिरची-आवडीप्रमाणे
पुदिन्याची पाने, हिरवी मिरची व नारळाचा चव मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करा.
कढईत फोडणीसाठी तेल घाला. चणा डाळ घाला. जीरे मोहरी तडतडल्यावर त्यात सुकी लाल मिरची घाला. कडीपत्ता, कोथींबीर घाला. परतवून मग त्यात पुदिना खोबरे मिरची पेस्ट घाला. जरा परतून घ्या. भात घाला. मीठ घालून परता व झाकण लावून १ मिनिट शिजवा. पुलाव रेडी!
१. खोबर्याची चव आवडणार्यांना हा भात नक्की आवडेल. सुके खोबरे घालूनही करता येइल पण ओल्या नारळामुळे येणारा किंचीत गोडवा येणार नाही.
२. पुदिना न घालताही हा पुलाव्/भात करता येइल.
३. कडीपत्ता आणि चणाडाळ जरा जास्तच घालावे.
४. पुदिना आपल्या आवडीनुसार कमी/जास्त घालावा.
सोप्पी पाककृती. करुन बघणार.
सोप्पी पाककृती. करुन बघणार.
अरे वा!१ सहीच दिसतोय. नक्कीच
अरे वा!१ सहीच दिसतोय. नक्कीच करुन बघणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मागे इथे कोणीतरी कोथिंबीरभाताची कृती दिली होती ती पण भन्नाटच होती. खुपदा केली मी ती
नक्कीच करुन बघणार>>> मी पण!
नक्कीच करुन बघणार>>> मी पण!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म., कोथींबीर भाताची कृती
म., कोथींबीर भाताची कृती देणार का? मी शोधले पण सापडली नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/30375 इथे आहे कोभा.
थँक यू मनिषा. सोपी दिस्तेय
थँक यू मनिषा. सोपी दिस्तेय कृती.
अरेव्वा चिन्नु! आता करुन बघेन
अरेव्वा चिन्नु! आता करुन बघेन नक्की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)