खेळात लॉट (ड्रॉ) कसे टाकायचे?

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 15 January, 2013 - 00:16

सध्या ऑफिसमध्ये दिदिध स्पर्धा होणार आहेत. त्यानुषंगाने समजा बॅडमिंटन या खेळात जर १७ खेळाडुंनी भाग घेतला तर ३२ चा लॉट (ड्रॉ) टाकावालागेल काय? असा लॉट टाकल्या नंतर यातील किती खेळाडूंना बाय देता येतो. याला मर्यादा आहेत. काय? अजुन एखादी निवड प्रक्रीया सांगावी.
टेबल -टेनिस - प्रकारात ५ च खेळाडु असतील तर लॉट कसा टाकावा ८ चा टकावा लागेल काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'बाद फेर्‍यां'चीच स्पर्धा असेल तर << जर १७ खेळाडुंनी भाग घेतला तर ३२ चा लॉट (ड्रॉ) टाकावालागेल काय? >> हें अपरिहार्य असावं. त्यांत कांही महत्वाच्या खेळाडुना प्रत्येक क्वार्टरमधे विभागून 'मेरिट'चा 'बाय देतां येतो व कांही खेळाडूना 'ड्रॉ' काढून 'बाय' देतां येतो. शिवाय, कांहीं क्रमांक 'अ', 'ब' असं लिहून आयत्यावेळीं येणार्‍या स्पर्धकांसाठी राखतां येतात.[मात्र अशा अगांतुकाना कुठे स्थान द्यायचं हें लॉट काढूनच ठरवावं].
१७ स्पर्धक असलेला ड्रॉ [ अर्धा भाग] असा होऊं शकतो -
DRAW2.JPG

[ ह्या अर्ध्या भागात ९ स्पर्धकांची नांवं येतील ; दुसर्‍या अर्ध्या भागात एक आयत्यावेळीं येणार्‍या स्पर्धकासाठीची एन्ट्री वाढवून ८ स्पर्धक येतील. अर्थात, 'बाय' वाढवून हा ड्रॉ अधिक काँपॅक्टही करतां येईल पण तशी गरज नसावी ]

धन्यवाद भाऊ !
अजुन दुसरा पर्याय नाही काय?
येथे मेरीटला सरळ फायदा मिळतो.

निवड प्रक्रियेबद्दल जाणकार माहिती देतील .
पण tracking साठी , ही खालील साइट पहा .
फ्री registration आहे .
आम्ही आमच्या कंपनीत स्पर्धा झालेल्या तेन्व्हा आम्ही schedule (matches) आणि results online प्रसिद्ध केल्या होत्या .

http://challonge.com/

<< येथे मेरीटला सरळ फायदा मिळतो.>> मेरिटवाल्या खेळाडूविरुद्ध पहिल्याच फेरीत कांहीशा कमी दर्जाच्या खेळाडूना खेळावं व बाद व्हावं लागलं तर त्याना सहभागाचा आनंद मिळत नाही; हें टाळण्यासाठी मेरिटवाल्याना एक-दोन फेर्‍या 'बाय' देण्याची प्रथा असावी.
दुसरा पर्याय- सतरापैकी नियमित खेळणारे ४ खेळाडू सोडून इतरांची प्राथमिक फेरी घ्यावी व त्यातून ४ खेळाडू निवडून ८जणांची अंतिम स्पर्धा ठेवावी.