मटा ऑनलाइन वृत्त । रांची
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या एका जवानाच्या पोटात दीड किलोचा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली असताना या हल्ल्यासाठी नक्षलवाद्यांनी वापरलेली स्फोटके व शस्त्रसाठा ' मेड इन पाकिस्तान ' होता , अशी धक्कादायक बाब समोर आली आहे .
लातेहारच्या जंगलात सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात तसेच सुरक्षा दलाच्या तुकडीवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ११ जवान शहिद झाले होते . हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठत बॉम्बस्फोट घडवून मृतदेहांच्या चिंधड्या उडवल्या होत्या . त्यातील एका जवानाचे पोट फाडून त्यात दीड किलोचा बॉम्ब लावण्यात आला होता , अशी धक्कादायक माहिती काल उघड झाली . या घटनेनंतर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्धची मोहिम अधिक तीव्र केली असून या नक्षलवाद्यांना थेट पाकिस्तानातून कुमक मिळाल्याचे समोर आले आहे .
लातेहार भागात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रे व बॉम्ब जप्त करण्यात आले . हा सगळा साठा पाकिस्तानातून पाठवण्यात आलेला होता . हा शस्त्रसाठा नेमका नक्षलवाद्यांकडे कसा आणि कोणी पोहोचवला , याचा शोध आता सुरक्षा यंत्रणा घेत आहेत . यापूर्वी चीनमध्ये बनवण्यात आलेली शस्त्रे अनेकदा नक्षलवाद्यांकडे सापडलेली आहेत . पाकिस्तानात बनलेली हत्यारे नक्षलवाद्यांकडे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे . एकीकडे भारत - पाकिस्तान सीमेवर तणाव वाढलेला असताना नक्षलवाद्यांना पाकिस्तानातून कुमक मिळत असल्याचा हा प्रकार म्हणजे भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी नवे आव्हानच मानले जात आहे .
Ref: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17980684.cms
भारतातील नक्षलवादी आता
भारतातील नक्षलवादी आता कुठल्या थराला जात आहेत ?
प्रतिष्ठीत समाजाविरुद्द चालु झालेल्या ह्या चळवळीला आता हींसक वळण लागले आहे.
मृतदेहात बाँब लपवून घातपाती हल्ला करणे हे एक नविन अस्त्र आता नक्षलवादी वापरू लागले
आहेत.
नक्षलवाद्यांकडे पाकिस्तानी हत्यारे मिळणे त्यांच्या सारखी मृतदेहाची विटंबना करणे हे ही चालु
झाले आहे.
ह्या वर काय ऊपाय ?
डँबिस१, दांतेवाड्याच्या
डँबिस१,
दांतेवाड्याच्या हल्ल्यातल्या आरोपींना मोकाट सोडणारे सरकार हटवणे हा एकमेव उपाय आहे. तसेच ज्यांनी हा खटला नीटपणे न चालवून ४३ साक्षीदार फुटू दिले त्यांच्यावरही कर्तव्यच्युतीचा गुन्हा दाखल करून शिक्षेस लावले पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.