पिळसा माश्याची खौले काढून त्याचे शेपुट, पर काढून टाका. त्याच्या पोटाकडील भागाला चिर देऊन पोटातील घाण काढून टाका. आता त्याच्या तुकड्या पाडा. (तुकडया करण्यासाठी धारदार कात किंवा विळी लागते. अन्यथा सरळ कोळणी कडूनच करुन घ्यायच्या तुकड्या). ह्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या.
(ह्या तुकड्या घरीच केल्या आहेत. फ्रिज मधुन काढून तुकड्या केल्याने गोठल्यामुळे व्यवस्थित तुकड्या पडलेल्या नाहीत तरी चांगल्या आकाराच्या मानून चालावे ही विनंती :हाहा:)
तुकड्यांना हळद, मसाला, मिठ चोळून घ्या. आवडत असल्यास आल-लसुण वाटण चोळा व एकत्र करुन वेळ असल्यास मुरवत ठेवा.
तवा मिडीयम फ्लेम वर ठेउन चांगला तापल्यावर त्यात तेल सोडा व त्यात तुकड्या तळण्यासाठी सोडा. पाच ते सात मिनिटे पहिली बाजू शिजून पलटा गरज वाटल्यास पलटल्यावर थोडे तेल साईडने सोडा. दुसरी बाजूही साधारण तेवढाच वेळ शिजवून घ्या.
(हे तेल जरा माझ्या हातून जास्तच पडले आहे. एवढ्या तेलाची गरज नसते. )
ह्या आहेत तयार चमचमीत, रुचकर पिळसा च्या तुकड्या. तोंडात अगदी पिळून पिळून खा.
पिळसा मासा म्हणजे बोईट ह्या माश्याचे मोठे रुप. फ्रेश असेल तर चविला छानच लागतो.
तोंपासु तुझं जाम कौतुक
तोंपासु
तुझं जाम कौतुक वाटतं, इतक्या सार्या प्रकारचे मासे ओळखता येतात, त्यांचे वेगवेगळे प्रकार बनवायचे, आणि मासे खवले वगैरे काढण्यापासुन स्वच्छ करणे म्हणजे कळसच आहे ___/\___
आम्ही याला बोईस
आम्ही याला बोईस म्हणतो....
अगदी तोंपासु पाकृ.
डॉ. धन्स. आम्ही ह्याच्या लहान
डॉ. धन्स. आम्ही ह्याच्या लहान माश्याला बोईट म्हणतो.
चिमुरी धन्यवाद.
जागु तोंपासु पण का कोण जाणे
जागु तोंपासु
पण का कोण जाणे मला नविन प्रकारचे मासे खाण्याची इच्छा होत नाही..
तरिहि इतरांसाठी छान पाककृती...
अप्रतिम या रविवार चा बेत
अप्रतिम
या रविवार चा बेत
आह्हा.. तोंपासु जागु.. ६,७
आह्हा.. तोंपासु
जागु.. ६,७ मिनिटे एकाच बाजूने?? एव्हढा वेळ लागतो हे मासे शिजायला???
आणी खाताना आकाराकडे लक्ष द्यायला कुणाला फुरसत मिळणारे..
जागु मी आले बादवे मला
जागु मी आले
बादवे मला प्रश्न पडलाय >>
तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या>> म्हणजे नक्की काय करा?
फ्रिज मधुन काढून तुकड्या केल्याने गोठल्यामुळे व्यवस्थित तुकड्या पडलेल्या नाहीत >> ई ना चॉलबे.. पुन्हा कर आणि नवे फोटो टाक.
तिन पाण्यातून स्वच्छ धुवून
तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या>> म्हणजे नक्की काय करा?>>>>>>>> तीन वेळा धुवायचा ना?
ई ना चॉलबे.. पुन्हा कर आणि नवे फोटो टाक.>>>>>> दक्षे, अजुन तोंपासु फोटो बघितल्यावर तरी तु खाणार आहेस का???
आणखी एक नवीन मासा!मस्त! पहिला
आणखी एक नवीन मासा!मस्त! पहिला फोटो बघितल्यावर बोइट आठवला होता पण पिळसा नाव माहित नव्हते. शेवटची ओळ वाचून माझ्या माशांच्या शब्दकोषात भर पडली!
जागू,अशीच छानछान माशांची मेजवानी फोटोंसकट देत राहा.
हा सिबास असावा.जागु, खायला
हा सिबास असावा.जागु, खायला शहाळ्यासारखं मऊ असतं का ह्याचं मांस?
वा मस्त दिसतोय. जागू कित्ती
वा मस्त दिसतोय. जागू कित्ती मासे माहिती ग तुला
बरीक आंबट काही नाही टाकायच?
हो याच्या बारीक स्वरुपाला
हो याच्या बारीक स्वरुपाला "बोईट " व मोठ्या स्वरुपात " गुंजुली " असे मालवण भागात म्हणतात.
जाजूजींकडून आणखी एका छान
जाजूजींकडून आणखी एका छान माशाची 'तोंड'ओळख !
मुंबईत 'बोयटे' बदनाम झालेत कारण जवळपासच्या खाड्यांतील प्रदूषणामुळे त्याना रॉकेलसारखा वास येतो असा कांहीसा खरा समज इथं पसरलाय. पण कोकणात हाच मासा [ गुंजुली] दिसायला चकचकीत व खायला चमचमीत समजला जातो ! खाडीत होडीतून जाताना हवेंत उंच उडी मारून लखकन चमकून पाण्यात सूर मारणारा मासा दिसला कीं ह्याला ओळखून घ्यावं. कच्छच्या आखातातून मुंबईच्या बाजारात येणारे बोयटे खूपच मोठे,स्वच्छ व चवदार असतात पण बहुधा पावसाळ्याच्या सुरवातीसच ते इथल्या बाजारात मिळतात. प्रथिनांसाठी हा मासा उत्तम, असं आमचे अट्टल मासेखाऊ फॅमिली डॉक्टर सांगत !!
II इति पिळसा पुराणंम II
मस्त टेस्टी मासा, जागु !
मस्त टेस्टी मासा, जागु !
वा वा शेवटचा फोटो भारी आहे.
वा वा शेवटचा फोटो भारी आहे.
तळलेल्या तुकड्यांचा फोटो सही
तळलेल्या तुकड्यांचा फोटो सही आहे!
अविगा, प्रितिभुषण, वर्षू,
अविगा, प्रितिभुषण, वर्षू, अंशा, गुरुदास, श्री, सिंडरेला, मृण्मयी धन्यवाद.
दक्षिणा तू खाणार असशील तर हवा त्या डिझाईनमध्ये मी कापायला तयार आहे मासा.:स्मित:
अवल तशी गरज नसते तळलेल्या तुकडांसाठी पण चवीसाठी हवे तर थोडे लिंबू किंवा चींच किंवा कोकम लावू शकतेस.
आशु नाही हा शहाळासारखा मऊ नसतो. इतर माशांसारखेच असते ह्याचे मांस.
भाऊ हो आमच्या इथेही खाडीतील माश्यांना पहिला तसा रॉकेलचा वास यायचा.
खूप टेस्टी मासा.कसलंही पीठ
खूप टेस्टी मासा.कसलंही पीठ ,तांदूळ रवा इ. न लावता तळल्याने एक वेगळी चव असणार. करून पाहेन.
आयला जागुतै धन्य आहेस
आयला जागुतै
धन्य आहेस
फुल्ल तोंपासू.. जागू आमच्या
फुल्ल तोंपासू..
जागू आमच्या इथे तिलापिया किंवा गोड्या पाण्याचे मासे मिळतात, पण गोड्या पाण्याच्या मास्यानां वेगळीच चव आणि वास येतो, मला खाववत नाहीत पण हे मासे हॉटेल मध्ये मस्त लगतात असे कसे काय?
जागु तु आणि मी जेव्हा
जागु तु आणि मी जेव्हा योगायोगाने भेटू तेव्हा नक्की करून आण, फक्त सुरमई.. एक तुकडा (बोटाच्या पेराएव्हढा) मी नक्की खाईन.
दक्षे मासे खाणार तू?
दक्षे मासे खाणार तू?
दक्षे, वा प्रगती आहे.
दक्षे, वा प्रगती आहे. डायरेक्ट सुरमय पासून सुरुवात... चला मग ... it started with one inch of fried suramay (cooked by Jagu from Maaybo) and then I never looked back... अशी गोष्ट सांगणार का?
भाऊनू.. माका तांच वाटलां....
भाऊनू.. माका तांच वाटलां.... गुंजूली..
झंपे, सत्यजित, तुम्ही तिथे
झंपे, सत्यजित, तुम्ही तिथे हजर असाल तरच खाईन
मस्तच. जागू तुझ्यामुळे नविन
मस्तच. जागू तुझ्यामुळे नविन नविन मासे खायची आवड निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात रत्नागिरीला नदीतले ताजे मासे खायला मिळाले. 'बळी' आणि 'चिवले' हे मासे खाल्ले. खाताना पहिल्यांदा तुझी आठवण आलीच.
पण का कोण जाणे मला नविन
पण का कोण जाणे मला नविन प्रकारचे मासे खाण्याची इच्छा होत नाही..>>>++१११
फोटो भारी ....
भारती, जाई, सत्यजीत, झंपी,
भारती, जाई, सत्यजीत, झंपी, परदेसाई, सामी सृष्टी धन्यवाद.
दक्षे मग मी तुला नक्कीच भेटेन.
तांदळाच्या कोरड्या पिठात
तांदळाच्या कोरड्या पिठात घोळवून मासे तळले की अजून छान लागतात !
हो येळेकर तसेच रवा लावून अजून
हो येळेकर तसेच रवा लावून अजून टेस्टी लागतात. मी बर्याचदा रवा लावते. काहीजण बेसन लावतात. पण हे लावल्याने माश्याची ओरी़जनल चव जरा बाजूला राहते.
Pages