५-६ मोठे, छान लाल आणि कडक टॉमेटो
२ मध्यम आकाराचे कांदे
१ लहान चमचा मेथी दाणे
१ लहान चमचा मोहोरी (ऐच्छीक)
१-२ लहान चमचा जिरे
चिमुटभर हिंग
३-४ लहान चमचे ति़खट (आवडी प्रमाणे)
१ लहान चमचा हळद
२ लहान चमचे कसुरी मेथी
३ टे स्पुन साखर
चवी नुसार मिठ
थोडी कढिपत्त्याची पाने
फ्रेश क्रिम (उपलब्ध नसल्यास ताजे दही फेटून)
फोडणीसाठी तेल
शिजवण्यासाठी थोडे पाणी
कोथिंबीर आवडीनुसार
टॉमेटो धुवून, अर्धा भाग करुन त्यांचे लांब पातळ काप करुन घ्यावे.
कांदाही तसाच पातळ लांबट कापून घ्यावा.
कढईत फोडणीसाठी तेल चांगले गरम करून घ्यावे. तेल आवडीनुसार कमी जास्त घ्यावे. बाकी ह्या भाजी साठी जास्त तेलाची गरज भासत नाही.
तेल छान तापल्यावर त्यात मेथी दाणे, वापरणार असल्यास मोहोरी घालावी.
हे छान तडतडल्यावर जिरे, हिंग, कढिपत्ता घालून थोडेसे परतून घ्यावे.
त्यावर कापलेला कांदा घालून २-३ मि. परतून घ्यावा.
आवडी प्रमाणे तिखट, हळद घालून घ्यावी.
आता कापलेला टॉमेटो घालुन सगळे जिन्नस एकत्र करावे.
गरजे नुसार पाणी घालावे. कांदा टॉमेटोला शिजताना पाणी सुटत असल्याने थोडे-थोडे आवश्यकतेनुसार घालावे.
झाकण ठेऊन ५ मि शिजू द्यावे.
आता साखर, मिठ घालून परत ३-४ मि शिजू द्यावे. पाण्याची कंसिस्टंसी गरजे प्रमाणे करुन घ्यावी.
कांदा टॉमेटो शिजल्यावर वरुन कसुरी मेथी चुरडून घालावी व भाजी झाकून ठेवावी.
२ मि नी झाकण उघडून मेथी भाजीत एकत्र करावी.
आता पर्यन्त भाजी योग्य प्रमाणात शिजली असेल.
सर्वात शेवटी फ्रेश क्रिम (नसल्यास फेटलेले दही) घालून, एकत्र ढवळून एक वाफ काढावी.
आचेवरुन खाली घेउन ताजी कोथिंबीर बारीक कापून घालावी.
कोथिंबीरीच्या जास्त प्रमाणाने सुद्धा चवीत छान फरक पडतो.
खास लक्श द्यायला न लागता पटकन होते.
सध्या मस्त लाल लाल टॉमेटो भरपूर उपलब्ध असल्याने आवर्जून करायला हरकत नाही.
आणि दही चालत असले तरी क्रिमची चव न्यारीच असते.
ह्यात पालक, मेथी ह्या ताज्या भाज्या देखील बारीक कापून घालता येतील.
मस्त नी सोपी रेसिपी .....
मस्त नी सोपी रेसिपी ..... साधारण अशाच प्रकारात करते मी ही भाजी, आता त्यात फेशक्रीम व कसुरी मेथी घालून पाहिन
फोटु??!!
फोटु??!!
तुमचा आपत्कालीन प्रयोग
तुमचा आपत्कालीन प्रयोग मजसारख्याला आवडून गेला. क्षुधाशांती आणि चवीसाठी मला हा उत्तम आहे.
- पिंगू
धन्यवाद तुम्हाला विनार्च खरं
धन्यवाद तुम्हाला
विनार्च खरं तर ह प्रत्येक घरात होणारा प्रकार आहे, थोड्या-फार फरकाने. काही मित्रांना ह्याची क्रुती हवी होती. म्हटलं इथे-तिथे लिहीण्यापेक्शा आपल्या मायबोलीवर लिहिली तर कायम स्वरुपी होईल. टायपींचे कष्ट कामी येतील.
हा!! आवर्जून फोटो काढला जात नाही खरा