Submitted by रसायन on 3 January, 2013 - 22:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
६ अंडी
ओलं खोबरं (साधारण चिरलेल्या कांद्यास १:१)
२ मोठे कांदे (अमेरिकन)
आलं-लसूण पेस्ट
तेल
जिरं
कोथिंबीर
मालवणी मसाला / गरम मसाला
लाल तिखट
क्रमवार पाककृती:
१. अंडी उकळून घ्यावीत. १५-२० मिनिटे लागतात. तोपर्यंत कांदे चिरून घ्यावेत. फार बारिक चिरले नाहीत तरी चालेल.
२. तेलावर कांदे सोनेरी रंगावर परतून घ्यावेत. त्यात खोबरं, आलं-लसूण पेस्ट घालून परतावे.
३. वरील मिश्रण + कोथिंबीर मिक्सरवरुन वाटून घ्यावे.
४. थोड्याशा तेलावर जिरं घालून मग त्यावर वाटण खमंग परतून घ्यावे.
५. हवे तेवढे पाणी घालून त्यात उकडलेली अंडी + मीठ + मालवणी / गरम मसाला + लाल तिखट घालून एक उकळी काढावी.
६. वरून आवडत असल्यास अजून कोथिंबीर घालावी.
७. पोळी / ब्रेड / भाताबरोबर ओरपावी
वाढणी/प्रमाण:
३
अधिक टिपा:
- सुकं खोबरंही चालेल बहुधा.. मी कायम ओलंच वापरतो
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मस्त !
मस्त !
अन्डी उभी कापा आणी थोडी शालो
अन्डी उभी कापा आणी थोडी शालो फ्राय करुन घ्या. त्यावर थोडा गरम मसाला भुरभुरावा..
आणी मग करीत हि अन्डी सोडावी.
मस्त दिसते आहे अंडाकरी.
मस्त दिसते आहे अंडाकरी.
वाह मस्तच
वाह मस्तच
सगळ्यांना खूप धन्यवाद! बंडु,
सगळ्यांना खूप धन्यवाद!
बंडु, मस्त आहे कल्पना.. पुढ्च्या वेळी नक्की करून बघेन..
इथेही एक रेसिपी आहे - एग करी
इथेही एक रेसिपी आहे - एग करी