स्वयंपाकघरात अन्न टिकविण्यासाठी/साठविण्यासाठी प्लास्टीक चा पिशव्या, डबे, बाटल्या इ. स्वरुपात वापर केला जातो. पण बर्याच लोकांकडून अज्ञानामुळे/ अनवधानाने योग्य प्लास्टीकचा वापर केला जात नाही. अन्नासाठी कायम फूड ग्रेड प्लास्टीकचा वापर केला जायला पाहिजे. कुठलीही प्लास्टीकची वस्तु विकत घेताना त्याच्या तळाशी फूड ग्रेड ची खूण (प्लास्टीकचा ग्लास / काटा व चमचा ह्या स्वरुपात एक खूण असते) बघून घ्यावी. तसेच एका त्रिकोणात १ ते ७ पर्यंत आकडे लिहिलेले असतात. १ हा आकडा असेल तर फक्त एकदा वापरून फेकून द्यावे लागणारे प्लास्टीक असते.
प्लास्टीक बद्दल समज, गैरसमज, फायदे, गैरफायदे, प्लास्टीक च्या वस्तुंची सफाई, पर्यावरणावर प्लास्टीकचा परीणाम व उपाय ह्या सर्वांबद्दल इथे ह्या धाग्यावर चर्चा करू या!
हे फूड ग्रेड चे सिंबल्स
हे प्लास्टीक रीसायकल गाईड
वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिक्स ग्रेड्सची तुलना:
दिनेशदा, आता भारतात पण
दिनेशदा, आता भारतात पण स्मार्ट स्टीलच्या तेलाच्या बाटल्या मिळतात. यामधे जवळ जवळ एक लिटर तेल मावतं. वर झाकणाला एक चंचुसारखा छोटासा पाइप असतो आणि वर स्टीलचं झाकण त्यामुळे तेलावर धुळ बसत नाही. मिस्टो चा ऑइल स्प्रे दिसतो तशीच तेवढीच स्मार्ट बॉटल असते ही. शिवाय स्टील असल्यामुले धुवायला सोपी. मॅट फिनिश असल्यामुळे आणि मस्त शेपमुळे अजिबात गावठी वाटत नाही.
निंबे, पुन्हा एकवार उपयुक्त
निंबे, पुन्हा एकवार उपयुक्त धागा.
मी वाचलेल्या माहितीनुसार, प्लास्टीक डब्यांच्या खाली त्रिकोणात ५ व अधिक संख्या असेल तर पदार्थ साठवण्याजोगे ते मटेरियल आहे असा ठोकताळा आहे.
५ पेक्षा खालील प्लॅस्टीकचे कंटेनरांची जसा वेळ जाईल तसे रासायनिक विघटान होऊन ते पदार्थात मिसळते व अशा पदार्थांच्या सेवनाने कॅन्सरची शक्यता वाढते
हे वाचल्याच्या दुसर्याच दिवशी, मी (अगदी चहा पत्तीच्या डब्यापासून) सगळे प्रमुख पदार्थ काचेच्या बरण्यांत साठवते आहे, आणि इतर स्टील चे डबे आहेतच.
नाही, तो लिक्प्रुफ म्हणजे
नाही, तो लिक्प्रुफ म्हणजे सांडत नाही म्हणून म्हणतेय, डबा स्टीलचा किंवा मनिष ने लिहिलाय तसा काचेचा असतो - पण अन्ब्रेकेबल नाही
>>
मग कंपनीचे नाव सांग ना. मला मिल्टनचा अनुभव चांगला नाही.
काचेचे लॉक & लॉक टाइप डबे >>>
काचेचे लॉक & लॉक टाइप डबे >>> मनीष, अरे पुपुवर बोललो होतो आपण
इथे निलम स्टोअर्स म्हणून आहे
इथे निलम स्टोअर्स म्हणून आहे तिथे मी घेतला होता, ते स्वतः बनवतात , कदाचित कुठल्या स्टीलच्या भांड्यांच्या दुकानात मिळू शकेल , बघ ट्राय करुन, चांगल आहे नक्की.
"melamine" नावाच्या material
"melamine" नावाच्या material चे डिनर सेट असतात. ते पण प्लास्टिकच असते ना ? त्याची durability किती असते? माझ्याकडे १० वर्षे, ५ वर्षे, २वर्षे अश्या व्हरायटीचे सेट आहेत जे पाहुणे आले की वापरले जातात. जुने झाल्यावर साफ करायला ताप होतो.तेलकट डाग जात नाहीत.surface खरखरीत होतो.
वापरण्यास योग्य कि अयोग्य ?
प्लास्टीक डब्यांच्या खाली
प्लास्टीक डब्यांच्या खाली त्रिकोणात ५ व अधिक संख्या असेल तर पदार्थ साठवण्याजोगे ते मटेरियल आहे असा ठोकताळा आहे.
५ पेक्षा खालील प्लॅस्टीकचे कंटेनरांची जसा वेळ जाईल तसे रासायनिक विघटान होऊन ते पदार्थात मिसळते व अशा पदार्थांच्या सेवनाने कॅन्सरची शक्यता वाढते
>>>
करेक्ट!
मंजूडीने उल्लेख केलाय त्याच मेल मधून मलाही ही माहिती कळली होती. तो मेल कुणाकडे असेल तर इथे डकवा कृपया!
लहानग्यांसाठी दूधाच्या बाटल्या ही चांगल्या कंपनीच्या वापरा प्लीज. माझ्या मते अॅव्हेंट म्हणून एक परदेशी ब्रँड आहे किंवा मदर मेरी का अशी काहीतरी पण एक रेंज आहे. त्यांच्या काचेच्या बाटल्या असतात दूधासाठीच्या! त्यांचे लहान बाळांसाठीचे प्रॉडक्स फार महाग आहेत. पण माझ्या मते वर्थ आहेत.
मनिमाऊ, या बाटल्या
मनिमाऊ, या बाटल्या नेहमीसारख्याच असतात. वेगळा पाईप वगैरे नसतो. फक्त झाकणाचे डि़झाईन खास असते. यामूळे तेलाचा कावळा ( पुर्वी शकुंतला नावाचे भांडे असायचे) वापरावा लागत नाही. कावळा कितीही संभाळला तरी तेलाचे ओघळ येतातच. ( एखादी बाटली घेऊन येऊ काय ? )
पण याचा तोटा नव्हे तर उलट फायदाच आहे कि या बाटल्यांत परत तेल भरणे अशक्य असते.
हो मला पण आठवतंय, मनीषचं
हो मला पण आठवतंय, मनीषचं पोस्ट वाचल्याचं.
कोरड्या वस्तु, जस की डाळी,
कोरड्या वस्तु, जस की डाळी, रवा, वगरे प्लॅस्टीक्च्या बरण्यांमधे ठराविक काळानण्तर ठेवण योग्य नाही का ??
"melamine" नावाच्या material
"melamine" नावाच्या material चे डिनर सेट असतात. ते पण प्लास्टिकच असते ना ? >>
मलाही मेलामाईन बद्दल सेम प्रश्न आहे.
मागे एकदा लग्नात गिफ्ट म्हणून आलेल्या प्लास्टीक पासून बनवलेल्या 'जेवणाच्या डिशेस' होत्या. मेलामाईन नव्ह्त्या. पण कालांतराने त्याचे प्लास्टीकचे पापुद्रे निघू लागले. साबांना सांगूनही फेकून देईनात. रोजच्या वापरासाठी असल्या डिशा? मला स्टीलची ताटे किंवा काचेच्या, चीनी मातीच्या डिशेस, ताटल्या आवडतात. मग एक दिवस साबा नसताना अख्खा सेट केरात टाकला. तर मेड उचलून 'मला हवाय' म्हणून घेऊन गेली.
आता मेलामाईनचा एक सेट अजूनही शिल्लक आहे. त्यानंतर मात्र स्वतः घ्यायची वेळ आली तेव्हा आवर्जून काचेच्या व चीनी मातीच्या डिशेस आणल्यात.
प्लॅस्टीक्च्या बरण्यांमधे
प्लॅस्टीक्च्या बरण्यांमधे ठराविक काळानण्तर ठेवण योग्य नाही का ??
>>
माझ्या मते फूड ग्रेड प्लास्टीक असेल तर चालायला हवे. नाहीतर काचेला रीप्लेसमेंट म्हणून प्लास्टीक येण्याचा उपयोग तरी काय!
जस की डाळी, रवा, वगरे
जस की डाळी, रवा, वगरे प्लॅस्टीक्च्या बरण्यांमधे ठराविक काळानण्तर ठेवण योग्य नाही का ??
>> स्मिता, इथे मुंबईत मी कडधान्य जसे की सबंध मूग, मटकी, चवळी, चने, वाटाणा सरळ काचेच्या बरण्यांतून "फ्रीज" मध्ये साठवते... इतके स्वच्छ व नीटस राहतात धान्य की बास, (फ्रीज डोअर मध्ये बसतील असे काचेचे कंटेनर्स मिळतात, तिथे ठेवते.. थंड पाणी घरात कुणी पित नसल्याने, फ्रिज डोअर संपूर्णपणे वापरता येते )
पण स्मिता, भाजलेला रवा वगैरे, स्टीलच्या चपट्या गोल डब्यांतून चांगला साठवता येतो की, प्लॅस्टीकच्या ऐवेजी म्हणतेय
बाळांना बाटलीपेक्षा
बाळांना बाटलीपेक्षा वाटीचमच्याने दूध पाजणे चांगले. भरपूर वेळ लागतो पण तेवढा वेळ बाळासोबत जातो.
चमचा बाळाच्या तोंडाशी ( कडेशी) जरा दाब देऊन ठेवला बाळाला फुर्र करुन थुंकणे अशक्य होते.
औषधे / घुटी भरवायला गोकर्ण नावाचे खास उपकरण मिळते. आमच्या घरची सगळी बाळं अशीच वाढली. त्यामुळे बाटलीची सवय मोडणे, हा प्रकारच नव्हता. शिवाय हि सर्व उपकरणे चांदीची असल्याने उकळून स्वच्छ करणे सोपे जाते.
हे फूड ग्रेड चे सिंबल
हे फूड ग्रेड चे सिंबल
दिनेशदा, बरोबर आहे पण
दिनेशदा, बरोबर आहे
पण प्रवासात वगैरे बाळांसाठी दूधाला बाटाल्याच न्याव्या लागतात ना, चालत्या गाडीत वगैरे वाटी चमचा कसा जमणार
लॉक & लॉक च्या ड्ब्याच्या
लॉक & लॉक च्या ड्ब्याच्या आतल्या बाजूला रब्बर असतो . तो साफ असणे महत्वाचे . ऑफीस मधील एका मैत्रीणिच्या डब्याचा रब्बर आतून खूपसा काळा झाला होता. त्यापेक्शा टप्पर वेअर चे डबे खूप सोप्पे वाटतात धूवायला.
शक्यतो प्लास्टीक चे डबे पावडर/साबण/स्कॉच ब्राइट ने घासू नयेत , हाताने आणि लिक्विड सोप ने च धुवावेत चरे पडत नाहित.
शिवाय हि सर्व उपकरणे चांदीची
शिवाय हि सर्व उपकरणे चांदीची असल्याने उकळून स्वच्छ करणे सोपे जाते.>>>> दिनेशदा +१
कडाधान्य जसे की सबंध मुख, मटकी, चवळी, चने, वाटाणा सरळ काचेच्या बरण्यांतून "फ्रीज" मध्ये साठवते >> हा प्रयोग करुन बघायला हवा
बाळांना बाटलीपेक्षा
बाळांना बाटलीपेक्षा वाटीचमच्याने दूध पाजणे चांगले. >>>
+१ मलाही राजससाठी बाटली कधीच वापरावी लागली नाही. फक्त एकदा आई व साबांचे ऐकून बाटलीचा प्रकार केला. डॉ. ओरडले, तेव्हा पुन्हा वाटी- चमचा असे मूळ पदावर आलो.
पण बाटलीमुळे जास्त दूध प्यायले जाते व वाटी चमच्या मुळे कमी क्वांटिटी असेही अनुभवले आहे.
असो. तो ह्या बाफचा चर्चेचा विषय नाही.
हे अजून एक सिंबलः
फूड ग्रेड चे सिंबल>>>> ओह ,
फूड ग्रेड चे सिंबल>>>> ओह , पर्लपेट च्या बरण्यांवर आहे का हे बघायला हव
मनीष, अरे पुपुवर बोललो होतो
मनीष, अरे पुपुवर बोललो होतो आपण >> मला कुठंतरी हे लिहिलं होतं एवढंच आठवतंय. तू आणि अल्पना म्हणताय तर पुपुवरच बोललो असेन
तो काचेचा डबा एकदम लीकप्रूफ आहे आणि काचेचा असल्यानं टपरवेअर किंवा इतर प्लॅस्टीक डब्यांप्रमाणे सारखा बदलायची गरज नाही. टपरवेअरमध्ये कितीही चांगलं प्लॅस्टिक वापरलं असलं तरी ते शेवटी प्लॅस्टिकच आहे
हे टपरवेअरच्या साइटवरून (http://www.tupperware.com.sg/safety_assurance_faq.ph)
Q: Does Tupperware consider polycarbonate to be safe for use in its consumer products?
A: Based on the repeated governmental scrutiny that polycarbonate has had by various regulatory agencies, Tupperware continues to believe the material is safe. As we have the highest regard and concern for the safety of our consumers, however, we will continue to closely monitor this scientific debate and conduct our own research into the best materials for use in Tupperware products.
They clearly state that they 'believe' and not 'guarantee'
पर्लपेट च्या बरण्यांवर आहे का
पर्लपेट च्या बरण्यांवर आहे का हे बघायला हव
>>
नसते गं. म्हणून तर मला रीप्लेस करायचेत आता. इन फॅक्ट तो आकडे असलेला त्रिकोणही नसतो.
पर्लपेट सारखेच सनसेट म्हणून एक प्रकार पाहिला/ऐकला आहे. जुळे किंवा ड्युप्लिकेट भावंड असावे.
हे प्लास्टीक रीसायकल गाईड
हे प्लास्टीक रीसायकल गाईड
वेगवेगळ्या प्रकारच्या
वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिक्स ग्रेडबद्दल मिळालेली माहिती.
चांगले आहेत हे तक्ते.
चांगले आहेत हे तक्ते. धन्यवाद.
टप्परवेअरचे आता काचेचेही डबे मिळतात (लंचसाठी ऑफिसात नेऊ शकतो अशा आकाराचे), झाकण प्लॅस्टिकचे जे लीकप्रूफ असते.
नसते गं. म्हणून तर मला
नसते गं. म्हणून तर मला रीप्लेस करायचेत आता. इन फॅक्ट तो आकडे असलेला त्रिकोणही नसतो>>>> ओह म्हणजे ते पण बदलायची गरज आहे.
टप्परवेअरचे आता काचेचेही डबे मिळतात>>> हे माहिती नव्हत, बघायला पाहिजेच
निंबे, घरी जाऊन कंपनी नाव
निंबे, घरी जाऊन कंपनी नाव बघते आणि लिहीते इथे त्या स्टील च्या लिक प्रुफ डब्याचे (ज्याचे झाकण लॉक अॅन्ड लॉक सारखे असते) मी अकबर अलीज मधून एक डबा नुकताच घेतला तसला अॅप्रो. १२५/- ला
बरं.. आणखी एक मुद्दा आपण
बरं.. आणखी एक मुद्दा
आपण टप्परवेअर चे डबे वै. घेतले की ते न फुटतात, तुटतात न खराब होतात, मग आपणच एका ठराविक कालावधीनंतर हे डिस्पोज करून नवे घ्यायला हवेत...
तुम्हाला काय वाटतं? आणि हा कालावधी किती असावा
चांगला धागा. मी मागे
चांगला धागा.
मी मागे स्टीलच्या फ्रीज बॉटल्स आणल्या होत्या. त्या अक्षरश: दोन / तीन महिन्यात खराब झाल्या. म्हणजे गंजण्याचा किंचित वास यायला लागला.
आता प्लॅस्टीकच्या बॉटल्स आहेत. त्या बदलुन चांगला ऑप्शन हवाच होता. काचेच्या बघते पण जरा रिस्की आहेत. स्टिलमधे चांगला ब्रँड वगैरे आहे का?
जेवण न्यायचे ते अनब्रेकेबल काचेचे लिकप्रुफ डबे इथे ठाणा मुंबईत कुठे मिळतात का?
लहान मुलांना देताना मात्र हे देता येणार नाहीत. अनब्रेकेबल असले तरी ते जड असतील. आणि वर्गात मारामार्या झाल्या तर काय होईल देव जाणे स्टीलचा डबा मुलांना उघडता येईल का?
मी सध्या डब्यातले जेवण अॅल्युमिनीयम फॉईल मधे गुंडाळुन देते. ( त्यामुळे पोळी सुकतही नाही) पण हे सेफ आहे का ते माहित नाही.
धान्य वगैरे प्लॅस्टीक बॅग्स मधे पॅक होऊन येते ते तसेच ठेवले तर चालते का? साधारण महिनाभरात संपतेच ना ते?
सध्या खुप मुलांकडे प्लासीकचे पाऊच सारखी वॉटरबॅग पहिलीये. पाणी संपले कि चपटी करुन ठेवता येते. पण त्यांच्याकडे बघुन त्या खुप चांगल्या प्लॅस्टीकच्या वाटत नाहीत. शिवाय आतुन धुणार कशा? त्यांच तोंड एवढ्स्स असतं.
सावली त्या चपट्या वॉटर
सावली त्या चपट्या वॉटर बॉट्ल्स नजरवेधक आहेत पण आरोग्याला हानिकारक. फुल्या मार त्यावर.
Pages