एक वाटी मटारचे दाणे, एक कांदा, ३-४ लसणीच्या पाकळ्या किंवा थोडीशी लसणीची पात, बेसन, २-३ हिरव्य मिरच्या, फोडणीसाठी तेल, हळद, मीठ, दाण्याचं कुट
एका पॅनमध्ये थोड्याश्या तेलावर मटारचे दाणे आणि हिरव्या मिरच्या नीट परतून घ्या. परतलेले मटार आणि मिरच्या ओबडधोबड वाटून घ्या. पिठल्यासाठी तेलाची फोडणी करून त्यात ठेचलेला लसूण किंवा लसणीची पात आणि कांदा परतून घ्या. त्यातच वाटलेले मटार घालून हळद -मीठ दाण्याचं कुट घालून घ्या. हे सगळं नीट परतलं की त्यात पेला-दिड पेला पाणी घालून उकळी आणा. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात बेसन घालून चांगलं हाटून घ्या. पिठलं रटरटेपर्यंत शिजू द्या. हे पिठलं पळीवाढच जास्त चांगलं लागतं.
हे पिठलं खरंतर मटारपेक्षा तुरीच्या दाण्यांचं किंवा सोलाण्याचं जास्त छान लागतं. मला तुरीचे दाणे आणि सोलाणे मिळत नसल्याने मटार घालून प्रयोग केला तर तोही बरा लागला.
जास्त झणझणित पिठलं हवं असेल तर मिरच्या मटारच्या दाण्यांबरोबर परतून वाटण्याऐवजी लसणीच्या पातीबरोबर वाटून पिठल्यात घालाव्या.
भज्जीची लहान बहीण दिसतेय. आजच
भज्जीची लहान बहीण दिसतेय.
आजच खाल्लीय.
मस्त!
मस्त!
अरे वाह.. सही..
अरे वाह.. सही..
साती, भज्जी म्हणजे काय? कसं
साती, भज्जी म्हणजे काय? कसं करतात?
शेंगदाण्याचं कूट का घालायचं ?
शेंगदाण्याचं कूट का घालायचं ? ते णसेल तर जास्त हेल्दी होईल ..
आमच्यात कशातही दाण्याचं कुट
आमच्यात कशातही दाण्याचं कुट घालतात आणि मला आवडतं म्हणून. नाही घातलं तरी चालेल की.
तुरीच्या दाण्याच करून पाहीन.
तुरीच्या दाण्याच करून पाहीन.
ताक अॅड केल्यास आणखी छान
ताक अॅड केल्यास आणखी छान लागेल, आधी करून पहाते, नक्कीच!
अहाहा.. सुंदरच !
अहाहा.. सुंदरच !
आज करून बघितलं, भारी झालेलं
आज करून बघितलं, भारी झालेलं

नवीन आणि वेगळ्याच रेसिपीसाठी थँन्क्स