चोविसीशी झुंजण्याचे, बिल भरावे लागते

Submitted by एक प्रतिसादक on 27 November, 2012 - 12:15

मूळ रचना कुठली हे जाहीर न करता विनम्रपणे माफी मागून विडंबन सादर करत आहे. वाचकांनी माफ करावे, रचनाकाराने माफ करावे.

रोज रात्री कारट्या, रागे भरावे लागते
पोरट्यांच्या शॉवराला, आवरावे लागते

पांढ-या केसास काळे, करवुनी भटकायला
जेसिबीने केस थोडे, विंचरावे लागते

धावण्यात फार नाही, मी कधी दमवत तुला
तू अशी चलाख, मला घाबरावे लागते

रोज संध्याकाळचा, मी लडखडत जातो तिथे
मारतो मी पेग सोळा, सावरावे लागते

मिळविता एकेक लाफा, कोसतो मी खोकतो
काम मग प्रत्येक डोक्याचे करावे लागते

चौकिमधुनी पोलिसा, धाडू नको बोलावणे
बैठकी त्या आठवूनी, थरथरावे लागते

फाटला जो स्वस्त होता, शर्ट या भीतीमुळे
चोविसीशी झुंजण्याचे, बिल भरावे लागते

यापुढे माळे बहुधा, याचसाठी बांधिले
कोण येथे कोण तेथे, निस्तरावे लागते

चार शिंतोडे कुणाला, दाखवत आहेस तू
ऐन गर्दीच्या ठिकाणी, पाझरावे लागते

कळफलक हा कळकळीने, पार झिजलेला तुझा
अक्षरा अंदाज पंचे. मग झरावे लागते

- सायकोडी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चार शिंतोडे कुणाला दाखवत आहेस तू
ऐन गर्दीच्या ठिकाणी पाझरावे लागते<<<

Lol

ऐन गर्दीच्या ठिकाणी Biggrin

बाकी - ठीकठाक, वृत्तात हवे होते, अधिक मजा आली असती. Happy

धन्यवाद

अजिबात अर्थ नाहीये या विडंबनाला..
नक्कल करायला गेलात पण शक्कल पुर्ण बिघडली आहे.
अजिबात आवडली नाही.

प्रोफेसर पेटलेयत बहुधा.

स्माईलींची उधळण काफियांची उधळण करावी इतक्या सहजतेने करताहेत Lol