माझ्या आजीला ( आई च्या आईला) व्रुध्धाश्रमात जायचे आहे. तिचे वय ८४ आहे. साधारण ठाणे, कल्याण , डोंबिवली, कर्जत पर्यंत एखादा व्रुध्धाश्रम कोणाला माहित आहे का ? चांगला स्वच्छ आणि काळजी घेणारे लोक पाहिजेत.
आजीला ४ मुली आहेत. माझी आई मोठी जी ६५ वर्षांची आहे. बाकीच्या सगळ्या जणी ही आता ६० ला आल्या. आजी गेली २ वर्षे सगळ्या मुलींकडे १/२ महिने रहाते. म्हणजे च रोटेशन मधे रहाते. तिची प्रक्रुती एकदम व्यवस्थीत आहे, खाणे पिणे काहीही चालते. एकदम फिरती आहे. वाचन भरपूर आहे. जरा वयामुळे फक्त ब्लड्प्रेशर आहे. बाकी काहीही आजार नाही. सध्या जरा डोळ्याने अधु झाल्या मुळे एकटी रस्त्यातुन चालु शकत नाही.
हा निर्णय तिचा तिने अगदी स्वेच्छेने घेतला. साधारण जानेवारी नंतर तिला व्रुध्धाश्रमात जायचे आहे. ( डिसेंबर ला तिच्या शेवटच्या नातवाचे लग्न आहे)
कोणास काही माहिती असेल तर क्रुपया सांगा.
मोकिमी आत्ता फोन नंबर नाही
मोकिमी आत्ता फोन नंबर नाही आहे माझ्याकडे पण डोंबिवली मधे २ वृद्धाश्रम आहेत. पैकी एकाची माहिती काही दिवसांपूर्वी लोकसत्ता मधेही आली होती. खिडकाळी मंदिरा जवळ हा आश्रम आहे. दुसरा एक आश्रम एमआयडिसी भागात आहे. मी चौकशी करुन नंबर देते तुला
लांब जायची तयारी असेल तर पनवेल जवळ "नेरे" येथे देखील वृद्धाश्रम आहे आणि त्यांच्या विषयी खूप चांगलं ऐकून आहे
पनवेल पण चालेल. फक्त एकदम
पनवेल पण चालेल. फक्त एकदम चांगला हवा.
दोन्ही विषयी चांगलं ऐकून आहे
दोन्ही विषयी चांगलं ऐकून आहे (ओळखीतल्यांचे आप्त तिथे असल्यामुळे) फोन नंबर त्यांच्याकडून घेऊन देते. तरी प्रत्यक्ष जाऊन खात्री करुन घेणे केव्हाही उत्तम
डोंबिवलीला गोपाळनगर येथे
डोंबिवलीला गोपाळनगर येथे मैत्री फाऊंडेशन वृध्दाश्रम आहे तो बरा आहे. मध्यंतरी आम्हालाही हवा होता म्हणून पहात होतो पण जागेच्या दृष्टीने अडचणीचा वाटला. बाकी सेवा चांगली आहे. हल्लीच त्यांनी कर्जतला जागा घेऊन नवीन चालू केलाय त्याबाबत चौकशी करता येईल. मी नंबर नंतर देते.
पनवेल येथेही चौकशी केलेली.. तिथे पटापट जागा भरतात. रजिस्ट्रेशन करुन नंबर लावावे लागतात.
मीरा, ठाण्यातले ब्राह्मण
मीरा, ठाण्यातले ब्राह्मण सोसायटीतले बोडस मोतीवाले ठाऊक आहेत ना? त्यांचा जांभूळापाड्याला वृद्धाश्रम आहे - http://jambhulpada.blogspot.in/
बहुतेक तोच वृद्धाश्रम पार्ल्यातल्या लोकमान्य सेवा संघाशी निगडीत आहे - http://demo.brique.in/lssparle/ananddham.php#
अतिशय चांगली माहिती ऐकलेली आहे. तुला अधिक माहिती हवी असेल तर संपर्कातून मेल टाक.
डोंबिवली मधे २ वृद्धाश्रम
डोंबिवली मधे २ वृद्धाश्रम आहेत. पैकी एकाची माहिती काही दिवसांपूर्वी लोकसत्ता मधेही आली होती. >>>
तेच लिहायला इथे आले होते.
शिवाय खोपोली मधील एक सहजीवन नावाच्या वृद्धाश्रमाविषयी ही लोकसत्ता च्याच एका अंकात लिहून आले होते. नेट वर शोधून काही रेफरन्से मिळाला तर बघते.
नव्या मुंबईत नेरूळला
नव्या मुंबईत नेरूळला स्टेशनजव़ळच आश्रय हा वृद्धाश्रम आहे.
http://www.justdial.com/Mumbai/Ashraya-Old-Age-Home-%3Cnear%3E-Nerul/022...
नेरुळलाच पुढे एस बी आय कॉलनीजवळ आनंदाश्रमही आहे. तिथेही वृद्धांची चांगली सोय होऊ शकते.
खोपोली येथे रमाधाम नावाचा खुप
खोपोली येथे रमाधाम नावाचा खुप जुना आणि खुप चांगला वृद्धाश्रम आहे..
http://www.karmayog.com/lists/oah5.htm
http://www.karmayog.org/oldagehomes/
मोकिमी, मी IOCL नागोठण्याला
मोकिमी, मी IOCL नागोठण्याला जाताना रस्त्यात 'जांभुळपाडा' ( अष्टविनायक, पाली रस्त्यावर) गावाजवळ एक 'स्नेहबंधन' वृद्धाश्रम पहाते. म्हणजे तो रस्त्यावर दिसत नाही, पण आम्ही फोटो काढण्यासाठी गाडी थांबवली होती तेव्हा तिथले आजी-आजोबा रस्त्यावर फिरायला आलेले होते. त्यांच्याशी एक क्वीक डायलॉग झाला होता. सगळे वेल टु डु कुटुंबांमधले, उत्साही आणि खुश वाटले. पुस्तकांवर गप्पा मारत एकमेकांना चिडवाचिडवी करत होते. मला आवडला तो ग्रुप. हा एरिया तुझ्या रिक्वायरमेंटमधे फीट होत नाही, पण अजुन कोणाला माहिती हवी असेल तर इथे लिहुन ठेवते.
पेण-रायगड ला
पेण-रायगड ला आहे.
http://www.ahilyamandal.org/sanjeevan-ashram.php
मोकिमी, हा घ्या त्यांचा नं.
मोकिमी, हा घ्या त्यांचा नं. मैत्री फाऊंडेशन - मालती केरकर ९८२०२८१३२९
धन्स नीलू.... करेनच फोन
धन्स नीलू.... करेनच फोन
मोहन की मीरा, संपादन सुविधा
मोहन की मीरा, संपादन सुविधा वापरून शीर्षकात बदल करून मुंबई, ठाणे विभागातील वृद्धाश्रम (vRuddhaashram) असे काही तरी करणार का, इतरांना भविष्यात मायबोली 'शोध' मधे शोधायला सोपे पडेल
रुनी बदल केला .... खुप माहिती
रुनी बदल केला ....
खुप माहिती जमली नाही...
http://www.karmayog.com/lists
http://www.karmayog.com/lists/oah5.htm
ह्या वेबसाईट वर वेगवेगळ्या ठिकाणच्या वृद्धाश्रमाचे पत्ते आणि फोन नंबर आहेत.
डोंबिवली खिडकाळी जवळ जे ओल्ड एज होम आहे त्याची माहिती खालील प्रमाणे
"श्री साईधाम"
खिडकाळी मंदीराजवळ
पाडले गाव
व्यवस्थापकः श्री कुलकर्णी
फोन नंबर ९८२०७४०९२६
नेरे आणि टिटवाळ्याच्या संस्थांचे नंबर एक दोन दिवसात देते इथेच
माझ्या ओळखीत एका कुटूंबातील
माझ्या ओळखीत एका कुटूंबातील ८२ वर्षांचे गृहस्थ सध्या डेंग्यु आणि अशक्तपणामुळे हॉस्पिटलात आहेत. तब्येत आता सुधारतेय. पण स्वतःहुन चालणे अजुन जमत नाहीय. खाणेही कोणी मुद्दाम भरवले तरच खातात, स्वतःहुन खाणे शक्य असुनही खात नाहीयेत. गृहस्थ स्वभावाने बरेच विक्षिप्त आहेत, चटकन कोणाचे ऐकणारे नाहीत. मुलीच्या घरी जाऊन राहायला तयार नाहीत. मुलगी त्यांच्या घरी राहु शकत नाही अशी परिस्थिती आहे.
पार्ल्यात किंवा अंधेरीम्ध्ये एखादे सॅनॅटोरियम किंवा तत्सम ठिकाण जिथे त्यांच्या खाण्यापिण्याकडे आणि औषधांकडे नीट लक्ष ठेवले जाईल असे कोणाच्या माहितीत आहे का? साधारण महिनाभरासाठी ही सोय हवी आहे.
कोणाला माहिती असल्यास कृपया लवकर कळवा.
वर साधनाने म्हणल्यासारखीच मदत
वर साधनाने म्हणल्यासारखीच मदत पण पुण्यामधे हवी आहे.
पुण्यामधे एखादे सॅनॅटोरियम, नर्सींग होम किंवा तत्सम ठिकाण जिथे खाण्यापिण्याकडे आणि औषधांकडे नीट लक्ष ठेवले जाईल असे कोणाच्या माहितीत आहे का? साधारण महिनाभरासाठी ही सोय हवी आहे.
@RJ, आत्ता आजच्या लोकसत्ता
@RJ, आत्ता आजच्या लोकसत्ता चतुरंग पुरवणी मध्ये पुण्याच्या आस्था नावाच्या संस्थेची माहिती वाचली. तुम्हाला कदाचित उपयोगी पडू शकेल.
अथश्री आस्था
स. नं. १३२/२ , पाषाण बाणेर लिंक रोड,
पाषाण पुणे ४११०२१
डॉ. विजय
आस्था कार्यालय
०२०-२५८६११३२
www.PSCL.in
बघा हेच ते दूर्मीळ प्राणी
बघा हेच ते दूर्मीळ प्राणी पूण्यातल्या पार्कातले
नेरळाला एक खूप छान
नेरळाला एक खूप छान वृद्धाश्रम आहे. बंगले / रुम्स भाड्याने/विकत घेऊन स्वतंत्र राहण्याची सोय आहे. आणि शिवाय वृद्धाश्रमाच्या बाकीच्या सोई आहेतच.
कळव्याला एका डॉक्टरने सुरू केलेल ओल्ड एक होम आहे. पण त्याचे डिटेल्स नाहीयेत माझ्याकडे.
साधना, पार्ल्यातल्या
साधना, पार्ल्यातल्या टिळकमंदिरात जाऊन चौकशी करायला सांग. वृद्धाश्रमासंबंधी त्यांच्याकडे मोठा डेटाबेस आहे. ते संपूर्ण यादी देतात पत्त्यांसकट.
बालाजी हॉस्पीटल, वाशिंद
बालाजी हॉस्पीटल,
वाशिंद (पुर्व)
असानगाव कसारा लोकल ने जाउ शकतो, (कल्याणपासुन ५ वे स्टेशन , टीटवाळ्यापासुन २ रे स्टेशन)
एका डॉक्टर जोडप्याकडुन चालवले जाते, व्यवस्था चांगली आहे. अतिवृद्ध , मेडीकल केअरची गरज असलेल्या वृद्धांसाठी उपयुक्त
मागे स्वाती२ ने याचा
मागे स्वाती२ ने याचा संधर्भात माहिती विचारली होती . तेव्हा पार्ल्यातल्या टिळक मंदिरात जाऊन मी ती यादी घेऊन आले होते आणि तिला माहिती दिली होती तीच तुला देत आहे
मेल चेक करणार का ?
कळव्याला एका डॉक्टरने सुरू
कळव्याला एका डॉक्टरने सुरू केलेल >>> मामी, डॉ. मंगला यांचे असेल तर अत्यंत वाईट आहे.