शाळा आठवतीये मला,
रेल्वे च्या पुलापासून ते गुलमोहराच्या झाडापर्यंत...
सरांच्या रठ्यांपासून ते म्याडमच्या लाडपर्यंत...
पटांगण ते थेट पाण्याच्या टाकीपर्यंत...
पांढरा फटक शर्ट ते गुढग्या इतक्या खाकीपर्यंत..
शाळा आठवतीये मला,
इंग्रजी च्या ग्रामर पासून, बीज गणिताच्या सुत्रा पर्यंत...
ई. भू. ना. आणि शस्त्रापासून, नाटकातल्या पात्रा पर्यंत...
मराठीच्या अभंगा पासून ते कलेच्या रंगा पर्यंत...
गंधक आणि पाऱ्या पासून ग्रह आणि ताऱ्या पर्यंत...
शाळा आठवतीये मला,
बुवाच्या प्याटीस पासून ते जगतापच्या वड्या पर्यंत...
चिंचा आवळे बोरांपासून सरबतच्या गाडीपर्यंत...
मैत्रिणी च्या गप्पांपासून, चुगल्या अन खोड्यांपर्यंत
मित्राच्या टपली पासून अगदी पार राड्यापर्यंत'
शाळा आठवतीये मला,
फळ्या पासून ते शेवटल्या बाकापर्यंत...
छातीतली धक धक आणि 'ती'च्या चाफेकळी नाकापर्यंत...
शाळा अशीच आठवत रहाणार मला,
'अ' पासून 'ज्ञ' पर्यंत आणि माझ्यातला "मी' असे पर्यंत...
------------------------------------------------------ प्रशांत ठाकूर (मनातल्या मनात - http://pra-shant.blogspot.in)
मित्राच्या टपली पासून अगदी
मित्राच्या टपली पासून अगदी पार राड्यापर्यंत' >>>>>>
मस्तच
अतिशय चित्रदर्शी लेखन एक
अतिशय चित्रदर्शी लेखन
एक सान्गू का रागावू नका ;
गझलेत आम्ही रदीफ वापरतो =एकच शब्द/शब्दसमूह जो शेरात सर्वात अखेरीस असतो अन तो तसाच यावा लागतो
इथे पर्यन्त हा शब्द तसा येतो वरम्वार
पण रदीफ वापरताना ती निभावावी लागते अर्थाच्या अन्गाने! तसे इथे पर्यन्त हा शब्द काही जागी फिट बसत नाहीये तो बदलला असता तर बरे झाले असते ..एखादे पालुपद असल्यासारखा अनावश्यक अन उगाच घुटमळणारा असा वाटतो आहे तो (काही जागीच बरका )
असो
पुलेशु
आपला नम्र
-वैवकु
सारे संदर्भ आल्या मुळे
सारे संदर्भ आल्या मुळे प्रत्येकाला आपली शाळा आठवली असणार .छान .
@ सारन्ग, विक्रान्त - धन्यवाद
@ सारन्ग, विक्रान्त - धन्यवाद !!!
@ वैवकु मनापासून धन्यवाद... मला रदीफ वैगरे काही जास्त कळत नाही...मी शिकतोय...
आणि रागाऊ नका काय? चुका दाखवणार कुणी असेल तर सुधारता येतात...कळलंच नाही तर सुधारायच्या कशा
नेमक कुठे ते कळल असत म्हणजे नक्कीच बदल करता येईल आणि मला नवीन शिकायला सुद्धा मिळेल....