Submitted by deepac73 on 20 October, 2012 - 14:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१/२ किलो रावस (skin and bone removed)
७-८ लसूण पाकळ्या + १/२ inch आले बारीक वाटून
तिखट, मीठ, हळद चवीनुसार
१ मोठा चमचा तेल
२-३ लसूण पाकळ्या ठेचून
१/२ वाटी सुके खोबरे किसून भाजून वाटून
क्रमवार पाककृती:
१. रावसाच्या तुकड्यांना तिखट, मीठ, हळद, आले-लसूण वाटण लावून १५ मिनीटे ठेवा
२. तेल गरम करून त्यात २-३ लसूण पाकळ्या ठेचून घाला.
३. आता त्यात मॅरीनेटेड रावस घाला आणि २-३ वाट्या पाणी घाला.
४. वाटलेले सुके खोबरे घालून हलक्या हाताने ढवळा.
५. मिश्रणाला उकळी येऊन ४-५ मिनीटे शिजू द्या.
६. रावस शिजल्याची खात्री करून गॅस बंद करा
७. गरम भाताबरोबर गट्टम
अधिक टिपा:
माझी लेक ह्याला "थाई करी" म्हणते
माहितीचा स्रोत:
साबा
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)