२ अंडी (रूम टेंपरेचर)
१ कप दूध (रूम टेंपरेचर)
१ कप मैदा (चाळून)
२ टेबलस्पुन अनसॉल्टेड बटर (वितळलेले)
चिमुटभर मीठ (साधे बटर वापरले तर मीठ नको)
इतर ऐच्छिक: पुढिलपैकी काहिही
मिरेपूड
इटालियन हर्ब्ज
चाईव्ह्ज (लसणाची कोवळी पात)
कांद्याची पात
'वर्ल्ड एग डे'
'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अंडी खाल्याने होणारे अनेक फायदे आहेत.
ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'वर्ल्ड एग डे' म्हणुन साजरा केला जातो. इंटरनॅशनल एग कमिशन तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
यंदाचा वर्ल्ड एग डे आज, शुक्रवार १२ ऑक्टोबर रोजी, साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त एक ब्रिटीश पारंपारीक पाककृती सादर करत आहे.
*********
'यॉर्कशर पुडिंग - Yorkshire Pudding' (यु के)
हे पारंपारिक पुडिंग रोस्ट मीट बरोबर खायची पद्धत आहे. मुळ रेसिपी मधे पोर्क / बीफ रोस्ट होत असताना खाली जी फॅट उतरते ती फॅट वापरुन ही पुडिंग्ज बनवतात. मेन उद्देश हा की फॅट फुकट जाऊ नये. ब्रेड ऐवजी ही पुडिंग्ज खातात. कुठल्याही मीट ग्रेव्हीबरोबर देखिल ही पुडिंग्ज खातात. काही वेळेस ही पुडिंग्ज बनवायला डक फॅट देखिल वापरतात.
अतिशय सोपी आणि पटकन होणारी ही पुडिंग्ज अगदी व्हर्सटाईल आहेत आणि आपण आपल्याला आवडेल त्या टॉपिंग बरोबर, ग्रेव्हीबरोबर ही खाऊ शकतो.
क्रमवार पाककृती
१. २ अंडी एका मोठ्या बोलमधे फोडा आणि हलकी फेटुन घ्या. हॅम्ड मिक्सर वापरता येइल किंवा नुसत्या व्हिस्क ने केले तरी चालेल.
२. यात आता दूध आणि १ टेबलस्पून वितळलेले बटर घला आणि परत मिक्स करा.
३. चाळलेला मैदा आणि चिमुटभर मीठ वरच्या ओल्या मिश्रणात घाला आणि नीट घोटुन घ्या. अजिब्बात गुठळ्या रहाता कामा नयेत. हे मिश्रण पातळसरच दिसेल. साधारण व्हिपिंग क्रिमच्या कन्सिस्टंसी चे.
४. एखाद्या धार पडेल अश्या भांड्यात (मेजरिंग मग) हे मिश्रण गाळुन घ्या. असे केल्याने काही बारीक गुठळ्या असतिल तर त्या काढुन टाकता येतिल. भांडे झाकुन बाजुला ठेवा. किमान अर्धा तास हे मिश्रण मुरू द्या.
५. आता ओव्हन २०० डिग्री सें ला तापत ठेवा.
६. मिनी मफिन पॅन्स किंवा साधे मफिन पॅन्स ओव्हन मधे ठेऊन गरम करुन घ्या.
७. ट्रे गरम झाला की बाहेर काढुन त्यात उरलेल्या १ टेबलस्पून पातळ बटर चे काही थेंब ट्रेच्या प्रत्येक वाटीत घाला आणि ट्रे जरा फिरवुन बटर तळाला नीट पसरू द्या.
८. ट्रे परत ओव्हनमधे ठेवा. अगदी ३० सेकंद...बटर थोडेसे ब्राऊनीश दिसायला लागले की ट्रे बाहेर काढा.
९. आता बाजुला ठेवलेल्या तयार बॅटरमधे १-२ टीस्पुन थंड पाणी घाला आणि चमच्याने एकदा ढवळून घ्या.
१०. हे बॅटर प्रत्येक वाटीत ३/४ लेव्हल पर्यंत भरा आणि ट्रे ओव्हन मधे ठेवा.
११. साधारण ८-१० मिनीटात पुडिंग्ज फुगायला लागतिल. वरतुन थोडा गोल्डन ब्राऊन रंग आला की ट्रे बाहेर काढा.
१२. ही पुडिंग्ज केक सारखी फुललेली दिसली तरी ओव्हनमधुन बाहेर काढल्यावर थोडी खाली बसतात अणि वाटी सारखा आकार बनतो.
ही तयार पुडिंग्ज आपल्याला आवडेल ती टॉपिंग्ज घालुन गरम गरम खा किंवा चिकन, मटण ग्रेव्ही बरोबर फस्त करा
कुस्करलेला टोफु + रोस्टेड रेड पेपर चटणी, काकडी + स्प्रिंग ऑनियन डिप आणि बटाट्याचा रस्सा + कोथिंबीर चटणी
दालचिनी फ्लेवर्ड मॅश्ड अॅप्पल्स विथ चॉकलेट सॉस
*****************
माझे प्रयोगः
- गोड पुडिंग्ज साठी बॅटरमधे थोडी साखर आणि दालचिनी पावडर घातली.
- काही पुडिंग्जमधे इटालियन ड्राईड हर्ब्ज घातले.
- काही पुडिंग्ज मधे किसलेले पार्मजान चीज आणि गार्लिक बटर घातले.
- २ पुडिंग्ज मधे बारीक चिरलेला कांदा + चाईव्ह्ज घातले. त्यापेक्षा पातीचा कांदा जास्त चांगला लागला असता असे वाटते.
*****************
मागच्यावर्षी वर्ल्ड एग डे निमित्त सादर केलेल्या पाककृती :
फंडु-अंडु - १ - 'मिनी पावलोवा' (ऑस्ट्रेलिया)
फंडु अंडु - २ - 'मार्बल्ड टी एग्ज' (चायना)
फंडु अंडु - ३ - 'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)
फंडु अंडु - ४ - 'ग्येरन झिम - Gyeran Jjim' (कोरिआ)
फंडु अंडु - ५ - डेझर्ट - 'स्नो एग्ज' (फ्रान्स)
****************************************************************
- यात रेझिंग साठी बेपा, बेसो असे कुठलेही घटक वापरत नाहित.
- बॅटर तयार केल्यावर किमान अर्धा तास झाकुन ठेवा.
- ओव्हन कडकडीत गरम असायला हवा.
- ट्रे आधी ५-७ मिनीटे ओव्हनमधे ठेऊन गरम करा.
- ट्रे मधे बटर घातल्यानंतर परत ट्रे ओव्हन मधे ठेवा.
हे सर्व केल्याने पुडिंग्ज कमी वेळात झटपट फुगतात.
- ही तयार पुडिंग्ज गरम गरम खाण्यात मजा आहे पण थंड झाल्यावरही चांगली लागतात.
टॉपिंग्ज साठी काही आयडियाज
तिखट:
- मॅश्ड पोटॅटो + कुठलिही ग्रेव्ही
- पावभाजी
- कॅरॅमलाईज्ड ऑनियन्स + कॅप्सिकम डिप / किंवा कुठेलेही क्रिमी डिप
- प्रॉन / क्रॅब मिट + मेयॉनीज
- कुक्ड चिकन पिसेस विथ पेरी पेरी सॉस
- फ्लेवर्ड क्रिम चीज आणि रोस्टेड रेड पेपर्स / ऑलिव्ह्ज
गोड:
- आयस्क्रिम + चॉकलेट सॉस
- फ्रुट कस्टर्ड
- जॅम + कस्टर्ड
- मॅश्ड फ्रुट्स + व्हिप्ड क्रिम
- लेमन फ्लेवर्ड क्रिम चीज
अजुन अनेक प्रकारची टॉपिंग्ज करता येतिल.. इमॅजिनेशनला भरपूर वाव आहे
मस्त!!! दालचिनी फ्लेवर्ड
मस्त!!!
दालचिनी फ्लेवर्ड मॅश्ड अॅप्पल्स विथ चॉकलेट सॉस<<<<<< बघुनच तोंपासु
क्लास! लाजो तू कसली कल्पक
क्लास! लाजो तू कसली कल्पक आहेस अगं.
कुकरी क्लास सुरू कर, जोरदार चालतील
सही
सही
लाजो अॅज युज्वल भारीच पण तु
लाजो अॅज युज्वल भारीच पण तु शाकाहारी आहेस का? की फक्त अंडे खातेस?
सही $$$$ दक्षी +१
सही $$$$
दक्षी +१
च्च... फक्त पहावं लागतय...
च्च... फक्त पहावं लागतय...
लाजो, बाई साक्षात दंडवत तुला.
लाजो, बाई साक्षात दंडवत तुला. कसलं सही झालय !
मस्त आहेत पुडिंग्ज!
मस्त आहेत पुडिंग्ज!
मस्त... आज संध्याकाळचा
मस्त... आज संध्याकाळचा नाश्ता
नाव मस्त आहे...आनि सोप पण
नाव मस्त आहे...आनि सोप पण वाटत्य ...ट्राय करुन पहाते
दक्षिणा +१ तु भारतभेटीला
दक्षिणा +१
तु भारतभेटीला आल्यावर एक कुकरी शो ठेवु आपण तुझा माबोकरांसाठी
स्लर्प्!स्लर्प्!!स्लर्प!!!!!
स्लर्प्!स्लर्प्!!स्लर्प!!!!!
अजून काहीच लिहिता येत नाहीये...
फंडूच आहे ही कृती. आपल्याला
फंडूच आहे ही कृती. आपल्याला जमणार नाही याची शंभरटक्के खात्री आहे मला.
अरे हे तर ते आपये का आपे असंच
अरे हे तर ते आपये का आपे असंच दिसतंय लय भारी बर झाला आपये ची आठवण करून दिल्या बद्दल
लाजोक्का... हे खास माझ्यासाठी
लाजोक्का... हे खास माझ्यासाठी का? युके...
सुंदर दिसताहेत.. वाटीसारखा
सुंदर दिसताहेत.. वाटीसारखा आकार नैसर्गिकपणे ! क्या बात है !
( या सिरीजमधे बरीच गॅप पडली कि )
सुंदर एकदम्..ओव्हन नसल्याने
सुंदर एकदम्..ओव्हन नसल्याने बनवता येणार नाही प्ण बघून नक्कीच खावेशे वाटताहेत. लाजोताई, आम्हा मावे वाल्यांसाठीपण काही मस्त रेसिपीज शोधून काढा ना. निदान दुधाची तहान ताकावर!
लाजो, लय भारी. खरं सांगू,
लाजो, लय भारी. खरं सांगू, गेले वर्षभर इथल्या ग्रोसरीच्या फ्रोझन सेक्शनमध्ये मी यॉर्कशर पुडिंग बघतेय पण का कोण जाणे नकोच वाटलं ते आणायला. तू टाकलेले फोटो मात्र फारच तोंपासु. घरी अवनमधून बाहेर आलेली गरमागरम पुडिंग्ज खायला मजा येईल. करुन बघणार एकदा तरी
मी करणार हे नक्कीच. मस्त
मी करणार हे नक्कीच. मस्त कृती..
तुस्सी ग्रेट हो लाजो!
तुस्सी ग्रेट हो लाजो!
हे आप्पेपात्रात करता येईल का?
हे आप्पेपात्रात करता येईल का? गॅसवर???
हे आप्पेपात्रात करता येईल का?
हे आप्पेपात्रात करता येईल का? गॅसवर???
बहुतेक जमेल. पण वर गच्च पण पोकळ असे झाकण ठेवावे लागेल. पातेले वगैरेसारखे.
मस्तच! खरंच सोप्पा आणि
मस्तच! खरंच सोप्पा आणि व्हर्सटाईल प्रकार.
एक शंका : दिलेल्या प्रमाणात २४ छोटे आणि ६ मध्यम आकाराची पुडिंग्ज झाली. ४ माणसांना भरपूर.... >>>> चौथं माणूस कोण?
पुडिंग मस्तच. मैद्याला पर्याय
पुडिंग मस्तच. मैद्याला पर्याय म्हणून काय वापरता येईल?
व्वा! मस्तच!
व्वा! मस्तच!
@मामी, कृपया येथे फक्त
@मामी, कृपया येथे फक्त रेसिपीशी निगडीत शंकाच विचाराव्यात.
ज ब री !
ज ब री !
मस्त दिसतंय हे
मस्त दिसतंय हे
पुडिंग मस्तच.... ते बघूनच मला
पुडिंग मस्तच.... ते बघूनच मला आजच मायाक्रोओह्वन खरेदी करायचा आहे. माझे ९ माणसांचे कुटुंब आहे. तर मी कोणता मावो (लेटेस्ट, कंपनी, लाईटबिल वाचविणारा) घ्यावा ? कृपया मदत करावी. ह्या साठी स्वतंत्र धागा हवा. कदाचित असेलही पण मी नवीन असल्यामुळे मला माहिती नसेल.
आज ११ ऑक्टोबर, वर्ल्ड एग डे
आज ११ ऑक्टोबर, वर्ल्ड एग डे म्हणून साजरा केला जात आहे.
सध्या घरी नवरात्राची पूजा आहे.
ह्या सिरीज मधली नवी पाककृती पुढच्या आठवड्यात
Pages