परदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी
मंडळी, माझ्या स्वत:च्या अनुभवावरून आणि माझ्या इतरत्र परदेशी काम करणाऱ्या मित्रांच्या बोलण्यात एक गोष्ट सतत प्रकर्षाने जाणवते ,ती म्हणजे परदेशी काम मिळवणे आणि करणे यामध्ये आपण भारतीय थोडे मागे आहोत.
तुम्हाला आश्चर्य वाटेल,पण १९८०-९० च्या काळात दुबई आणि इतर गल्फ कंट्रीज मध्ये बहुतांश म्हणजे ७०-८०% कर्मचारी भारतीय असायचे! पण गेल्या १०-१५ वर्षापासून अरेबियन कंट्रीज मध्येही फिलिपिनो /मलेशियन/श्रीलंकन/पाकिस्तानी/बांगलादेशी /नेपाली /इजिप्शियन आणि उच्चपदावर ब्रिटीश/अमेरिकन नागरिकांचे प्रमाण वाढते आहे .
कित्येक आफ्रिकन कंट्रीज मध्ये तर सरसकट चायनीज कंपन्यांना सगळी कंत्राटे मिळत असून साहजिकच फक्त चीनी कर्मचारी भरले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द अमेरिकेत भारतीय NRI पेक्षा फिलीपाईन्स या छोट्याशा देशातील जास्त नागरिक कामासाठी आहेत.
माझ्या मते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत लक्ष घालून योग्य ती पावले उचलली पाहिजेत. त्याचबरोबर भारतीय तरुणांनीही अधिकाधिक प्रयत्न करून आणि आवश्यक ते शिक्षण/प्रशिक्षण आणि अनुभव घेवून परदेशी नोकऱ्यांची कास धरावी. आज सुदैवाने मुंबईत अनेक चांगले एजंट्स असल्याने निदान गल्फ मध्ये तरी भारतीय ४०-५० % पर्यंत आहेत,पण त्यातही केरळ आणि गुजरात येथील लोकच जास्त प्रमाणात आहेत .
या विषयावर आपली सर्वांची मते /अभिप्राय/सूचना अभिप्रेत आहे.जगाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर परदेशी भारतीय कर्मचाऱ्यांचा टक्का वाढायलाच हवा, ज्यायोगे परदेशी चलनाची गंगाजळी सतत भरलेली राहील,असे मला वाटते. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असूनही जर आपण जगाला योग्य ते मनुष्यबळ पुरवू शकत नसू,तर यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय?
"एकमेका सहाय्य करू...अवघे धरू सुपंथ!"
मंदार कात्रे - mandar.eng@gmail.com
सरकारी कालेजात डाक्टर शिकवून
सरकारी कालेजात डाक्टर शिकवून तयार करतात ना, तेव्हा अॅडमिशन घेतानाच २ 'तगडे' जामिनदार अन ५ लाखाचा बॉण्ड स्टँप पेपरवर लिहून घेतात, की किमान ५ वर्षं देशाबाहेर जाणार नाही. अन सरकार सांगेल तेव्हा अन तितकी नोकरी करीन. खेड्यात. तेंव्हा ३५-४० हजार फी / वर्ष भरून शिकायला मिळतं. (ते ही मेडिकल सीईटी क्रॅक केल्यानंतर. १७५+ मार्क अस्तील तरच.)
हे सरकारी धोरण आहे.
नाही तर खाजगीत जा, ३०-४० लाख डोनेशन भरा अन वर्षाला ४ लाख फी अन बाकी खर्च वेगळा करून तद्दन बोगस शिक्षण अन बोगस, पण 'रेकग्नाईज्ड' डिग्री घ्या. हे डाक्टरला होऊ शकतं तर बाकी काय अनस्कील्ड लेबररस आहेत का, ज्यांना देशाबाहेर जाऊ देणे हा देश 'अॅफोर्ड' करू शकतो?
इथली डेव्हलप्मेंट करायला, या देशाचं भलं करायला काय अकलेची १००% एफ.डि.आय. करायला हवी आहे का तुम्हाला??? गळे काढताहेत गल्फ मधे ४०% च मजूर भारतीय आहेत म्हणून. लाज वाटली पाहिजे.
परदेशात जायला बंदी नसावी. पण
परदेशात जायला बंदी नसावी.
पण तिथं पैका मिळवून आलेल्यांना पुन्हा भारतात (बढतीच्या! की कुठल्याच) नोकर्या देऊ नयेत. या मताचा मी आहे.
नाहीतर , परदेशात काहीबाही करणारे इथे येऊन एच ओ डी / म्यानेजर/ डायरेक्टर होतात आणि इथले तसेच बसतात.
आधीच्या पोस्टी कुठे आहेत....
आधीच्या पोस्टी कुठे आहेत.... गायबल्या काय ? की परदेशात टक्के वाढवायला गेल्या???? (गोंधळ्लेली बाहुली)
अहो अॅडमिन , धागा वाहता
अहो अॅडमिन , धागा वाहता झालाय जरा स्टॅटिक करा की.
बरेच लोक चर्चेत चांगली मते मांडतायत.
धागा काल वाहता नव्हता... आता
धागा काल वाहता नव्हता... आता कसा झाला?
बाकी गुज्जू, केरळी, मराठी
बाकी गुज्जू, केरळी, मराठी मानसिकतेबद्दल नेहमीचेच मुद्दे मांडता येतील.
मराठी माणसे व्यवसायात पडत नाही वगैरे वगैरे.
किती मराठी आईवडील मुलाला ऊन्हाळ्याची सुटी वाया गेली तरी चालेल पण जा जाऊन मारवाड्याच्या दुकानात महिनाभर काम कर असे सांगतात.
ज्यांचे व्यवसाय आहेत ते किती लोक मुलांना त्यांच्या आवडीनुसार शाळा बुडवून दुकानात काम करू देतील?
आडात नाही तर पोहोर्यात कुठून येणार?
मुलांना वाढवतांना त्यांच्यावर शिक्षण एके शिक्षण आणि नोकरी एके नोकरी वातावरणाचा एवढा प्रभाव पडतो की वेगळी वाट चोखाळण्यास ते धजावतच नाहीत आणि प्रयत्न केला तरी त्यांना त्यांच्या कम्युनिटीतून सपोर्ट मिळत नाही. ज्याला आपण ऊपजत धंदेवाईक विचारसरणी म्हणातो ती तश्या सपोर्टिव वातावरणाच्या अभावामुळे डेवलप होऊच शकत नाही.
>>>>>>
एकदम सहमत....
रच्याकने.... माझे बाबा लहान पणा पासुन दोन किराणामाल दुकानांची जमाखर्च वही लिहायचे ( म्हणजे अकाउंट्स) त्या आधी आजोबा व मोठे काका लिहायचे. जस्ट गंमत म्हणुन. प्रत्यक्षात पुढे ते दोघेही बंधु इंजिनीअर झाले. बाबांनी जेंव्हा स्वतःचा व्यवसाय सुरु केला तेंव्हा त्या लहान वयात केलेल्या त्या उमेदवारीचा प्रचंड फायदा झाला. त्या मुळे मी जेंव्हा कॉमर्स घेवुन सी. ए. करायचे ठरवले, तेंव्हा १३ वी पासुन त्यांनी मला त्यांच्या सी.ए. कडे उमेदवारीला पाठवले. मी कॉलेज मधे असताना आकाश कंदिल आणि फटाके विकायचे , मुलांच्या ट्युशन घ्यायचे . पण त्या अनुभवाचा आज प्रचंड फायदा होतो आहे. आर्थात तेंव्हा आम्हा बाप लेकांना अनेक नातेवाईकांनी वेड्यात काढले होते.
परदेशात काहीबाही करणारे इथे
परदेशात काहीबाही करणारे इथे येऊन एच ओ डी / म्यानेजर/ डायरेक्टर होतात आणि इथले तसेच बसतात.>>>>
आहो त्याला कारणीभुत आपली मानसिकता आहे!!!! परदेशात शिकलेला आहे म्हणजे तो महानच असणार हे आपण ग्रुहित धरलेले आहे... त्यातच खरी गोम आहे. पण तो कुठे शिकलेला आहे... कोणत्या युन्व्हर्सीटीतुन शिकला आहे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत....
आजकाल भारतातही ही फॅशन आली आहे. नुसतं एम.बी.ए. अशी डिग्री मिरवतात...अरे पण काय कुठुन, कोणत्या संस्थेतुन....
धागा वाहता तरी कसा
धागा वाहता तरी कसा म्हणणार... काल केदारच्या पोस्टी नंतर मी माझी पोस्ट टाकली होती. आज केदारची पोस्ट पहिली दिसते आहे आणि माझी आणि नंतरच्या गायब्ल्या... माझ्या नंतर "बी" ने पण लिहिलं होत
मोकिमी, तुमची पोस्ट त्यांच्या
मोकिमी, तुमची पोस्ट त्यांच्या आधी होती बहुतेक. धागा वाहता दिसतो आहे. काल मी टाकली पोस्ट तेव्हा पान नं.२ सुरू होतं.
वाहता धागा आहे ? मीरा, सी ए
वाहता धागा आहे ?
मीरा, सी ए आणि एम बी ए, यांचा झगडा जूनाय. कुठे आपली ती खडतर आर्टिकलशिप आणि कुठे यांचे अर्ध्या हळकुंडाने, पिवळे होणे !! एम बी ए.. चा गुजराथी फुल फॉर्म मस्तच आहे, મને બદ્ધા આવડેશ ! !
असो, एकंदर मंदारला आता चर्चेत रस राहिलेला नाही, असे वाटतेय.
तेरड्याचा रंग ३ दिवस.. आता
तेरड्याचा रंग ३ दिवस.. आता ते नव्या धाग्याच्या जुळणीत असतील.
जालबाज दिसताहेत.. धागे धागे
जालबाज दिसताहेत..
धागे धागे से बुने महाजाल
असो, एकंदर मंदारला आता चर्चेत
असो, एकंदर मंदारला आता चर्चेत रस राहिलेला नाही, असे वाटतेय.>>>
दिनेशदा +१०००००
ते एक पिल्लु सोडुन देतात... आपण फोडतोय डोकी....
परदेशात काहीबाही करणारे इथे
परदेशात काहीबाही करणारे इथे येऊन एच ओ डी / म्यानेजर/ डायरेक्टर होतात आणि इथले तसेच बसतात>>>
माफी असावी पण हे फारच जनरलाईझड विधान आहे. माझे स्वतःचे आयटी मधले अनुभव. मी ओरकल मध्ये असताना जेंव्हा बाहेरून एक जन वरती डोक्यावर आला तेंव्हा अनेक गोष्टी सुधारल्या. उदाहरणार्थ उगाचच रात्री रात्री पर्यंत बसने म्हणजे खूप काम करणे ह्या गोष्टीला फाटा मिळाला. अनेक लोकांची प्रमोशनस झाली. वर्क कल्चर बरेच सुधारले. हाच अनुभव नुसत्या माझ्या डीपार्टमेंट मध्ये नव्हे तर बाकीच्या ३-४ डीपार्टमेंट झाला.
दुसरा अनुभव झेनसार मधला. जे जे ऑनसाईट जावून आले त्यांना वेगळे वलय मिळाले. एक प्रकारची असूया बाकीच्यान्मध्ये झाली. मग त्या लोकांना आपण फार वेगळे आहोत असे वाटले. मग त्यांनी पण पुरेपूर फायदा उठवला. त्यामुळे सरसकट असे विधान काही पटत नाही.
पण तिथं पैका मिळवून
पण तिथं पैका मिळवून आलेल्यांना पुन्हा भारतात (बढतीच्या! की कुठल्याच) नोकर्या देऊ नयेत. या मताचा मी आहे. नाहीतर , परदेशात काहीबाही करणारे इथे येऊन एच ओ डी / म्यानेजर/ डायरेक्टर होतात आणि इथले तसेच बसतात.
>> १००% अमान्य.
१. तुमचे असे मत का झालेय ह्याचे कारण न देता असे एकांगी मत मांडले म्ह्णजे ते सर्वमान्य होईल असे नव्हे.
२. परदेशात लोक काहीबाही करतात हा तुमचा गैरसमज आहे. इथली प्रोसेसेस एकदम कडक असतात, जर तुम्ही उत्पादकता (प्रॉडक्टिव्हीटी) दाखवू शकत नसाल तर तुम्हांला कंपनी घरी बसवायला वाट पाहत नाही, ईथे वशिला ई चालत नाही.
३. भारतीय कंपन्यांचे जास्तीत जास्त प्रोजेक्ट्स हे विदेशी कंपन्या मध्ये असतात, त्या अनुषंगाने जर त्या देशातील कामाचा (वर्क कल्चर) अनुभव जर आपल्या भारतीय व्यक्तीला असेल तर त्याला निश्चितच प्रेफरन्स मिळतो . अशी व्यक्ती दोहोंमधला समन्वय उत्तमरित्या साधू शकते जे लोकल कर्मचार्यांना थोडे त्रासदायक असते आणि अशी व्यक्तीला वि देशी कंपनी सुद्धा प्रेफरन्स देते. महत्त्वाचे कारण म्हणजे कम्युनिकेशन गॅप वर सर्वात जास्त पैसा खर्च होतो.
४. आणि व्हिसा ई ची कटकट कमी होते.
अजुन खूप काही कारणे आहेत जी तुमच्यासारख्या विचार करणार्या लोकांना मान्य होणार नाहीत पण जोपर्यंत तुम्ही परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवत नाही तोपर्यंत सांगून काही फायदा नाही.
असो.
મને બદ્ધા આવડેશ ! !>>>>
મને બદ્ધા આવડેશ ! !>>>>
(अरे माझ्या पोस्टीनी बाकीच्या पोस्टी अज्ञातवासात ढकलल्या की काय?! सॉरी!)
आणि व्हिसा ई ची कटकट कमी
आणि व्हिसा ई ची कटकट कमी होते.
अशा व्यक्तीला भारतात काम करायला विसा कशाला लागतो? ( म्हणजे अपॉइंटमेंटची जागा म्हणजे त्या व्यक्तिचे एच क्यु भारत हवे. , कार्यक्षेत्र भारत किंवा कुठेही असु शकेल.
ते गुजरातीत काय आहे?
ते गुजरातीत काय आहे?
अशा व्यक्तीला भारतात काम
अशा व्यक्तीला भारतात काम करायला विसा कशाला लागतो?
>>>>
पण भारतीय व्यक्तीला विदेशात जायला व्हिसा तर लागतो ना !! असे समन्वयकांना प्रोजेक्ट संदर्भात वारंवार विदेशवारी करावी लागते, व्हिसा साठी पैसा, वेळ आणि रिसोर्सेस ही खर्च होतात तेही वाचतात.
नमस्कार मंडळी, मला चर्चेत रस
नमस्कार मंडळी, मला चर्चेत रस राहिला नाही,असे नाही.पण मला २ दिवसात अतिशय कमी वेळ नेट वापरता आले होते. त्यामुळे फार काही करता आले नाही.
दुसरे म्हणजे एवढी चांगली चर्चा चालू असताना जुने प्रतिसाद डिलीट का झाले? त्या चर्चेतून घेण्यासारखे बरेच काही होते,असे वाटते ...
असो,डिलीट केलेले प्रतिसाद पुन्हा वाचता येण्याची काही व्यवस्था नाही नां इथे?
फडतूस. या चर्चेला वाहते कुणी
फडतूस. या चर्चेला वाहते कुणी केले?
अॅडमिन यांनी केले असेल तर कमाल आहे! त्यापेक्षा बंद करून टाकायचा ना धागा?
कात्रे साहेब,
वर माझा एक प्रतिसाद आहे. त्या आधीचे जितके आज सकाळी सापडले, ते डकवतो इथे.
>>
केदार | 4 October, 2012 - 18:44
मराठी माणूस सगळ्यात मागे आणि केरळी माणूस सगळ्यात पुढे आहे >>
साहजिकच आहे. कारण केरळी फॅमिली भारतातच राहते. त्यामुळे कर्त्या पुरूषाला पैसा पाठवणे भाग आहे. पण मराठी फॅमिली ही बहुतांश त्या माणसासोबत राहते.
हा विषयच(टक्का वाढवणे ) अवातंर आहे. टक्का वाढवणे म्हणजे काय? परदेशी लोक रिक्रूट करताना तो कुठला आहे हे बघून त्याला घ्यायचे की त्याला काय येते ते बघून? अहो परदेशात सोडा खुद्द पुण्यात देखील मराठी माणूस कमी अन इतर प्रातांतील जास्त असे आहे. (नौकरीत) पुण्याच्या बॉर्डरवर जिकडे तिकडे आता हिंदी माणूसच दिसतो. अन हिंदीत बोलले जाते. (मी विरोधी नाही, पण टक्का वाढविन्याच्या गप्पा आहेत म्हणून लिहितोय की पुण्यात टक्का वाढवा स्मित )
असा एक विचार तुम्ही केला आहे का?
भारतात गेल्या ७ वर्षात भरमसाठ पगारवाढ झाल्याने फिलिपिन्स, रोमानियन आणि इस्ट युरोपियन लोकांचे प्रमाण आता परदेशात जास्त दिसते कारण ती लोकं तुलनेने कमी पैशात काम करून देतात त्यामुळे बॉटम लाईन सुधारण्यासाठी लोअर लेवलचे काम तिकडे पाठविले जातात, साहजिक भारताची निर्यात तुलनेने कमी होते आहे.
२००३ च्या टाईम मध्ये २०१५ पर्यंत भारताचे आर्थिक अॅडव्हान्टेज संपलेले असेल अश्या आशयाचा लेख आला होता. तसेच काहीसे होताना आज तरी दिसते आहे.
दुसर्या देशांचे मॅन्युफॅक्चरिंग भारतात येणे आता केवळ अशक्य झाले आहे. चायना आपल्यापेक्षा खूप पुढे निघून गेली, शिवाय चायनात भ्रष्टाचार कमी. त्यामुळे परत इथे दुसरे देश मॅन्युफॅक्चरिंग आणतील (कार्स सोडून, निव्वळ निर्यात मॅन्युफॅक्चरिंग) अशी आशा देखील बाळगता येत नाही कारण इथे देशातील नॅनोचा प्रोजेक्टच दुसरीकडे हलवावा लागतो अशी परिस्थिती आहे.
परकिय चलनाचा खूपच थोडा भाग पगारातून येतो. व्यवसाय आणि परदेशात भारतीय उद्योगाची गुंतवणूक हेच उपाय आहेत. टाटांचे उदाहरण डोळ्यासमोर इतर उद्योजकांनी ठेवावे.
तसेच जसे जसे देश प्रगत होतो तसे लोक परत येतात / येऊ पाहतात.
मी नताशा | 4 October, 2012 - 17:50
मोहन कि मीरा छान पोस्ट
चनस | 4 October, 2012 - 18:27
मोहन कि मीरा>>+१
प्रफुल्लशिंपी - सहमत
मी उसगावात असताना एक पंजाबी ड्रायव्हर काका भेट्ले होते, ते २२ वर्षापासुन तिकडेच राहतात.. मी महाराष्ट्रीय आहे म्हट्ल्यावर ते म्हणाले 'तुमच्या इकड्ची लोक ़कमी आहेत संख्येने, आम्ही आलो तेव्हा खुप लोकांना बोलवुन घेतलं होत. मराठी लोक असं करत नाहीत' अरेरे
परदेसाई | 4 October, 2012 - 19:00
मराठी माणूस बहुतेकवेळा शिकून सवरून परदेशात जातो.. आणि तेही कायदेशीर कागदपत्र करून.
कंटेनरमधे कोंबून, कॅनडा/मेक्सिकोतून घूसखोरी करून, व्हिसीटर व्हिसावर येऊन बेकायदेशीर रहाणार्यांची यादी केली तर बहुतांशी पंजाबी, गुजराती, केरळी सापडतील, मराठी सहसा नाहीच.
'बोलावून घेणे', 'इतर भाईबंदाना कामाला आणणे' हे बहुतेकदा बेकायदेशीर असतं. देशी दुकानात आणि पेट्रोलपंपावर याची हजारो उदाहरणे सापडतील.
इथे मायबोलीवर असलेल्या परदेशी लोकांमधे किती बेकायदेशीर घूसलेत, हात वर करा... बघुया मोजून..
दुसरं: मराठी माणूस शक्यतो नोकरी करतो धंदा नाही. तुमच्या कंपनीत तुमच्या शिकल्या-सवरल्या भाईबंदाना लावून देण्याची संधी तुम्हाला किती वेळा मिळते?
बाकी ठिकाणी माहीत नाही, पण इथे आलेल्या कित्येक आंध्रमंडळींकडे खोटी सर्टिफिकेट असतात. प्रत्यक्षात काम सांगितले की मग पितळ उघडे पडते. (याची दखल अमेरिकेच्या सरकारलाही घ्यावी लागली होती).
म्हणून परदेशी भेटणारा प्रत्येक मराठी हा सुशिक्षीत असतो... इतरांप्रमाणे नाही.
आणि म्हणून तो फारशी मदत करू शकत नाही, असं मला वाटतं
(विषयांतर आहे, पण रहावलं नाही).
इब्लिस | 4 October, 2012 - 19:22
परदेसाई तुमचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.
पण सुशिक्षित असतो म्हणूनच की काय मराठी माणूस दुसर्या मराठी माणसाला मदत करत नाही, असे असावे का?
संपादन
चैतन्य ईन्या | 4 October, 2012 - 19:56
मला परदेसैंचा मुद्दा जास्त रास्त वाटतो. मी स्वतः २००८ साली यूके ला आलो. २००८-०९ च्या कठीण परिस्थिती मध्ये मला सगळ्यांचीच मदत झाली. अगदी गुज्जुंची देखील. फक्त एक जाणवले की मराठी माणूस तडजोड करण्यात कमीपणा मानतो. उदारणार्थ जर का एखाद्या गुज्जू कुटुंबाला नोकरी नसेल तर तो चक्क दुसऱ्या गुज्जुकडे जावून राहील त्याच्या सगळ्या कुटुंबासकट. ह्याचा त्यांच्या समाजात फारसा बाऊ होताना दिसत नाही. पण एखाद्या मराठी कुटुंबाने असे केले आहे हे अपवादात्मक आहे. आणि केलेच तर बाकीचे त्याच्याकडे तुच्छतेने बघतात. हेही खरे आहे की जेंव्हा फक्त नोकरीचा मुद्दा येतो तेंव्हा मुळातच जागा कमी असतात आणि मराठी माणसाला मुळातच दुसऱ्या मराठी माणसाला घेणे थोडे अवघडच जाते.
परदेसाई | 4 October, 2012 - 20:02
सुशिक्षित असतो म्हणूनच की काय मराठी माणूस दुसर्या मराठी माणसाला मदत करत नाही <<<
असं नसावं.. मला वाटतं धंदा न करण्याची वॄत्ती याला मोठं कारण आहे...
नोकरीत कुणा मित्राला, गाववाल्याला, नातेवाईकाला आणावं हे सहज शक्य होत नाही.
एक जाणवले की मराठी माणूस तडजोड करण्यात कमीपणा मानतो. १००%
एखाद्या मराठी कुटुंबाने असे केले आहे हे अपवादात्मक आहे १००% (घेणारा ठेवून घेईलही पण राहणार्याचा स्वाभिमान बहुतेकवेळा आड येतो)..
'मी बरा माझं काम बरं', आणि 'उगाच काहीतरी बेकायदेशीर असेल तर त्रास होईल..' या मधे मराठी माणुस अडकलेला असतो..
Kiran.. | 4 October, 2012 - 20:19
परदेशी नोकरी केल्याने देशात पैसा येतो असा जर सिद्धांत मांडला जात असेल तर किती पैसे मिळतात हे पहायला नको का ? केरळी वि मराठी असा मुद्दा इथे चर्चेला घेतलेला नाही याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
परदेशातल्या दराने पैसे मिळत असताना ते भाव पाडल्याने आता तुलनेने सुस्थितीतले भारतीय दुबईत जाण्यास उत्सुक नसतात हा मुद्दा आहे. म्हणजेच भारतात राहून जो रोजगार मिळेल त्या तुलनेत दुबईत राहून परवडणार नसेल तर त्याचा उपयोग काय ? (बिहारी, केरळी आणि काही राज्यातले मजूर ज्या पद्धतीने एका खोलीत राहतात ते इतर राज्यातल्या तरुणांना शक्य नाही.)
खरे तर परदेशी नोकरी केल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असेल तर तो त्या देशासाठी चिंतेचा विषय आहे. फिलिपाईन वर ही परिस्थिती आलेली आहे. तिथल्या तरुण मुली कुठली नोकरी करतात हे सर्वश्रुत आहे. अशा देशासाठी हा सिद्धांत कदाचित लागू पडत असेल. आपल्याकडे नाही.
चैतन्य ईन्या | 4 October, 2012 - 20:25
किरण.. ह्यांना १०००००% अनुमोदन. बाहेर नोकरीला जाणे फारसे अभिमानास्पद आहे असे माझे मत नाहीये. इथे मला जे करायला मिळते तेच माझ्या देशात मिळत असते तर फार आनंद झाला असता. आता मुळातच संधी कशी मिळते ह्यावर आणि संधी कशी घेतो ह्यावर पण अवलंबून आहे.
रमेश भिडे | 4 October, 2012 - 21:53
केरळी लॉबी आहे बाबा सगळीकडे ,मी स्वत: लिबिया ला होतो २ वर्ष ,हे मल्लू फार गोची करतात बाकीच्यांची .
माझा विक्रांत म्हणून एक मित्र आहे अबुधाबी ला,तो सांगत होता कि तो डेस्कॉन या पाकिस्तानी कंपनीत होता ,तेव्हा रमजान म्हण्यात खाण्या-पिण्याचे पदार्थ सुद्धा दिसता कामा नयेत या पाकी अधिकार्यांना ,अशी सख्त तंब होती
सौदी अरेबिया मध्ये रमजान महिन्यात एखादा मुस्लिमेतर रस्तायावर दिवसा अन्न -पाणी घेवून चालला असेल किंवा खात असेल तर त्याला लाथा -बुक्क्यांनी मारून तिथले पोलीस जेल मध्ये टाकतात ,असे ऐकले
......मग का जावे आम्ही सौदी ला ? सांगा कात्रे भाऊ.......................
साबण | 4 October, 2012 - 22:00
हा नियम सर्वाना आधी माहेत असतो. मग मुद्दाम त्याना लाळ गाळायला लावायला का बरे न्यावेत? व्यवस्थीत पिशवीत बांधून न्यावेत.
मल्लू, क्न्नडा, तमिळी गोची करतात.... याला पूर्ण अनुमोदन.
sulu | 4 October, 2012 - 22:02
दिनेशदा +१
मला असेही वाट्टे की, मराठी तरूणी-तरूणानी जिथे पैसा जास्त कमावता येईल तिथे जाऊन कमावलाच पाहिजे. सगळ्यानाच स्वतःचा 'आयात्-निर्यात'-भिमुख धंदा करणे शक्य होत नाही त्यानी नोकरीमधून खूप पैसा कमवावा.
पंजाबी, गुजराथी लोकांकडून एक गोष्ट मात्र खूप शिकण्यासारखी आहे.. ती म्हणजे कमावलेल्या पैशातला थोडा भाग आपापल्या समाजासाठी वापरायचा. ते आपण केले पाहिजे. करतोही आहोत सध्या...
चांगले नियोजन करावे -
२२-२४ वर्षांपर्यंत भरपूर मन लावून शिकावे.
२४-३५ - नंतर १०-११ वर्षे निरनिराळे देश, लोक, संस्कृती पाहात काम शिकावे. न लाजता कुठलेही काम असो, फायदा होत असेल तर शिकून घ्यावे.त्या शिकलेल्या कामातून एक असे क्षेत्र निवडावे की त्यात तुम्ही 'तज्ञ्' होवू शकाल.
३५-५० - तुमच्या ज्ञानाच्या आधारावर भरपूर पैसा कमवावा. वाचवावा. छान स्वत्:चे कुटुंब बनवा.प्रकृती उत्तम ठेवा.
५०- पैसा उपभोगावा. त्याचवेळी, तुमचा समाज, शाळा, कॉलेज्,शहर, राज्य, देश याना उपयोगी पडेल असा पैसा दान करावा. नवीन पिढी ला ला उपयोग होईल असे तुमचे अनुभव त्यांच्याबरोबर वाटावेत.
sulu | 4 October, 2012 - 22:09
केदार +१
चमन | 4 October, 2012 - 23:14
केवळ भारताबाहेर जाऊन काम करणे आणि विदेशी पैसा देशात ओतणे हेच परकीय चलन जमवण्याचे महत्वाचे साधन कसे?
भारतातल्या तंत्रज्ञान सेवा देणार्या कंपन्या आहेत की त्या खोर्याने परकीय चलन आणतात भारतात. तसेच सोन्याचे दागिने, हिरे ही सुद्धा परकीय चलन मिळवणारी मोठी बाजारपेठ आहे.
चायना एवढी मोठी नसली तरी तयार कपडे, खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू ई. निर्यात करणारी मोठी बाजारपेठ आहेच.
देशाच्या गंगाजळीत भर टाकण्यासाठी मी परदेशी जाऊन काम करतो असा ऊदात्त किंवा आपली गंगाजळी वाढवण्यासाठी आपण तरुणांना परदेशी पाठवले पाहिजे असा आत्मघातकी विचार जर खरच करण्याची वेळ जेव्हा येईल तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील न म्हणता 'बरबाद' म्हणण्याच्या स्थितीत असेल.
एकूण लोकसंख्येपैकी परदेशी नोकरी करणारा ट्क्का कितीसा, त्यात त्यांनी भारतात गुंतवलेल्या पैशाचा ट्क्का कितीसा, त्यात मराठी लोकांचा ट्क्का? बापरे हे म्हणजे 'मुंबईतल्या बिहरींनी पाठवलेल्या पैशांवर नितीशकुमारांचे बिहार राज्याचे बजेट अवलंबून' असे झाले.
बाकी गुज्जू, केरळी, मराठी मानसिकतेबद्दल नेहमीचेच मुद्दे मांडता येतील.
मराठी माणसे व्यवसायात पडत नाही वगैरे वगैरे.
किती मराठी आईवडील मुलाला ऊन्हाळ्याची सुटी वाया गेली तरी चालेल पण जा जाऊन मारवाड्याच्या दुकानात महिनाभर काम कर असे सांगतात.
ज्यांचे व्यवसाय आहेत ते किती लोक मुलांना त्यांच्या आवडीनुसार शाळा बुडवून दुकानात काम करू देतील?
आडात नाही तर पोहोर्यात कुठून येणार?
मुलांना वाढवतांना त्यांच्यावर शिक्षण एके शिक्षण आणि नोकरी एके नोकरी वातावरणाचा एवढा प्रभाव पडतो की वेगळी वाट चोखाळण्यास ते धजावतच नाहीत आणि प्रयत्न केला तरी त्यांना त्यांच्या कम्युनिटीतून सपोर्ट मिळत नाही. ज्याला आपण ऊपजत धंदेवाईक विचारसरणी म्हणातो ती तश्या सपोर्टिव वातावरणाच्या अभावामुळे डेवलप होऊच शकत नाही.
इब्लिस | 5 October, 2012 - 00:39
हं.
इतकी चर्चा झाली तरी कुणालाही धागा कर्त्यांनी केलेला विनोद सापडला नाहीये.
च्या&&#$र्#, इस्कटून जोक सांगायचा म्हंजे जरा कठिण आहे.
तर मंडळी, जोक असा आहे
>>माझ्या मते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत लक्ष घालून योग्य ती पावले उचलली पाहिजेत. त्याचबरोबर भारतीय तरुणांनीही अधिकाधिक प्रयत्न करून आणि आवश्यक ते शिक्षण/प्रशिक्षण आणि अनुभव घेवून परदेशी नोकऱ्यांची कास धरावी. <<
म्हणजे,
या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने, या देशात शिकून तयार झालेल्या 'डोक्यांना' देशाबाहेर कटवायचे प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना शिकविण्यासाठी आधी एक तर माझ्या ट्याक्स चा पैका खर्च केला पाहिजे, अन मग नंतर त्यांना बाहेर देशी पाठविले पाहिजे. देश गेला तेल लावत. हाकानाका! डालर आणून फेकू थोडे. अन थितं बसून चर्चा करू माबोवर अन इतर मसं वर, भारत मागासलेला कसा आहे त्याबद्दल डोळा मारा तिकडं बाप 'गेला' तर मला अर्धं जग पार करून येता येत नाही म्हणून अंत्यसंस्कारांचं व्हीडू शूटींग काढून आसवं ढाळू...
अकलेचे दिवाळे म्हणतात, ते हेच!
आपण काय विचार मांडतो आहोत, याचा विचार न करता उचल्ला कीबोर्ड, लागले टंकायला!
बघा,
जोक इस्कटून सांगितलाय.
हसू कुनाकुनाला येतंय??
(संतप्त) इब्लिस.
संपादन
इब्लिस | 5 October, 2012 - 00:49
सरकारी कालेजात डाक्टर शिकवून तयार करतात ना, तेव्हा अॅडमिशन घेतानाच २ 'तगडे' जामिनदार अन ५ लाखाचा बॉण्ड स्टँप पेपरवर लिहून घेतात, की किमान ५ वर्षं देशाबाहेर जाणार नाही. अन सरकार सांगेल तेव्हा अन तितकी नोकरी करीन. खेड्यात. तेंव्हा ३५-४० हजार फी / वर्ष भरून शिकायला मिळतं. (ते ही मेडिकल सीईटी क्रॅक केल्यानंतर. १७५+ मार्क अस्तील तरच.)
हे सरकारी धोरण आहे.
नाही तर खाजगीत जा, ३०-४० लाख डोनेशन भरा अन वर्षाला ४ लाख फी अन बाकी खर्च वेगळा करून तद्दन बोगस शिक्षण अन बोगस, पण 'रेकग्नाईज्ड' डिग्री घ्या. हे डाक्टरला होऊ शकतं तर बाकी काय अनस्कील्ड लेबररस आहेत का, ज्यांना देशाबाहेर जाऊ देणे हा देश 'अॅफोर्ड' करू शकतो?
इथली डेव्हलप्मेंट करायला, या देशाचं भलं करायला काय अकलेची १००% एफ.डि.आय. करायला हवी आहे का तुम्हाला??? गळे काढताहेत गल्फ मधे ४०% च मजूर भारतीय आहेत म्हणून. लाज वाटली पाहिजे.
संपादन
@ साबण, મને બદ્ધા આવડેશ ! !
@ साबण,
મને બદ્ધા આવડેશ ! ! = मने बद्धा आवडेश. एम. बी. ए.
मला सगळे आवडते.
हे वाक्य 'मने बद्धुं आवडे छे'
हे वाक्य 'मने बद्धुं आवडे छे' असं आहे. त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे 'मने बद्धुं आवडे' किंवा 'आवडेश'. त्याचा अर्थ 'मला सगळेच येते अथवा कळते' . आवडवुं म्हणजे (एखादी गोष्ट करता)येणे. मराठीतले 'आवडणे' नव्हे. एम्.बी. ए वाले सर्व़ज्ञ असल्यासारखे वागतात त्यावरून हा टोमणा आहे.
इब्लीस जी आभार !
इब्लीस जी आभार !
हीरा +१ गुज्जु मधे आवडणे ला "
हीरा +१
गुज्जु मधे आवडणे ला " गमे" हा शब्द आहे. त्यांच्या भाषेत "आवडे" म्हणजे "येणे" "कळणे"
त्यांच्या भाषेत "आवडे" म्हणजे
त्यांच्या भाषेत "आवडे" म्हणजे "येणे" "कळणे"
हाय्ला! हे माहीत नव्हतं हे मला नवीनच आवडेश @ मोकिमी & हीरा धन्यवाद.
हीरा धन्यवाद. धगा वाहता
हीरा धन्यवाद. धगा वाहता झाल्याने महत्वाची चर्चा नष्ट झाली आहे
धागा वाहत कशाला गेला? मोकिमी
धागा वाहत कशाला गेला?
मोकिमी एकदम बरोबर. बहुतेक मराठी माणसे धंद्याचे गणित मांडु शकत नाहीत, कारण तडजोड आणी कमीपणा न घेण्याची वृत्ती आडवी येते. माझ्या मामेबहीणीने १३ वी कॉमर्स करतांनाच नोकरी करायला सुरुवात केली. आज भरपूर अनूभवामुळे नोकरीत जम बसलाय.
मुलांना लहानपणापासुनच हे प्रशिक्षण दिले गेले पाहीजे.
इब्लीस तुमचे काही मुद्दे एकदम बरोबर. काही वर्षापूर्वीच पेपरमध्ये आले होते की चायना भारतापेक्षा अनेक क्षेत्रात पुढे जातय म्हणून. ते लोक अतीशय महत्वाकांक्षी आहेत. इंग्लिश भाषेत ते आपल्या मागे असल्याने त्यांनी चांगले शिक्षक आयात केले भाषेकरता. प्रचंड लोकसंख्येमुळे तिथे रोजगार कमी आणी मनुष्यबळ जास्त त्यामुळे ते बरेच पुढे गेलेत, त्याचे श्रेय त्यांच्या सरकारच्या विचारसरणीला पण द्यावे लागेल.
<चायना आपल्यापेक्षा खूप पुढे
<चायना आपल्यापेक्षा खूप पुढे निघून गेली, शिवाय चायनात भ्रष्टाचार कमी.> ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या पाहणी आणि मानांकनानुसार करप्शन पर्सेप्शन इंडेक्समध्ये भारत ३.१ च्या रेटिंगने ९५ व्या क्रमांकावर तर चीन ३.६ च्या रेटिंगने ७५व्या क्रमांकावर आहे.
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या पाहणी आणि मानांकनानुसार करप्शन पर्सेप्शन इंडेक्समध्ये भारत ३.१ च्या रेटिंगने ९५ व्या क्रमांकावर तर चीन ३.६ च्या रेटिंगने ७५व्या क्रमांकावर आहे.
अरे देवा, म्हण्जे आपल्याइथे सुरू आहे त्याहिपेक्षा जास्त भ्रष्टाचार शक्य आहे?? मला वाटलेले आपण भ्रष्टाचारत उच्चतम (खरे म्हणजे निचतम) पातळी गाठलीय. यापेक्षा जास्त शक्य नाही.
Pages