आपण गणपतीला दुर्वा का वाहतो? हा विचार मनात आला. माहित असेलेल एक उत्तर – गणपतीला प्रिय म्हणून दुर्वा गणपतीला वाहिली जाते. पण माणूस स्वार्थी आहे स्वार्थ असल्या शिवाय तो कुणालाही काही ही वाहणार नाही. इंटरनेट वर बसून दुर्वाचे महत्व शोधू लागलो. सहजच यजुर्वेदातील दुर्वेचे महत्व सांगणार एक श्लोक वाचण्यात आला.
काण्डात्काण्डा प्ररोहन्ती परूष: परूषस्परि.
एव नो दुर्वे तनु सहस्रेण शतेन च.
(यजुर्वेद १३.२०)
[ऋषी : अग्रणी, देवता-पत्नी,छंद: अनुष्टुप]
हे दुर्वा एका काण्डा-काण्डा शत, सहस्त्र आणि असंख्य बाहुने चहु बाजूना पसर अर्थात विस्तार कर आणि आम्हा प्रजाजनांना समृद्ध कर.
आर्थिक कारण:
गणपती अर्थात गणाचा अध्यक्ष अर्थात राजा. वैदिक काळात गायी, घोडे, शेळ्या हे मानवाच्या उपयोगी येणारे पशु. बैल-शेतीला, गाय-दुध, दही आणि तुपाला, घोडे प्रवासाला, युद्धाला इत्यादी आणि शेळी मांस आणि वस्त्रांसाठी (त्या काळी अधिकांश लोक पशुंचे चर्मचा वापर वस्त्र म्हणून करायचे). या सर्वांसाठी लागणार हिरवीगार दुर्वा. अर्थात राज्यात दुर्वेनी भरपूर कुरण असतील तर पशु पुष्ट होतील आणी प्रजाजन समृद्ध होतील. शिवाय वाळलेल्या दुर्वेचे अन्य उपयोग - बसण्यासाठी आसन, इत्यादी.
मानवाची अमर होण्याची इच्छा
मृत्युची भीती सर्वांनाच वाटते. अमर होण्याची इच्छा मानवत असणे साहजिकच आहे. उन्हाळ्यात वाले माळ- रान पाऊस पडताच क्षणात हिरवगार होते. शेंकडो वर्ष सुप्तावस्थेत राहूनही दुर्वांकुर पाऊस पडताच जमिनीतून बाहेर निघतात. जीवनाचा आनंद चाहुबजूना पसरवतात. माणसाच्या मनात ही आपल्या संततीच्या माध्यमातून अमर राहण्याची इच्छा आहे. दुर्वा गणपतीला अर्पित करून आपण अमरतेच वरदान मागतो.
प्रश्न येतो दुर्वा गणपतीलाच का वाहतो?
राज्यात दुर्वेची भरपूर कुरण राहतील तर प्रजा समृद्ध राहील. कारण त्या वेळच संपूर्ण जीवन चक्रच हिरव्या गवतावर निर्भर होतो. आता ही आहेच. भाद्रपदात सर्वत्र राना-वनात सर्वत्र हिरवीगार दुर्वा आपल्याला दिसून येते. पण पुढच्या पावसाळ्या पर्यंत ही दुर्वायुक्त कुरणे सुरक्षित राहिली पाहिजे. गणाध्यक्ष अर्थात गण प्रमुखाने शत्रुं पासून या कुरणांचे रक्षण करावे ही अपेक्षा.
दुर्वा मातीला घट्ट पकडून ठेवते, पर्वतांना आणि नद्यांच्या किनार्याना ढासळू देत नाही. पाण्याला स्वछ आणि निर्मळ करते. हिरवी गार कुरणे डोळ्यांना शीतलता प्रदान करतातच शिवाय सूर्यप्रकाशात प्राणवायू ही उत्सर्जित करतात. अर्थातच पर्यावरण दृष्टीने दुर्वेचे महत्व आहे.
‘दुर्व’ धातूचा अर्थच नष्ट करणे आहे. दुर्वा त्रिदोष नाशक आहे. वात कफ पित्त आणि कफ दोषांना संतुलित करते म्हणून आयुर्वेदिक औषधांमध्ये दुर्वेचा वापर होतो. आजचे प्राकृतिक चिकित्सक ही दुर्वेचा वापर औषधी म्हणून करतात. वैदिक ऋषींना दुर्वेचे औषधीय गुण माहिती होते.
जसे आपण सव्वा रुपया देवावर वाहून लाखांची कामना करतोच. तसेच मानव जीवन जीवन स्वस्थ, पुष्ट आणि आरोग्य प्रदान करणारी दुर्वा गणाध्यक्ष अर्थात राजाला अर्पित करून, त्याचा कडून दुर्वेची कुरणे सुरक्षित ठेवण्याची अपेक्षा करणे साहजिक आहे. त्याच परंपरेचे जतन आज आपण गणपतीला दुर्वा वाहून करतो.
दुर्वेचे रक्षण करणे का आवश्यक आहे?
आज ही आपल्या देशात अधिकांश शेतकरी शेती साठी बैलांचा वापर करतात. शंभर कोटींच्या वर असलेल्या देशाला दुध, दही आणि तूप गायी म्हशीन पासूनच मिळते. शेळ्या- मेंढ्या मांस साठी पाळल्या जातात. हे सर्व पशु गवत अर्थात “दुर्वा” खाऊनच पुष्ट होतात. सरकार ही शेळ्या-मेंढ्यांच्या पालानाला प्रोत्साहन देत आहे. कुरणांच्या अनियंत्रित वापरा मुळे आज ही कुरणे नष्ट होतात आहे. आणि आज सर्वत्र उजाड रान-माळ दिसतात. याच सरकारी धोरणामुळे गावातील सार्वजनिक “कुरणे” नष्ट होण्याच्या मार्गावर आहेतच. शहरात ही बघतो दरवर्षी नगर निगम पावसाळ्यात बागांमध्ये गवत लावते आणि पोर दिवाळीच्या सुट्ट्यात क्रिकेट खेळून ते नष्ट करतात. परिणाम, पर्वत पावसाळ्यात ढासळतात, नद्या किनार्याना तोडतात, सुपीक जमीन पावसाळ्यात वाहून जाते, पृथ्वीवर उष्णता वाढण्याच्या मागचे ‘हिरवी दुर्वा युक्त कुरणाचा ह्रास’ हे ही मुख्य कारण आहे.
आज गणपती सारखा राजा नाही आहे. देशात लोकशाही आहे. त्या मुळे दुर्वा युक्त कुरणांची रक्षा करण्याची जवाबदारी ही आपलीच आहे. या वर्षी गणपतीवर दुर्वा वाहताना या कुरणांची रक्षा करण्याची जवाबदारी आपलीच आहे हे आपण ओळखलत तर हीच खरी गणपतीची पूजा होईल.
वा! सुंदर कविता. पटाईत, विभाग
वा!
सुंदर कविता.
पटाईत, विभाग चुकला का?
तसे काव्य चांगले आहे तुमचे, फक्त शेवटच्या कडव्याने मार खाल्लाय जरा. पण असो. चालू द्या.
विभाग चुकलाय
विभाग चुकलाय ..............
असो
छान माहिती बरका तीही अगदी साध्या सोप्या शब्दात !!
धन्यवाद
ती गणपतीची अन दुर्वान्ची पुराणातली गोष्टही सान्गीतली असतीत तर अजून मजा आली असती
असो
पुनश्च धन्स
धन्यवाद, चूक ठीक केली आहे.
धन्यवाद, चूक ठीक केली आहे.
धन्यवाद. आता ही कविता
धन्यवाद. आता ही कविता नसल्याने प्रतिसाद देवू शकतो.
आपण म्हणता,
"शहरात ही बघतो दरवर्षी नगर निगम पावसाळ्यात बागांमध्ये गवत लावते आणि पोर दिवाळीच्या सुट्ट्यात क्रिकेट खेळून ते नष्ट करतात. परिणाम, पर्वत पावसाळ्यात ढासळतात, नद्या किनार्याना तोडतात, सुपीक जमीन पावसाळ्यात वाहून जाते, पृथ्वीवर उष्णता वाढण्याच्या मागचे ‘हिरवी दुर्वा युक्त कुरणाचा ह्रास’ हे ही मुख्य कारण आहे."
बागांतील गवत पोर दिवाळीत क्रीकेट खेळून नष्ट करते, म्हणून,
१. पावसाळ्यात पर्वत ढासळतात.
२. नद्या किनार्याना तोडतात
३. सुपीक जमीन पावसाळ्यात वाहून जाते.
बापरे! तम्माम पोट्ट्याईले सागाया हवे, किर्कट खेळत जावू नगासा म्हनूनशान?
आज ही आपल्या देशात अधिकांश
आज ही आपल्या देशात अधिकांश शेतकरी शेती साठी बैलांचा वापर करतात. शंभर कोटींच्या वर असलेल्या देशाला दुध, दही आणि तूप गायी म्हशीन पासूनच मिळते. शेळ्या- मेंढ्या मांस साठी पाळल्या जातात. हे सर्व पशु गवत अर्थात “दुर्वा” खाऊनच पुष्ट होतात. सरकार ही शेळ्या-मेंढ्यांच्या पालानाला प्रोत्साहन देत आहे. कुरणांच्या अनियंत्रित वापरा मुळे आज ही कुरणे नष्ट होतात आहे. आणि आज सर्वत्र उजाड रान-माळ दिसतात. याच सरकारी धोरणामुळे गावातील सार्वजनिक “कुरणे” नष्ट होण्याच्या मार्गावर आहेतच. शहरात ही बघतो दरवर्षी नगर निगम पावसाळ्यात बागांमध्ये गवत लावते आणि पोर दिवाळीच्या सुट्ट्यात क्रिकेट खेळून ते नष्ट करतात. परिणाम, पर्वत पावसाळ्यात ढासळतात, नद्या किनार्याना तोडतात, सुपीक जमीन पावसाळ्यात वाहून जाते, पृथ्वीवर उष्णता वाढण्याच्या मागचे ‘हिरवी दुर्वा युक्त कुरणाचा ह्रास’ हे ही मुख्य कारण आहे.
शब्दांचे 'विपर्यास' कसे केले जातात याच उत्तम उदाहरण आपला प्रतिसाद आहे. पूर्ण वाचल्या सुसंगती लक्षात येईल.
आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर - गवत असलेला पार्क पाऊसाचे जास्त पाणी जमिनीत पोहचवत. गवत नसेल तर सर्व पाणी व माती वाहून जाणारच आणि शहरातल्या गटारांच्या जास्त पाणी नदीत पोहचणार. पार्क पुन्हा तैयार करण्यासाठी नवीन सुपीक माती आणून टाकावी लागेलच.
थोडा पाऊस आणि भयंकर पूर ही परिस्थिती ' अप्रत्यक्ष रूपेण कुठल्याही प्रकारे 'दूर्वा नष्ट करणारे, कारणीभूत आहेतच. मला जे सांगायचं होत, आपल्यापर्यंत पोहचले. हे मात्र खरं आहे. गमंत म्हणून तुमचा प्रतिसाद स्वीकार करतो.