Submitted by नानुअण्णा on 16 September, 2012 - 08:04
नमस्कार मंडळी,
गणपती बाप्पा येण्याची वेळ जवळ आलीय.
पुण्यात उकडीचे मोदक कुठे कुठे मिळतात हे परिसरानुसार कळवावे. श्रेयस, चितळे, सरपोतदार (पुणे गेस्ट हाउस) सोडून.
घरगुती, व्यावसायिक वगैरे, पळेल.
भ्रमणध्वनी असल्यास उत्तम.
प्रश्न पुणेरीच झाला आहे, पण खाली तळ टिपात जोडे हाणु नयेत.
पहिल्यांदाच लिहित असल्यामुळे, काही चुकल्यास क्षमा करावी. शुद्धलेखन चुका माफ कराव्या.
धन्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहकारनगरला दशभुजा गणपतीचे
सहकारनगरला दशभुजा गणपतीचे देऊळ आहे. त्या लेन मधे किंवा त्याला समांतर असलेल्या एका लेन मधे एका ठिकाणी घरगुती मिळतात. चांगले असतात. तेथे विचारले तर नक्की ठिकाण कळेल. मला आणखी कळाले तर लिहीतो येथे.
आगाउ माहीती: एक उकडीचा मोदक
आगाउ माहीती: एक उकडीचा मोदक ४० रुपये.
एवढे महाग? गेल्या वर्षी १५ ला
एवढे महाग? गेल्या वर्षी १५ ला एक होता. हा कुठला भाव आहे झंपी?
कर्नाटक हायस्कुल( नवीन) पासून
कर्नाटक हायस्कुल( नवीन) पासून अलंकार पोलिस चौकीला जाताना डावीकडे जोशी स्वीट्स आहे. तिकडे अप्रतिम उकडीचे मोदक मिळतात!! गणेश भेळच्या समोर. एव्हढ्या खुणेवर दुकान सापडायला हरकत नाही. तिकडे मटारच्या करंज्या पण मस्त असतात!
बर्प.कॉमवर पत्ता सापडला.
25450385, 25458746, 9422031027
Shop No 3, Kamala Park Socity, Bharat Kunj Road, Erandwane , Pune
Landmark: Near New Karnatak High School
अलंकार पोलीस चौकीकडून
अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा कार्यालयाकडे जाताना देवेश नावाचे चितळेबंधूंचे एक दुकान आहे. त्याचे शेजारी सर्वेश नावाचे खाद्य पदार्थांचे दुकान आहे. तिथे गणपतीच्या दिवसांत तसेच दर महिन्यातल्या चतुर्थीला उकडीचे मोदक मिळतात. तिथे प्री ऑर्डरची पण सोय आहे वाटते.
कर्नाटक हायस्कुल( नवीन) पासून
कर्नाटक हायस्कुल( नवीन) पासून अलंकार पोलिस चौकीला जाताना डावीकडे जोशी स्वीट्स आहे
>>>जोशी स्वीट्स भरतकुन्ज एरन्डवणे
श्रेयसच्या बोळातच एक बाई
श्रेयसच्या बोळातच एक बाई आहेत. जमले तर फोन नंबर देतो. त्या श्रेयसला पुरवतात उकडीचे मोदक व घरगुती विकतात सुद्धा.
अग्रजकडे १५ रु ला आहे मोदक.
अग्रजकडे १५ रु ला आहे मोदक.
नाव लिहू का नको.... पण ते
नाव लिहू का नको.... पण ते मोदकवाले पुण्यात खूप फेमस होते. **ळे येण्याच्या आधी.
कधी कधी आंबलेले असतात. आदल्या दिवशी करून ठेवतात व मग उकडतात की उकडून ठेवतात असे काहीतरी एकले.
आकार मोठा असतो.
बाकी ठिकाणी पुण्यात १५ ला मिळतात.
काका हलवाई(बुधकर हौदच्या इथे) मिळायचे पुर्वी.
देसाई बंधु >> कर्वे रोड
देसाई बंधु >> कर्वे रोड
देसाई बंधु ( आंबेवाले) - टिळक
देसाई बंधु ( आंबेवाले) - टिळक रोड आणि मंडई ( चितळेंच्या समोर). बहुतेक १२रुपयेला १ आहे. फारच फ्रेश आणि टेस्टी असतात. ऑर्डर्स पण घेतात.
नाव लिहू का नको.... >>> असे
नाव लिहू का नको.... >>> असे प्रश्न झंपाक्कांना कसे काय पडू लागले?
आणि ४० रुपये एक मोदक हा दर पुढच्या वर्षीचा, गॅस सिलिंडरची किंमत वाढल्यावरचा सांगितला की काय?
बाजो, तुमचं दुकान वाट्टं?
बाजो,
तुमचं दुकान वाट्टं?
अगदी नकाशासहित दिलंय म्हणून इच्चार्लं. हलके घ्या.
इब्लिस मी हलकटच आहे त्यामुळे
इब्लिस मी हलकटच आहे त्यामुळे हलकेच घेत असतो...:फिदी:
४० रुपये म्हणजे कायच्या काय.
४० रुपये म्हणजे कायच्या काय. इथे दिल्लीत २० ला आहे उकडीचा मोदक.
बाजो केलं संपादित.
र्य्ला >>> याचा अर्थ काय? हे
र्य्ला
>>>
याचा अर्थ काय? हे कसे लिहायचे? हे कसे उच्चारायचे ?
gaurav Snaks Shanipar Chauk
gaurav Snaks Shanipar Chauk Masta Astat Tyanche Modak
>>>असे प्रश्न झंपाक्कांना कसे
>>>असे प्रश्न झंपाक्कांना कसे काय पडू लागले?<<<
तुमच्या सारखे उर्मटपणे वागू का? उत्तर विचारले तर उर्मटपणे बांधिल नाही कोणाची असे सुचते.
मग इथे कशाला पंचायती पडल्यात माझ्या प्रश्णांची... आँ.
वा वा धन्यवाद, दिलेल्या
वा वा धन्यवाद, दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद.
गोपिनाथ नगर कोथ्रुड येथे
गोपिनाथ नगर कोथ्रुड येथे शेट्ये नावाच्या बाई अप्रतिम उकडीचे मोदक करुन देतात.
प्रसाद केटरर्स - श्री भट -
प्रसाद केटरर्स - श्री भट - नारायण पेठ . २४४९१६४०. अप्रतिम मोदक असतात.
बाजो, आजकाल हलकट शब्दाला नवे
बाजो, आजकाल हलकट शब्दाला नवे वजन प्राप्त झालेले आहे