सिद्धेश्वर मंदिर- सोलापुर

Submitted by झकासराव on 25 September, 2008 - 12:41

मी मध्यंतरी सोलापुरला जाउन आलो.
तिथे फिरायला जाण्यासारख एकच ठिकाण आहे. ते म्हणजे सिद्धेश्वर मंदीर.
ह्या मंदीराची खासियत म्हणजे हे एका तलावाच्या मध्येच आहे. Happy
चारी बाजुनी पाणी आणि मध्येच मंदीर. एकदम मस्त वाटत.
ही मी काढलेली तिथली काही प्रकाशचित्रे.

हा त्या तलावाचा एक व्ह्यु. ह्या तलावात आधी मासे देखील दिसायचे बरेच.
आता दिसत नाहीत. बहुद्धा जाळ टाकुन पकडतात. Sad

हा त्या मंदीरात जायचा रस्ता. दोन्ही बाजुने पाणी असत.

हा त्या मंदिराच्या आवारातुन दिसणारा एक भुइकोट किल्ला. ह्याच रुपांतर आता एका बगीच्यात केल आहे.

हे मुख्य मंदिर. मंदिराच आवार मोठ आहे. चारी बाजुनी पाणी असल्याने मस्त आल्हाददायक हवा असते. शिवाय तिथे बसण्याची सोय देखील आहे.

हे त्यावेळी तिथुन दिसलेल इन्द्रधनुष्य. तितकस शार्प नव्हत. थोडस पुसट होत.

ही सोलापुर महानगर पालिकेची जुनी इमारत. आता बाजुलाच एक नवीन इमारत आहे त्यात सगळ कामकाज चालत.
म्हणुन ही इमारत मुळचीच देखणी अजुनही देखणी राहिली आहे. ही त्या सिद्धेश्वर मन्दिराच्या जवळच आहे.
खरतर ह्या इमारतीचे अजुन काही ऍन्गल मध्ये फोटो काढले पाहिजेत. पण ते शक्य नाही झाल.

माझ्या पहिल्याच सोलापुर वारी नंतर मी माझ्या मित्रमैत्रिणीना बोललो होतो. तुमच्या अख्ख्या सोलापुरात मला दोनच गोष्टी आवडल्या.
आणि त्या दोन्ही पळवुन कोल्हापुरात न्याव्याशा वाटल्या.
एक सिद्धेश्वर मंदिर आणि दुसरी महानगरपालिकेची देखणी वास्तु. Happy

अजुन काही फोटो आहेत. ते खालील दुव्यावर पहा.
http://picasaweb.google.com/zakasrao/SolapurSiddheshvarTemple#

गुलमोहर: 

झकास, झकार फोटो, पण झोप आता, ईतक्या रात्री घरुन मायबोलीवर येवु नये Happy

छान झकास! पाणी शांत वाटतयं.

मस्त रे. देवळाचे रंगकाम वगैरे चालू आहे का? इतका पांढरा रंग कळसाला पाहिल्याचे आठवत नाही (मी पाहिलेले नाही, पण साधारण कोणत्याही देवळाबद्दल)

मस्तच आहे मंदिर आणि फोटो पण.

झकास हे मंदिर मला खूप आवडते. स्वामी जेव्हा जेव्हा अक्कलकोट्ला नेतात तेव्हा या मंदिराला पण भेट द्यायचा माझा प्रयत्न असतो.
---
<<<एक सिद्धेश्वर मंदिर आणि दुसरी महानगरपालिकेची देखणी वास्तू>>>
एक अनमोल व्यक्ती तू सोलापुर मधून पळवून नेलीच आहेस की Happy

>>>>>> तुमच्या अख्ख्या सोलापुरात मला दोनच गोष्टी आवडल्या.
आणि त्या दोन्ही पळवुन कोल्हापुरात न्याव्याशा वाटल्या.

अजुन पण काहीतरी आवडलेल आणलस ना तू? Proud DDD
...;
आपला, लिम्बुटिम्बु

झकास रे झकास!

अरे तु कधी गेला होतास अल्हाददायक वातावरण होते ते. मे च्या टळटळीत दुपारी तू फोटो काढलाय ना त्या रस्त्यावर अनवाणी गेले होते! आई ग! पाय भाजणे म्हणजे नक्की काय असते त्याचा 'ज्वलंत' अनुभव घेतलाय Sad काळी जमीन असल्याने जास्तच तापते.
आणि कोल्हापुरला पळवुन आणण्यासारखेच आहे ते.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

सोलापुरात अजुनही काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत. एक म्हणजे कंबर तलाव. दुसरे रेवण सिद्धेश्वर प्राणी संग्रहालयातील गुलाबाची बाग. सोलापुर पासुन १० किमी अंतरावर असलेला हिप्परगा तलाव, शहराच्या मधोमध असलेलं हेमाडपंती शैलीतलं मल्लिकार्जुनाचं दगडी मंदीर. पुढच्या वेळी जाल तेव्हा या ठिकाणांना देखील भेट द्या.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!! Happy