झटपट चिकन करी

Submitted by सायो on 5 September, 2012 - 23:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बोनलेस, स्किनलेस चिकन तुकडे करुन,
मॅरिनेड करता: दही, आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला, थोडं लाल तिखट, मीठ, हळद, लिंबाचा रस
ग्रेव्हीकरता- Patak चा टिक्का मसाला सीमर सॉस

क्रमवार पाककृती: 

नावाप्रमाणेच झटपट होणारी आहे.
चिकनच्या पॅकवरील सूचनांप्रमाणे धुवून्/न धुता चिकनचे तुकडे करुन घ्यावेत. मॅरिनेडमध्ये सांगितल्याप्रमाणे जिन्नस घालून चिकनला लावून घ्यावे. फार वेळ नसेल तर १० मिनिटं मॅरिनेड करुनही चालेल (आम्ही तेवढीच केलेली).
खोलगट पॅनमध्ये तेलावर चिकन परतून घ्यावं. वर सांगितलेला पटकचा चिकन टिक्का मसाला घालून परतून घ्यावं. झाकण घालून एक १० मि. शिजवावं. वरुन कोथिंबीर, लिंबू, कांदा वगैरे घ्यावा.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२ oz चिकन असेल आणि १ बाटली मसाला असेल तर ३,४ जणांना भरपूर होईल.
अधिक टिपा: 

टिक्का मसाला हॉट्/मिडीयम जसा असेल त्यानुसार मॅरिनेड्मधलं लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करावं.
फोडणीत कांदा वगैरे न घालताही सुंदर चव आणि रंग येतो.
चिकनची रेसिपी कधी लिहीन असं न वाटल्याने एकदम टडोपा Happy
फोटो उद्या टाकते.

माहितीचा स्रोत: 
नवरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, ह्या ब्रॅंडचा मसाला इथे मिळतो का पहायला हवे. हे झटपट काम दिसतं आहे! Happy

पटकन चिकन बनवायचं असलं की मी खालीलप्रमाणे बनवते.

१. चिकनचे तुकडे करुन घेणे.
२. तेल गरम करुन आधी चेचलेले आले, लसूण परतून घेणे. त्यावरच कांदा, मिरीदाणे, बडीशेप, लवंगा आणि दालचिनी, हळद व तिखट घालून परतणे.
३. त्यावर टोमॅटो, कोथिंबीर, थोडा पुदिना आणि ४-५ कडीपत्याची पाने चुरडून टाकून परतणे.
४. खोबरे ऑप्शनल. हवे तर परतून घ्यावे, नाही वापरले तरी चालेल.
५. सगळे एकत्र वाटून घ्यायचे व हा मसाला पुन्हा थोडा परतून त्यात चिकनचे तुकडे घालायचे. शिजेपरेंत बेताबेताने पाणी घालावे.
६. ग्रेव्ही हवी तर मसाल्याचे प्रमाण अधिक म्हणजे अगदीच पातळ पाणी होणार नाही.
७. सुके करायचे तर बेताचे मसाल्याचे प्रमाण.

मोजून २० एक मिनिटांत हे होते - एकदा हात बसला की त्याहीपेक्षा कमी वेळात.

शैलजा, तू दिलेल्या पद्धतीने करता येईलच. पण ते ही व्याप नको असतील तर वरच्या मसाल्याटाईप वापरणं बरंय.
पटकची वेबसाईट पाहिली तर भारतात नाहीत असं दिसतंय.

सायो, अग, तो मसाला " पाठक" चा आहे ना? मी तो Whole Food Market मधुन आणलेला. माझ्या एका मैत्रिणीने सांगीतलेला. खुप छान होते चिकन. चव अगदी मस्त आहे.
शैलजा तुझीही रेसिपी छान दिसते. कधीतरी करुन नक्कि पाहीन.

मी का कुणास ठाऊक ते नेहेमी 'पातक' असे वाचते Proud
नेहेमी दिसतात ह्या कंपनीचे मसाले. नेहेमीच्या सुपरमार्केटमध्ये मिळतात इथे पण बाटलीतल्या ग्रेव्हीला वेगळा वास येईल ह्या शंकेने कधी वापरुन पाहिला नव्हता. करुन बघेन आता. धन्यवाद सायो Happy

सोप्पी रेसिपी आहे. संबंधितांना भाषांतरीत व्हर्जन देण्यात येइल Happy

छान आहे रेसिपी. नवर्‍याचे जपानी कलिग सारखं टिक्का मसालाचा जप करत असतात. त्यांना उपयोगी पडेल. धन्यवाद सायो.

शै, तुझी रेसिपी पण मस्त आहे. मसाला फ्रीज करुन ठेवेन. आयत्यावेळी लेकही करु शकेल. मध्यंतरी त्याच्यासाठी परंपराची पाकिटे आणून ठेवली होती.