१ कप सेल्फ रायझिंग पीठ. (मी पिल्स्बरी वापरते. ह्यात बेकिंग सोडा असतो.) नसल्यास
पाउड टीस्पून बेकिंग सोडा
चिमुटभर मीठ
पाऊण कप लोणी. (मी ह्या ऐवजी अर्धं तेल (कॅनोला) आणि अर्ध 'Smart Balance, Light वापरते. स्मार्ट बॅलन्स जरा वेळ फ्रीझच्या बाहेर काढून ठेवावं.
१ कप ब्राऊन शुगर (ग्रॅन्युलेटेड पण चालेल.)
२ मोठी अंडी. (१५-२० मिनिटं फ्रिझबाहेर ठेवलेली.)
१ किंवा दीड टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
पावणेतीन कप रोल्ड ओट्स
पाऊण कप मनुका
पाव कप पिकान्स किंवा बदाम -ओबडधोबड तुकडे करून
(बरेच लोक ह्यात अर्धा चमचा ऑलस्पाइस पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि चिमुटभर जायपत्रीपावडर घालतात. घरी ह्या चवी गोडात आवडत नसल्यामुळे मी टाळते.)
१) मोठ्या भांड्यात मैदा, (बेकिंग सोडा), ओट्स, मीठ, मनुका आणि बदाम किंवा पिकान तुकडे एकत्र करून घ्यावेत.
२) वेगळ्या भांड्यात लोणी आणि साखर एकत्र करून व्यवस्थीत फेटून घ्यावी. (हलकं होईपर्यंत.) (हातात धरायच्या मिक्सरचं सेटींग हाय वर असावं.)
३)ह्या मिश्रणात एका वेळी एक अंडं फोडून टाकावं. नीट मिसळून दुसरं अंडं मिश्रणात घालावं. व्हॅनिला घालून पुन्हा अर्धा एक मिनिट व्यवस्थीत फेटावं.
४) अंड्याच्या मिश्रणात आता कोरडे (आधी एकत्र करून ठेवलेले) जिन्नस घालून नीट ढवळून घ्यावं.
५)बेकिंग ट्रे किंवा कुकी शीटवर पार्चमेंट पेपर लावून आइस्क्रीम स्कूपने मिश्रणाचे लहान गोळे घालावे.
६)३५० डीग्रीवर ओव्हन गरम करून मधल्या रॅकवर १५ मिनिटं कुकीज बेक कराव्या.
७) बेकींग शीटवर २-४ मिनिटं राहू देऊन मग कुकीज जाळीवर थंड कराव्या.
कुकीज ओव्हनमधे मधल्या रॅकवर भाजणं आवश्यक आहे. तेव्हा जागा नसल्यास २ बॅचेसमधे भाजाव्या.
.............. बंद
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी
मृ, प्रश्न
मृ, प्रश्न तुझ्या कुकीजशी रिलेटेड नाहीये, मला सांग की जी सेल्फ रायझिंग पीठं असतात त्यात ब्लीच्ड्/नॉन ब्लीच्ड अशी कॅटेगरी असते. त्यातली कोणती चांगली? मध्यंतरी मी पाव केला घरी आणि पार पोपट झाला. म्हणून म्हटलं शंका विचारुन घेऊ.
धन्यवाद
धन्यवाद मृ.
मफिन्स्ची कृती पण टाक ना प्लीज.
सायो, नॉन
सायो, नॉन ब्लीच्ड कधीही उत्तम!! पाव मी एकदाच केला. मैत्रिणीने रेसिपी दिली. चांगला झाला होता. (रेसिपीमे दम था!!:) )![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी
कुकीज
कुकीज दिसताहेत मस्त. अश्या कुकीज असतील घरात तर चरणे चालूच राहील की!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता माझा प्रश्नः सेल्फ रायझिंग पीठ हा मैद्याचा प्रकार नाही ना? आणि रोल्ड ओट्स मी इथे (मुंबईत) कुठे पाहीले नाहीत. इथे पिल्सबरी चे ओट्स मिळतात ते चालतील का? आणि व्हेनिला एक्स्ट्रेक्ट ऐवजी व्हेनिला इसेन्स? (बापरे बरेच प्रश्न झालेत की !) आणि हो, पार्चमेंट पेपर कुठे मिळु शकेल? त्याऐवजी, बटर पेपर चालेल का?
: )
: )
मी पाव
मी पाव केला घरी आणि पार पोपट झाला. <<< ब्लीच्ड पोपट ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फक्त मी
फक्त मी प्रश्न विचारलेत कीच प्रश्न निर्माण होतो.. आता वरती सुरभिताईंनी प्रश्नमाला लावली ती चालते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बी, तुला
बी, तुला असे म्हणायचेय का, तुझे प्रश्ण म्हणजे नको त्या शंका नी दुसर्याचे ते वाजवी प्रश्ण?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(हमारा खून खून नी तुम्हारा खून पानी.. असेच ना)
दिवे घे हां.....
मने, अगदी
मने, अगदी मनातली बोललीस. हल्ली तुला इतरांच्या मनाचा थांग कसा लागतो गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी काल या कुकीज करुन
मी काल या कुकीज करुन पाहिल्या.![Oatmeal Rasin Cookies.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u25785/Oatmeal%20Rasin%20Cookies.JPG)
पण प्रमाण वेगळे घेतले होते.
आज केल्या ह्या कुकिज. मस्त
आज केल्या ह्या कुकिज. मस्त झाल्यात. फोटो टाकेन उद्या.
मधल्या रॅकवर ठेवलेल्या नीट झाल्यासारख्या वाटल्या नाहीत म्हणून जरा जास्त वेळ ठेवल्या ५ मिन तर तळ जळालेत. वरच्या रॅकवर ठेवलेल्या मात्र मस्त झाल्यात. वर नेमक्या कमी कुक्यांचा ट्रे होता
असो, आता आयडिया आली. कृतीबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या आमच्या कूकीज. शाळेतल्या
ह्या आमच्या कूकीज. शाळेतल्या फॉल-पजामा-पार्टीसाठी असल्याने योग्य रंगाचे एमेनेम पेरलेत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सिंडरेला, चंचल मस्त फोटो
सिंडरेला, चंचल मस्त फोटो आहेत.
सिंडे, या कुक्या १५ मिनिटांच्या बेकिंगनंतरतही वरून खरपूस दिसत नाहीत बरेचदा. पण व्यवस्थीत बेक झालेल्या असतात.
हायला हो का ? मी आपली नाइफ
हायला हो का ? मी आपली नाइफ टेश्ट करुन बघितली, फारच ओल्या होत्या म्हणून अजून ठेवल्या.
आता जळक्या कुक्यांचा अॅपल पाय किंवा चीज केक अशी काही रेसिपी असेल तर द्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जलक्या कुक्यांचा
जलक्या कुक्यांचा चीजकेक..?सिंडीबाय, यू आर टू मच ओन्ली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो तर मस्त आलय की, जळलेल्या दिसत नाहीत बिल्कुल.
जळलेल्या दिसत नाहीत बिल्कुल.
जळलेल्या दिसत नाहीत बिल्कुल. <<< चांगल्या राहिलेल्या तेवढ्याच दिसत असतील वरती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिहिलय ना तळ जळालेत फक्त.
लिहिलय ना तळ जळालेत फक्त. आणि एक बॅच चांगली निघाली हे पण लिहिलय. किती कीस पाडाल.
मिलिंदा बरा हजर झाला लगेच![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मिलिंदाला पाठव जळकट कुक्या.
मिलिंदाला पाठव जळकट कुक्या.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो, म्हणजे नक्की किती
हो, म्हणजे नक्की किती जळाल्यात कळेल त्याला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आज केल्या ह्या कुकीज..छान
आज केल्या ह्या कुकीज..छान झाल्या आहेत
१५ मी.नंतर बघीतले तर वरुन ओल्याच दिसत होत्या पण मग वरच्या कमेंट्स आणी देवाला आठवत काढल्या बाहेर. थंड झाल्यावर मात्र एकदम खुसखुशीत झाल्या. रेसिपीसाठी अनेक धन्यवाद!!