आंबाडी सुकट निवडलेली १ वाटी ( अंबाडी सुकट म्हणजे वाळवलेल्या थोड्या मोठ्या कोळंब्या. त्याचे डोके, शेपूट, पाय काढणे = निवडणे )
शेवग्याच्या दोन भरलेल्या शेंगा
कांदे २
लसूण ८-१० पाकळ्या
तेल ४ चमचे
चिंचेचा घट्ट कोळ ३ चमचे
हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर चवी प्रमाणे
प्रथम निवडलेली सुकट कोमट पाण्यात भिजत घालावी. शेवग्याचा शेंडा बुडखा काढून त्याचे ३-४ इंचाचे तुकडे करून घ्यावेत. सालं काढू नयेत.
कांदा बारीक चिरून घ्यावा.
भांड्यात तेल तापवत ठेवावे. त्यात लसूण चेमटून घालावा. गॅस बारीकच ठेवा. सुकट पाण्यातून काढून पिळून त्यातले पाणी काढून टाकावे. लसूण अगदी काळा झाला की ही सुकट तेलात घाला. लगेच शेवगा आणि कांदा घाला. हळद, तिखट टाका. चांगले परता. आता त्यात २ वाट्या पाणी घाला. उकळी आली की झाकण ठेवा. ५-१० मिनिटात शेवगा शिजला की त्यात चिंचेचा कोळ अन मीठ घाला. लागले तर थोडे पाणी घाला. डांबवणी जरा सरसरीतच असावी. उकळी आली की कोथिंबीर घाला. तयार आहे डांबवणी.
डांबवणी जरा झणझणीतच चांगली लागते.
चपाती पेक्षा भाकरी किंवा भाताबरोबर फर्मास लागते.
बाहेर पडणारा पाऊस, गरमागरम भात, डांबवणी अन पोह्याचा भाजलेला पापड ! एकदम भारी !
माझी सख्खी मैत्रिण सुनिता तिच्या हातची डांबवणी जास्त फर्मास लागते
फोटु नंतर.
मस्त तोंपा सुटले.
मस्त तोंपा सुटले.
आता कळलं डांबवणी म्ह्ण्जे काय
आता कळलं डांबवणी म्ह्ण्जे काय मस्त आहे अवल... मला तोपासु.
मार डाला. फोटो टाकूच नका. मला
मार डाला.
फोटो टाकूच नका.
मला तुमच्या हातची डांबवणी पण मस्तच लागेल.
साती ये जेवायला
साती ये जेवायला
शेवग्याला डांबवणी म्हणजे काय
शेवग्याला डांबवणी म्हणजे काय ते आत्ताच कळलं, गंमत आहे.
डांबे म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि डांबवणी म्हणजे डांबे घालून केलेलं पातळसर सार.
लग्गेच येते, घरीही आज
लग्गेच येते, घरीही आज डाम्बवणीच आहे पण या घासपूस सासरात त्यात अंबाडी काढ करंदी कोळीम असलं कायकाय भारी नसून गरीब बिचारी तूरडाळ आहे.
नुगेकाई सारु- डांब्यांची आमटी.
साती अरेरे मग ती कसली
साती अरेरे मग ती कसली "डांबवणी" ती तर साधीसुधी "आंबवणी"
शेवग्याला डांबवणी म्हणजे काय
शेवग्याला डांबवणी म्हणजे काय ते आत्ताच कळलं, गंमत आहे. >>>>> खरच गंमत आहे......:)
शेवगा, काय हे स्वत:चं दुसरं
शेवगा, काय हे स्वत:चं दुसरं नावच माहिती नाही तुम्हाला
शेवगा, काय हे स्वत:चं दुसरं
शेवगा, काय हे स्वत:चं दुसरं नावच माहिती नाही तुम्हाला >>> खरच माहीत नव्ह्ते...पण धन्स तुझ्यामूळे कळले मला
सख्खी मैत्रीण काय प्रकार हो?
सख्खी मैत्रीण काय प्रकार हो?
@ झंपी : त्यांनी लिहिलंय ना,
@ झंपी :
त्यांनी लिहिलंय ना, "सख्खी मैत्रिण - हा प्रकार कोकणातला आहे. "
आमच्याकडे सखी मैत्रीण असं काहीतरी असतं. मित्र सखे असतात. जरा जास्त सख्य असेल तर सख्खा असं काहीतरी असेल ब्वा! कोकणातलं आहे शेवटी ते
:दिवे:
अवल, या लेखनातले चेमटून...
अवल, या लेखनातले चेमटून... सारखे खास शब्द मला खुप आवडतात.
इथे अंगोलामधे, माझ्या घरासमोरच शेवग्याचे मोठे झाड आहे, मी करीन हा प्रकार. पण समिष नाही हो !
सुकटोणी सारखा प्रकात
सुकटोणी सारखा प्रकात दिसतोय... वाचुनच स्लर्प
पण जाऊदे अंगारकी आहे आज.
हे नॉनव्हेज आहे, सो नॉट माय
हे नॉनव्हेज आहे, सो नॉट माय कप ऑफ टी.
बट रेसिपी साऊंडस रियली टेम्प्टिंग.