पाणी पुरी-
पुरी साहित्य-
रवा,मीठ,पाणी
स्टफिंग-
उकळलेला बटाटा, उकळलेले चणे,बारीक सेव
बारीक कापलेला कांदा,मीठ,हिरवी मिरची, (बारीक कापलेली),मीठ
उकडलेला बटाटा ,हिरवी मिरची आणि मीठ चवीनुसार एकत्र करून ठेवावी..
पाणीपुरीचे पाणी साहित्य--
अंदाजे पुदिना,कच्ची कैरी ,३-४ हिरव्या मिरच्या (झेपेल इतक्या), पाणी ,काळे मीठ आणि जीरा पावडर
पाणी पुरी-
पुरी साहित्य-
रवा,मीठ,पाणी
स्टफिंग-
उकळलेला बटाटा, उकळलेले चणे,बारीक सेव
बारीक कापलेला कांदा,मीठ,हिरवी मिरची, (बारीक कापलेली),मीठ
उकडलेला बटाटा ,हिरवी मिरची आणि मीठ चवीनुसार एकत्र करून ठेवावी..
पाणीपुरीचे पाणी साहित्य--
अंदाजे पुदिना,कच्ची कैरी ,३-४ हिरव्या मिरच्या (झेपेल इतक्या) इ. मिक्सर मधून बारीक करून घ्यावे, आणि नंतर त्यात पाणी (अंदाजे जसे पाणीपुरीचे पाणी असते तसे)मिक्स करून त्यात काळे मीठ आणि जीरा पावडर मिक्स करावे.चव घेऊन प्रमाण कमी जास्त करावे (आवडीनुसार)
कृती-
प्रथम बारीक रवा आणि मीठ एकत्र करून घट्ट मळून घ्यावा आणि १५-२० मिनिट स्वच्छ ओलसर कापडात ठेवावा नंतर चपाती एवढा गोळा घेवून मोठी पातळ चपाती लाटावी व लहान वाटीने लहान पुरीच्या आकाराच्या जितक्या जमेल तितक्या लहान पुऱ्या कराव्या आणि तळून घ्याव्यात. तळलेल्या पुऱ्या थोडावेळ थंड होऊ द्याव्यात.
आता तयार पुरीत आलूचे मिश्रण,चणे,बारीक कापलेला कांदा बारीक सेव असे करून सर्व पुऱ्या तयार करून घ्याव्यात आणि एका वाटीत तयार पाणी….
मग काय खायला करायची सुरवात…
j
.
फोटो कसे अपलोड करावे....
फोटो कसे अपलोड करावे....
पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी
पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला मिळतो, तो वापरून पाणीपुरी छान होते
फोटो कसे अपलोड करावे....>>>>>
फोटो कसे अपलोड करावे....>>>>> ही लिंक पहा
धन्यवाद प्रसिक लिंक आणि
धन्यवाद प्रसिक लिंक आणि प्रतिसादाबद्द्ल .उद्या प्रयत्न करते अपलोड करण्याचा..
एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला वापरुन बघेल.मी आपले घरगुती करून बघितले पानीपुरीचे पानी...
उकडलेले मूग + उकडलेला बटाटा +
उकडलेले मूग + उकडलेला बटाटा + चाट मसाला हे स्टफिंग सगळ्यात भारी लागते.
पा पु च्या स्टफिंगमधे कांद्याला मजा नाही बा.
म स्त...माझी आवडती
म स्त...माझी आवडती डीश...............
उकडलेले मूग + उकडलेला बटाटा +
उकडलेले मूग + उकडलेला बटाटा + चाट मसाला हे स्टफिंग सगळ्यात भारी लागते.>>>> +१०००
पाण्याऐवजी बीयर भरून पाणी
पाण्याऐवजी बीयर भरून पाणी पुरी खाल्लीये का कुणी?