Submitted by प्राजु on 31 August, 2012 - 00:56
हारलेल्या जणू नायका सारखा
जन्म गेला उभा नाटका सारखा
चार भिंतीत मी राहिलो नेहमी
एक डबक्यातल्या बेडका सारखा
हो म्हणावे तुला की म्हणावे नको
वागतो मी असा लंबका सारखा
दास होउन तुझा राहिलो जीवना
वागुदेना मला मालका सारखा!
मेघ येथे कधी मेघ तेथे कधी
पावसा शोधतो चातका सारखा
जीव यांत्रीक झाला कधी ठाव ना
चालतो, बोलतो कोष्टका सारखा
पुण्ण्य आहे कुठे? ते कसे लाभते?
जन्मलो वाढलो पातका सारखा
गोजिरे साजिरे सौख्य आले तरी
त्यासवे वागलो खाटका सारखा
'रंगलेला दगड' हीच किंमत म्हणे!
ना कुणा वाटलो माणका सारखा!!
-प्राजु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जीव यांत्रीक झाला कधी ठाव
जीव यांत्रीक झाला कधी ठाव ना
चालतो, बोलतो कोष्टका सारखा
पुण्ण्य आहे कुठे? ते कसे लाभते?
जन्मलो वाढलो पातका सारखा<<<
छान शेर आहेत.
(मला वाटते 'सारखा' हा शब्द आधीच्या शब्दाला जोडून लिहिला जातो. म्हणजे पातकासारखा, कोष्टकासारखा, असे! त्यामुळे मग ही गैरमुरद्दफ गझल होईल)
गझल एकंदर छान आहे
(काही खयाल अजून जरा अधिक गहिरे झाले असते असेही वाटले)
शुभेच्छा
-'बेफिकीर'!
छान गझल प्राजु..
छान गझल प्राजु..
मस्त खयाल प्राजु चार भिंतीत
मस्त खयाल प्राजु
चार भिंतीत मी राहिलो नेहमी
एक डबक्यातल्या बेडका सारखा
ज्ज्ज्जाम आवडला.
पुण्ण्य आहे कुठे? ते कसे
पुण्ण्य आहे कुठे? ते कसे लाभते?
जन्मलो वाढलो पातका सारखा
>>>>>>>>
सर्वाधिक आवडला हा शेर
छानच! आवडली.
छानच! आवडली.
प्राजक्ताताई! सुंदर
प्राजक्ताताई! सुंदर गैरमुरद्दफ गझल आहे तुमची!
थोडी वृत्तावरील पकड अजून भक्कम करावी.
खूप दिवसांनी आपली गझल वाचायला मिळाली.
काफियांवर अजून सखोल चिंतन हवे होते, असे वाटून गेले.
आपली ही गझल वाचता वाचता मला जे स्फुरले ते आपल्या चिंतनासाठी देत आहे...........पहा कसे वाटतात आमचे खयाल..........
पाहतो मी मला प्रेक्षकासारखा!
जन्म गेला उभा नाटकासारखा!!
दंग विश्वात त्याच्याच तो राहतो!
एक डबक्यातल्या बेडकासारखा!!
टोक हे गाठतो! टोक ते गाठतो!
वागतो नेहमी लंबकासारखा!!
दास मी रोज होतो तुझा जीवना;
आज मी वागतो मालकासारखा!
थांब मेघा! जरा सांग तू पावसा....
शोधतो मी तुला चातकासारखा!
चौकटीतील आयुष्य हे रोजचे!
मी मला वाटतो कोष्टकासारखा!!
संचिता! सांग ना, पुण्य माझे किती?
वाटतो जन्म का पातकासारखा?
का न वाटो मला जग कसायापरी?
आज जो तो दिसे खाटकासारखा!
होय, माणीक मी शुद्ध होतो तरी....
वाटलो का न मी माणकासारखा?
>.............प्रा.सतीश देवपूरकर
टीप: प्राजक्ताताई, आपल्या पुढील गझललेखनास माझ्या शुभेच्छा!
...................................................................................
प्राजू........नशीबवान
प्राजू........नशीबवान आहेस!!
प्रा. देवपूरकरानी तुझ्या रचनेची (...माझ्या माहितीप्रमाणे बहुधा प्रथमच...) पर्यायी गझलेकरिता निवड़ केली आहे
अभिनन्दन!!
देवसर आपणासाठी हे घ्या ...............:दिवा: !!
दास होउन तुझा राहिलो
दास होउन तुझा राहिलो जीवना
वागुदेना मला मालका सारखा!
>>>+१
हे आवडले
खूप खूप आवडली. शुभेच्छा.
खूप खूप आवडली. शुभेच्छा.
प्राजूताई,....., हारलेल्या
प्राजूताई,.....,
हारलेल्या जणू नायका सारखा
जन्म गेला उभा नाटका सारखा ...... अफलातून .
हो म्हणावे तुला की म्हणावे नको
या शेरासाठी आपणास खुप खुप धन्यवाद.
वागतो मी असा लंबका सारखा .... हा मला सर्वाधीक आवडलेला शेर.
................................................ लंबक हा भूमितीचा शब्द किती सहज आणि अचुकपणे वापरला गेला आहे. ____/\____
पुण्ण्य ... हे मात्रांच्या भरीसाठी केल्याप्रमाने वाटते.
बाकी......,
दास मी रोज होतो तुझा जीवना;
आज मी वागतो मालकासारखा!
थांब मेघा! जरा सांग तू पावसा....
शोधतो मी तुला चातकासारखा!
चौकटीतील आयुष्य हे रोजचे!
मी मला वाटतो कोष्टकासारखा!!
संचिता! सांग ना, पुण्य माझे किती?
वाटतो जन्म का पातकासारखा? ...... इ. देवसरांचे शेर छान आहेत.
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार.
देवपूरकर सर.. "तुमची" गझल सुद्धा आवडली.
धन्यवाद.
प्राजू , मस्त गझल
प्राजू , मस्त गझल