Submitted by टकाटक on 29 August, 2012 - 03:05
मला स्वत:ची बिझिनेस वेबसाईट क्रीएट करायची आहे त्यासाठी संपुर्ण माहीती हवी आहे. मी या बाबतीत पुर्णपणे नवखा आहे. प्लीज मदत करा. बिझिनेस अतिशय छोटा आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"बिझिनेस खूपच छोटा" अरेरे. मग
"बिझिनेस खूपच छोटा"
अरेरे.
मग पैसे खूपच कमी असतील तुमच्याकडे
पण असो. पैशाची कमतरता कष्ट करून भरून काढा. एच्टीएमेल येतं का? ती मिनिमम गरज आहे. बाकी डॉट नेट वगैरे पुढच्या गोष्टी.
तुम्हाला काय काय येतं हे लिहा आधी. म्हणजे पुढील मदत करता येईल. अन पूर्ण नवखा असलात तर कठीण आहे. पण गूगल बाबा बरे मदत करतात. शिवाय डमीज ची पुस्तकं आहेत. फुकट वाली मिळालीत कुठे तर बघा..
तुम्हाला काय काय येतं हे लिहा
तुम्हाला काय काय येतं हे लिहा आधी >> सहमत .. आणि नेमके काय करायचे आहे.
फक्त तुमच्या उद्योगाची माहिती देणारे सम्केतस्थळ बनवायचे असेल तर तुलनेने सोपे काम आहे. तुम्हाला संकेतस्थळावरुन विक्री करायची असेल तर वेगळे पर्याय आहेत.
सुरुवात करायला wix.com / sites.google.com यांचा उपयोग होतो का पहा
होय, बिझिनेस छोटाच आहे. खुप
होय, बिझिनेस छोटाच आहे. खुप गरज असल्याने बायको घरच्याघरी साडया विकते. पण महीन्याला १०-१२ साडयाच विकल्या जातात म्हणुन वेबसाईट बनवण्याचा विचार चालु आहे. आणि मला फक्त उद्योगाची माहीती देणारे संकेतस्थळच बनवायचे आहे. एच. टी. एम. एल. येतं, मला हे विचारायचं होतं की होसट डोमेन , साईट रजिस्ट्रेशन , सर्टीफिकेशन असं काहि करावं लागेल का? असल्यास कीती खर्च येतो ? कुठला ईंडीयन डोमेन निवडावा.
असा विचार करा, समजा जरी
असा विचार करा, समजा जरी वेबसाईट तयार झाली , तर ती उपलब्ध आहे हे लोकांना कसे कळवणार?
वेबसाईट तयार करण्याच्या खर्चापेक्षा , ती तयार आहे हे ग्राहकांना सांगण्याचा खर्च, ग्राहक वेबसाईटकडे आकर्षून घेण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
इथे मायबोलीवर जाहिरात विभागात तुम्ही तुमच्या व्यवसायाची फुकट जाहिरात करू शकता. थोडक्यात ती आपोआप १ पानी वेबसाईट तयार होते. ती तुम्हाला मार्केट करता येते का ते पहा. जर तीच जमत नसेल तर वेगळी मोठी वेबसाईट केल्यावर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय अडचणी येतात ते तुम्हाला आपोआप समजेल. जर ती तुम्हाला मार्केट करता आली आणि फायदा होतोय असे वाटले तर स्वतंत्र वेबसाईट करायचा विचार करा.
अजयरावास्नी अणुमोदक. टकाटक
अजयरावास्नी अणुमोदक.
टकाटक तात्या,
इन्टरनेटावर झैरात करून मग कुणी सम्जा साडी मागव्लीच आम्रिकेतून तर ती थितं पोच्णार कशी? आन पैकं तुम्च्या खाती जमा व्हनार कशे? (हितं सर्फिटिकेशन का काय त्ये लाग्तं. येस्येसेल बी लाग्तं आन तुम्ची ब्यांक बी तुमास्नी सांग्ती कसं क्रेडीट कार्ड ग्याचं त्ये.. लै लफ्ड्याची बात बगा. डायरेट तुम्च्या ब्यांकंच्या साय्बासंगत बोला.)
अवो, नुसती वेबसाईट उपयोगी नव्हे. टेलीमार्केटिंग, किंबहुना नुस्ते मार्केटिंग जास्त महत्वाचे.
त्यापेक्षा घरी सत्यनारायण घाला. गल्लीत अन आसपास पत्रीका वाटा. पत्रिकेत प्रतिष्ठाणः अमुक्तमुक्माता साडी सेंटर लिवा. तीर्थ प्रसाद अन पानसुपारी. येतील तितक्यांना साड्या दिसतील असे बघा..
येणकेण प्रकारेण.. प्रसिद्धी हवी. कसे?
अजयरावास्नी आमचे पण अनुमोदन.
अजयरावास्नी आमचे पण अनुमोदन. त्यांना अमूल्य अनुभव आहे ह्या बाबतीत. मी अगदी हेच्च लिवायला आलेले. अहो इथे जाहिरात द्या आणि फेसबुक पेज बनवा. मला पण सल्ला आधारगट साठी एक फुल्ल फ्लेझ्ड साइट बनवायची होती. त्या कन्सल्टंट ने असेच कान उघडले. पैसे किती आहेत साइट चालवायला, वगिअरे आणि
मग फेसबुक पेज काढायचा सल्ला दिला. शुभेच्छा.
इब्लिस, जे विचारले आहे त्याचे
इब्लिस, जे विचारले आहे त्याचे उत्तर द्यायचे सोडुन फुकटचे सल्ले कशाला देता?
<<<अरेरे, मग पैसे खूपच कमी असतील तुमच्याकडे >>>
टकाटक, तुमचा व्यवसाय छोटा आहे असे म्हणालात तर त्या करता वेब साईट करण्यासाठी गुगल ब्लॉगस्पॉट चा वापर करता येईल.
१) ह्या करता यणारा खर्च म्हणाजे तुम्हाला तुमचे डोमेन नेम फक्त विकत ग्यावे लागेल उदाहरणार्थ हे बघा
२) एकदा डोमेन नेम घेतले कि तुमच्या गुगल ब्लोग वर ते वापरता येते इथे बघा
३) गुगल ब्लॉग वर तुम्ही एच टी एम एल येत असेल तर स्वतः साईट (ब्लॉग) डीझाईन करू शकता. अथवा अशी फ्री टेंप्लेट्स वापरू शकता.
४) तसेच ओन्लाईन पेमेंट घेण्यासाठी पे-पॅल सरखी सर्व्हिस तुम्ही वापरू शकता पण त्याचे डीटेल्स कदाचीत अजय जास्त चांगले सांगू शकतील
एकदा का अशी स्टॅटिक वेबसाईट तयार झाली की मग मार्केटींग चा प्रष्ण येतो त्या करता .. ईब्लिस वा अजय ने सुचवलेले पर्याय वापरू शकता.
तसेच ओन्लाईन पेमेंट
तसेच ओन्लाईन पेमेंट घेण्यासाठी पे-पॅल सरखी सर्व्हिस तुम्ही वापरू शकता पण त्याचे डीटेल्स कदाचीत अजय जास्त चांगले सांगू शकतील
पेपालच्या चार्जेसमध्ये दोन साड्या येतील.
अजय चांगला सल्ला दिलात
अजय चांगला सल्ला दिलात .
इब्लिस मदत करे पर्यंत ठीक आहे पण <<<अरेरे, मग पैसे खूपच कमी असतील तुमच्याकडे >>> असा कॉमेंट्स तुमच्याकडुन अपेक्षीत नाहीत .मराठी माणुस आधीच बिझनेसमध्ये पडायला घाबरतो , अशा शेर्यांमुळे त्यांचं उरलं सुरलं अवसान घालवु नये .
टकाटक खुप सार्या शुभेच्छा तुमच्या बिझनेससाठी !
आपल्याला वर्तमानपत्राच्या
आपल्याला वर्तमानपत्राच्या माध्यमातून विकायचे असेल तर आपण तिथे आधी जाहिरात देऊन बघतो. वर्तमानपत्र सुरु करत नाही.
आपल्याला रेडीओच्या माध्यमातून विकायचे असेल तर आपण तिथे आधी जाहिरात देऊन बघतो. रेडीओ स्टेशन सुरु करत नाही.
आपल्याला टिव्हीच्या माध्यमातून विकायचे असेल तर आपण तिथे आधी जाहिरात देऊन बघतो. टीव्ही स्टेशन सुरु करत नाही.
वेबसाईट करणे हे आपले स्वत:चे अगदी छोट्से वृत्तपत्र चालवण्यासारखे आहे. जुन्या ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी सतत काहीतरी बदल करणे आवश्यक आहे. नवीन ग्राहकांना ते माहित व्हावे म्हणून सतत नवीन आकर्षक गोष्टी ठेवणे आवश्यक आहे.
तुम्हाला ऑनलाईन काही विकायचे असेल तर कुठल्यातरी ऑनलाईन साईटवर (मायबोलीच असे नाही, तुम्हाला योग्य वाटेल ती) आधी जाहिरात करून पहा. संपर्कासाठी तुमचा फोन द्या. फ्री डीलीवरीची ऑफर देऊन पहा. त्या जाहिरातीचा पत्ता दिला तर किती जण ते पाहून तुम्हाला कॉल करतात हे पहा. उदा ईबे सारख्या साईटवरून तुम्ही थेट विकू शकता.
म्हणजे ग्राहकाला ऑर्डर देण्यासाठी काय हवे आहे याचा अंदाज येईल. तुम्हाला एकदा ऑनलाईन मार्केटींगचा अंदाज झाला की मग तुमची हवी तिथे वेबसाईट तयार करा.
माझा तुम्हाला नाऊमेद करण्याचा विचार नाही. पण अतिशय आकर्षक आणि पुरेपूर आधुनिक सुविधा असलेल्या वेबसाईट ग्राहक वेबसाईटवर येत नाही म्हणून बंद झाल्या आहेत. त्यामुळे तुमच्या वेबसाईटवर ऑनलाईन पेमेंट आहे का नाही, सुंदर फोटो आहेत का नाही यापेक्षा ग्राहक कसे येतील याचा विचार करणे खूप महत्वाचे आहे. तुमचे प्रॉडक्ट ग्राहकाला आवडले का नाही, त्याला किंमत पटली का नाही हा खूप नंतरचा मुद्दा झाला.
अजयजी अंत्यत अचुक व सडेतोड
अजयजी अंत्यत अचुक व सडेतोड सल्ला दिलात.....
टकाटक तुमचा व्यवसाय लहान असला म्हणुन काय झाले तो तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे...... कोणताच व्यवसायिक पहिल्याच दिवशी टाटा-अंबानी बनत नाही...... सध्या तुम्ही वर दिलेल्या सल्ल्याप्रमाने स्वतःचे फेसबुक पेज ओपन करा तिथे तुम्ही विकत असणारया साडयांचे फोटो अपलोड करा..... त्यात त्या साडीची किंमत, तुम्ही काही डिस्काऊंट देणार असाल तर ते सर्व लिहा...... तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी त्याची डिलीवरी देउ शकाल ते नमुद करा...... तसेच मायबोलीसारख्या वेबसाइटवरुन तुम्ही तुमच्या साडयांची जाहिरात करु शकता..... आधी या गोष्टींचा अनुभव घ्या मग मोठी झेप घ्या...... सध्याचे दिवस हे स्वतःच स्वतःचे मार्केटिंग करण्याचे आहेत ते तुम्ही किती चांगल्या प्रकारे करु शकता त्यावर तुमचे व्यवसायिक यश अवलंबुन आहे......तुमच्या व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला खुप सारया शुभेच्छा
टकाटक तुमचा व्यवसाय आणि
टकाटक तुमचा व्यवसाय आणि सध्याचा त्याचा आवाका यासाठी मार्केटिंगला वेबसाईट हा पर्याय योग्य वाटत नाही.
शक्य तितक्या लवकर फेसबूक पेज काढा आणि ते नुसतं काढू नका, जास्तीत्जास्त लोकांपर्यंत (ओळखीचे, अनोळखी) त्याची लिंक पोचेल ते पाहिले जाईल असे पाहा.
शेवटी जिथे तुमच्या मालाची गरज आहे तिथे त्या योग्य क्षणी तुम्ही असणं जास्त महत्वाचं आहे....
अजून एक करता येईल..... जवळपास लागणारी प्रदर्शनं, ग्राहक पेठा यात स्टॉल घेऊन पहा.... सुरुवातीला किंवा हल्ली बर्याचदा त्या स्टॉलचा खर्च पण निघत नाही अशी काही छोट्या उद्योजकांची बोंब आहे.... पण अश्या प्रदर्शनातून तुम्ही लोकांच्या नजरेत तरी येता....... तिथे कार्ड्स सर्क्युलेट करा....
अगदी जास्त खर्च वाटला तर अश्या प्रदर्शनात स्टॉल्स शेअरही करता येतात.... त्याचा अंदाज तुमच्या आसपासच्या भागात फिरून घ्या. रिकाम्या वेळात अश्या प्रदर्शनांना चकरा मारा. आयोजकांना भेटत जा.
कुठेनाकुठे क्लिक होईलच याची खात्री बाळगा आणि कामाला लागा.......
शुभेच्छा...!!!!
टकाटक तुमचा व्यवसाय आणि
टकाटक तुमचा व्यवसाय आणि सध्याचा त्याचा आवाका यासाठी मार्केटिंगला वेबसाईट हा पर्याय योग्य वाटत नाही.<<
हेच मी जरा 'इनोदी' स्टायलिने लिवायला गेल्तो.
लोकास्नी राग आला.
माझे चुकले असे म्हणतो.
धन्यवाद!
तुम्हा सगळ्यांचे मनापासुन
तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार.
इब्लिस : - छे हो , मला अजिबात राग आलेला नाही. तुम्ही सर्वजण माझे हीतचिंतक आहात म्हणुन माझ्यासाठी विचार करत आहात.
भुंगा , वर्षा व्हिनस , अजय, शेळी, पेशवा, श्री , अश्वीनी मामी , इब्लिस : - सर्वांनी चांगला सल्ला दिलाय. सर्वांनी माझ्या हीताचाच विचार केलाय. आभार.
अजून एक करता येईल..... जवळपास
अजून एक करता येईल..... जवळपास लागणारी प्रदर्शनं, ग्राहक पेठा यात स्टॉल घेऊन पहा.... सुरुवातीला किंवा हल्ली बर्याचदा त्या स्टॉलचा खर्च पण निघत नाही अशी काही छोट्या उद्योजकांची बोंब आहे.... पण अश्या प्रदर्शनातून तुम्ही लोकांच्या नजरेत तरी येता....... तिथे कार्ड्स सर्क्युलेट करा....
अगदी जास्त खर्च वाटला तर अश्या प्रदर्शनात स्टॉल्स शेअरही करता येतात.... त्याचा अंदाज तुमच्या आसपासच्या भागात फिरून घ्या. रिकाम्या वेळात अश्या प्रदर्शनांना चकरा मारा. आयोजकांना भेटत जा.
>>> भुंगा +१. हेच लिहायला आले होते.
माहेर मासिकात पुण्याच्या ज्या
माहेर मासिकात पुण्याच्या ज्या इनामदार बाई बरीच वरषे साड्या उत्तम रीतीने विकत आहेत त्यांची जाहिरात येते. त्यांच्याशी संपर्क साधून काही ज्वाइंट अॅक्टिविटी करता येते का ते बघा. त्या फार अनुभवी आहेत आणि एक्स्क्लुझिव साड्या असतात. साड्यांच्या बरोबरीने डिझायनर ब्लाउज पीसेस,
ते शिवून देण्याची सुविधा, पेटिकोट्स वगिअरे पण ऑफर केले तर महिला घेतात व तुमचा टर्न ओवर वाढेल फेसबुक वर ओन्ली पैठ्णी आहे ते पेज बघून घ्या. बरोबरीने मॅचिन्ग ज्वेलरी सेट्स, रुमाल इत्यादी पण देता येइल. लग्नाच्या आहेराच्या साड्यांची एक गठ्ठा ऑर्डर मिळू शकेल. त्या नीट डेकोरेटिव पॅक करून देता येतील. ज्वेलरी डिझायनर स्त्रीशी संपर्क साधून एकत्र सर्विसेस ऑफर करता येतील. बायकांना एक लुक पूर्ण ऑफर केला तर आवडू शकेल. फॉल पिको ची सुविधा ऑफर करू शकाल. फक्त एक शिंपी हाताशी ठेवा. खूप वेळा सर्विसेस जोडून केल्याने दोघांनाही फायदा होतो.
सलवार सूट्स, लेगिंग्ज्स वगिअरे ठेवता का?
http://www.webs.com/ . . या
http://www.webs.com/
.
.
या लिंक वर तुम्हाला स्वतः ची वेबसाईट उघडता येईल.. पैसे खर्च करण्याआधी इथे फ्री मधे ओपन करुन बघा...रिस्पोंन्स पहा.......मग स्वतःचे डोमेन घ्या
तुमच्या व्यवसायाचा युट्युब
तुमच्या व्यवसायाचा युट्युब व्हीडीओ बनवा आणि त्याची लिंक जास्तीस जास्त स्प्रेड करा,FB वर फोटोज आणि विडीओ लिंक द्या .ईथे माबोवर जाहीरात द्या.मित्रांच्या फेबुवर शेअर करायला सांगा.
साधी साडी घ्यायला वेब साइट
साधी साडी घ्यायला वेब साइट पाहून कुणी येईल असे वाटत नाही.. अगदीच वेगळा प्रकार, पैठणी, जर, शालू असेल तर चालू शकेल.
लोकल ग्राहक जास्त महत्वाचे आहेत. वर्षातून चार सणाना तुमच्या लोकल एरियात पेप्रात पंप्लेट टाका. त्यात लग्नाच्या ऑफर, होलसेल ऑफर, भजनी मंडळातील बायकांना एकसारखा सेट पुरवणे याच्यावर लक्ष केंद्रीत करा. ४ भजनी मंडळातील बायकाना सुखी करु शकलात, तर मग पुढची भरभराट त्याच करतील ..
मग मधल्या काळात वेब साइट काढून याच पंप्लेटात त्याचा उल्लेख करता येईल, ऑन लाइन जाहिरातही देऊ शकाल.
लहान उद्योगाना पँप्लेट आणि लोकल ग्राहक हा जास्त सूट होणारा ऑप्शन आहे. वेब साइट काढली तरीही हे करावेच लागेल.
तूर्तास ब्लॉगरवर चार पानाम्चा ब्लॉग काढून त्याचा उल्लेख पँप्लेटात करा. फुकटात आणि १० मिनिटात काम होईल.
धन्यवाद. खुपच चांगल्या
धन्यवाद. खुपच चांगल्या आयडीयाज आहेत सार्या.
आश्विनीमामींना १०० % अनुमोदन
आश्विनीमामींना १०० % अनुमोदन !!!
बाकी टकाटक तुम आगे बढो, स्वता:चा व्यवसाय करता आहात. आमच्या शुभेच्छा तुम्हाला.
शेळीने दिलेल्या सल्ल्याशी
शेळीने दिलेल्या सल्ल्याशी सहमत.
@ टकाटक
तुमच्या व्यवसायाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा..!
अजय, भुंगा, मामी तुमच्या
अजय, भुंगा, मामी तुमच्या सुचनांचा सगळ्यांच नक्की फायदा होईल.
लहान उद्योगाना पँप्लेट आणि लोकल ग्राहक हा जास्त सूट होणारा ऑप्शन आहे. > अनुमोदन.
वर्तमानपत्र वाटणार्या मुलाच्या हातात ५० एक रुपये टेकवले की तो प्रत्येक वर्तमान पत्रात आपलं पँप्लेट सरकवून देतो... इच्छूक ग्राहका पर्यंत पोहचण्याचा हा सगळ्यात सोपा आणि स्वस्त पर्याय वापरुन बघा..
टकाटक तुमचे काम झाले
टकाटक तुमचे काम झाले आहे....मला तुमच्या कडून एक पन्नास साड्या घ्यायच्या आहेत. माझा मोबाईल नंबर आहे ९३२३५ ५२५९७ अथवा ९०२२२ ५२५९७. फोन करा नि ऑर्डर नक्की करा. !!!
तुम्हाला अगदीच "हे" वाटलं
तुम्हाला अगदीच "हे" वाटलं असेल, तर मी तुमच्या साड्यांचा प्रतिनिधी व्हायला तयार आहे. कमिशन बोला.....
आणि ब्रांड म्हणून "टकाटक
आणि ब्रांड म्हणून "टकाटक साडीवाले" हे काही अगदीच वाईट नाही.....
पण <<<अरेरे, मग पैसे खूपच कमी
पण <<<अरेरे, मग पैसे खूपच कमी असतील तुमच्याकडे>>> असा कॉमेंट्स तुमच्याकडुन अपेक्षीत नाहीत.मराठी माणुस आधीच बिझनेसमध्ये पडायला घाबरतो , अशा शेर्यांमुळे त्यांचं उरलं सुरलं अवसान घालवु नये .
टकाटक खुप सार्या शुभेच्छा तुमच्या बिझनेससाठी !
सहमत
मी तर आत्ताच विचारात पडलोय की माझी समस्या इथे मांडावी की नको.
सगळ्यांना धन्यवाद, इतके दिवस
सगळ्यांना धन्यवाद, इतके दिवस काही प्रतीक्रीया देता आली नाही. खुप घाईत होतो. वडील आजारी होते. त्यांना संभाळता ईतके दिवस गेले.
बाबा महाराज :- <<<अरेरे, मग
बाबा महाराज :- <<<अरेरे, मग पैसे खूपच कमी असतील तुमच्याकडे>>> असा कॉमेंट्स तुमच्याकडुन अपेक्षीत नाहीत.मराठी माणुस आधीच बिझनेसमध्ये पडायला घाबरतो , अशा शेर्यांमुळे त्यांचं उरलं सुरलं अवसान घालवु नये .
शेरे मनावर घेउ नयेत. ईब्लीस यांनी सहजच म्हंटलं होतं आणि त्या बद्द्ल त्यांनी माफी सुद्धा मागीतली आहे.
तुमची समस्या तुम्ही अगदी बिनधास्त मांडु शकता.
तुम्ही तुमची वेब साएट
तुम्ही तुमची वेब साएट www.Joomla.com वर जाउन तयार करु शकता. ३० दिवसासथि Free आहे. मला HTML हि येत नाहि पण माझि मी वेब साएट तयार केलि आहे content managment system (Joomla) वापरुन्.............तुमचि वेब साएट लवकरच दिसेल अशि आशा आहे......
Make free site. Put the
Make free site. Put the photos on it. And use Facebook page....and may be blog... everything is free. Important thing is one should visit there. So put all these links on your business card. {Sometimes people get impressed with website address
}.
Most important :- Concentrate on business than these sites etc. People will see the saree in person and then only will buy, that is the truth. So visit of customer to your place is important.
he marathit lihayach hot, pan kahitari gadbad aahe.
which is best site for photos
which is best site for photos ? may be I can use flicker and then embed photo/ video there. What say ?
>>>>> त्यापेक्षा घरी
>>>>> त्यापेक्षा घरी सत्यनारायण घाला. गल्लीत अन आसपास पत्रीका वाटा. पत्रिकेत प्रतिष्ठाणः अमुक्तमुक्माता साडी सेंटर लिवा. तीर्थ प्रसाद अन पानसुपारी. येतील तितक्यांना साड्या दिसतील असे बघा.. <<<<<
(ब्रूट्स यू टू? या चालीवर वाचावे) सत्यनारायण सूचविता?
काय हे इब्लिसराव, तुम्ही पण?
बर, आता सुचविलात तर ठीके, पण आमाला बरे विसरलात? गुर्जी म्हणून आमाला बोल्वायचे सान्गायला इथुन पुढे विसरू नका!
स्वतंत्र वेब साईट तयार करण्या
स्वतंत्र वेब साईट तयार करण्या आधी तज्ञांनी सांगितलेल्या गोष्टी कराच. फेसबूक ची कल्पना चांगली आहे.
शिवाय,
१] काही छोट्या व्यावसाईकांनी जर अशी वेब साईट सुरु केली असेल तर त्यान्च्याशी कोलॅब्रेशन करता येतय का तेही बघा. म्हणजे वेब साईट ची वेगळी जवाबदारी टाळता येउ शकते.
२] ई-बे वर वगैरे बरीच जणं बरच काही विकतात, तुम्हि त्यात "साडी" नावाची वस्तु अॅड करायची विनंति सम क्षेत्रातल्या विक्रेत्याला करु शकता.
३] तुम्हि ज्या शहरात राहता तिथे मंगल कार्यालयं असतील ना?
त्या प्रत्येक मंगल कार्यालयांमधे तुमचे बिजिनेस कार्डं वाटा आणि तिकडच्या मॅनेजर ला पटवा कि त्यान्च्या कडे तारीख बूक करायला आलेल्या प्रत्येक गिर्हाईकाला ते कार्ड द्याच म्हणावं! आणि शिवाय गिर्हाईकां चे पत्ते किन्वा किमान मो. नम्बर तरी शेअर करा म्हणावं जमलं तर.
मॅनेजर कमिशन मागेलच, पण द्या थोडे फार सुरुवातीला.
अशारीतीने तुम्हि प्रत्येक लग्नं घरी साड्या घेउन घूसू शकता. बायकांना घरी बसल्या बसल्या साड्यान्चा ढीग उलथा पालथा करायला फार आवडतो आणि तेवढंच नवर्यांन्ना "खरेदी कार्यक्रमातून" सुटल्याचा आनंद!
मंगल कार्यालय असो, मेहेन्दी असो, ब्युटी पार्लर असो...प्रत्येक ठिकाणी तुमची अॅड झळकलीच पाहीजे!
विषयांतर तर होत असेल तर माफ करा! अशीच कल्पना सुचली म्हणून पोस्ट केली.
नौकरी करण्याईतपत माझे शिकणे
नौकरी करण्याईतपत माझे शिकणे पण झालेले नाही, मला पण घरच्या घरी करता येणारे काही काम करायचे आहे,
मनात आहे की चागल्या प्रतीचे धान्य आणून स्वच्छ करुन दळून, गाळुन्, पॅक करुन विकावे. मेहनत तर बरिच आहे पण प्रतिसाद कसा मिळेल.
नौकरी करण्याईतपत माझे शिकणे
नौकरी करण्याईतपत माझे शिकणे पण झालेले नाही, मला पण घरच्या घरी करता येणारे काही काम करायचे आहे,
मनात आहे की चागल्या प्रतीचे धान्य आणून स्वच्छ करुन दळून, गाळुन्, पॅक करुन विकावे. मेहनत तर बरिच आहे पण प्रतिसाद कसा मिळेल.
टकाटक, कृपया आपण मला काही
टकाटक, कृपया आपण मला काही गोष्टी सांगू शकाल का?
१. आपण या साड्या कुठून विकत घेता आणि कुठल्या भागात विकता?
२. साड्यांची किंमत साधारण किती ते किती असते?
३. साड्यांव्यतिरीक्त अजून काही कपडे अथवा वस्तू विक्रीस ठेवता का?
४. या व्यवसायामधे सध्या आपल्याकडे मनुष्यबळ किती आहे?
५. व्यवसाय वाढवणे यामधे तुम्हाला नक्की काय साध्य करायचे आहे? ग्राहक वाढवणे, ग्राहकांकडून येणारा पैसा वाढवणे किंवा फक्त प्रसिद्धी जास्त करणे?
आपण यांची मला उत्तरे इथेच, विपुमधे अथवा संपर्कामधून देऊ शकता. त्यानंतर मी प्रसिद्धीसंदर्भात आपल्याला काही टिप्स देऊ शकेन. धन्यवाद.
माईडी, तुम्ही कुठल्या शहरात
माईडी, तुम्ही कुठल्या शहरात आहात? मुंबई पुण्यात असलात तर हा व्यवसाय खूपच चांगला आहे. तुमच्याकडे शिक्षण कमी असले तरी चालेल, पण अजून काही कला कौशल्ये अस्तील तर त्या दृष्टीने देखील तुम्ही विचार करू शकता. शिवण, स्वयंपाक, बालसंगोपन अशी काही कौशल्ये असल्यास त्यामधे कितीतरी प्रकारचे व्यवसाय करू शकाल. तुम्हाला शुभेच्छा.
मायबोलीच्या मुख्य पानावर वरती
मायबोलीच्या मुख्य पानावर वरती ज्या जाहिराती दिसतात तिथे आणि दुसर्या एखाद्या वेबसाईट वरही आपल्याला अशी जाहिरात द्यायची असेल तर काय करावे लागते?
म्हणजे कोणाला संपर्क करावा? त्याला काही charges असतात का?
@चैत्राली गुगल एडसेन्स
@चैत्राली गुगल एडसेन्स वापरावे लागेल. त्याची फी असते. तुमच्या बजेट प्रमाणे पॅकेज ठरवु शकता.
धन्यवाद अभिजित नवले.
धन्यवाद अभिजित नवले.
तयार वेब साईट अधिक आकर्षक आणि
तयार वेब साईट अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवण्याचे काम कसे करावे. शाळेची वेब साईत आहे.
शाळा खूप चांगली असुन चालत नसेल तर उत्तम मार्केटिंग साठी काय करावे?
शाळा खूप चांगली असुन चालत
शाळा खूप चांगली असुन चालत नसेल तर उत्तम मार्केटिंग साठी काय करावे?>>>
प्रिन्सेस, शाळा चालत नाही म्हणजे नक्की काय? स्टुडंट्स भरले जात नाहीत की शाळेचे नाव प्रसिद्ध नाही?
उत्तराबद्दल ध्न्यवाद नंदिनी !
उत्तराबद्दल ध्न्यवाद नंदिनी ! अरे तू तो गुरु है ना
तू आठवलीच नाही मला. सविस्तर मेलही करते वीकेंड्ला.
चालत नाही म्हणजे शाळेत स्वतःच्या नावाने लोक येत नाही. जे काही विद्यार्थी आहेत ते सगळे माउथ पब्लिसिटीने आलेत. पण इतर शाळांसारखं म्हणजे "बालमोहन का" चला तिथेच ट्राय करु असे ़कुणीच नाही ("बालमोहन" नांव उदा. दाखल घेतले आहे ही शाळा सध्यातरी त्यामानाने खूपच लहान आहे.)
बिझिनेस अतिशय छोटा आहे पण
बिझिनेस अतिशय छोटा आहे पण तूम्ही वर्षाला किती खर्च करु शकता वेब साईटवर ?
- साधारण ३०००-४००० हजार रुपये वर्षाला ईतका खर्च येतो फक्त होस्ट करायला आणि डोमेन नेम घ्यायला.
- साईट डेव्हलप आणि मेंटेन करायचे पैसे वेगळे. तूम्हाला साईट कशी हवी आहे त्यावर अवलंबून आहे. ़ कॉलेज विद्य्यार्थ्याकडून बनवून घेतल्यास काम स्वस्तात होईल पण क्वॉलेटी सांगता येत नाहि, पोर चांगली असतील तर झकास होईल.
आजून एक महत्वाच म्हणजे फोटो आणि व्हिडीयो. तूम्हाला नूसत्या साडीचे फोटो/व्हिडीयो वेब साईट वर टाकून चालणार नाही, त्यासाठी एक मॉडेल लागेल म्हणजे लोकांना साडीतले बारकावे आणि नेसल्यावर कशी दिसते ते कळेल.
"First Impression Is Last Impression" हे वेब साईटला पण लागू होतं.
पूढिल वाटचालीस शूभेछ्चा.
टकाटक, स्वानुभवावरुन ...
टकाटक,
स्वानुभवावरुन ... मायबोली छोटी जाहीरात ही अत्युत्तम जागा आहे जाहीरात करण्यास ... हव तर पेड जाहीरात करा. तसेच फेसबुक पेज पण चांगली जागा आहे.
मला खुपच फायदा झाला तुम्हाला पण होईल.
वेबसाईट पेक्षा ' स्वतचा:
वेबसाईट पेक्षा ' स्वतचा: ब्लॉग हे ही एक उत्तम माध्यम आहे
आणि इथे जशी जहिरात करतो तशी तुम्ही ही करायची
अमोल केळकर
जर सेल वाढवायचा असेल तर हा एक
जर सेल वाढवायचा असेल तर हा एक उपाय आहे.
साडीची भिशी सुरु करणे. म्हणजे ग्राहक कडून दर महिन्याला ठराविक रक्कम ठराविक महिने घेणे & मुदत संपल्यावर तो ग्राहक त्या पैशाची साडी घेवू शकतो. मध्यमवर्गीय लोकांना खूप भारी साडी घेणे ह्या मुळे शक्य होवू शकते. पण ह्या साठी तुम्हाला आधी ग्राहकाचा विश्वास संपादन करायला हवा .
..
..
OLX पे सब कुच बिकता है !!! पण
OLX पे सब कुच बिकता है !!! पण विनोदा पलिकडे OLX किंवा ebay हि खरंच सुंदर टूल्स आहेत !!!
ह्या संदर्भात अजून काही माहिती हवी असल्यास अजिबात संकोच न ठेवता संपर्क साधावा
आपला,
विशुभाऊ
Pages