Submitted by कौतुक शिरोडकर on 24 September, 2008 - 01:14
ये आई, सांग ना मजला
हे होते का असे ?
कालच्या कळीचे आज
डुलते फूल असे ?
पहाटेचा सुर्य
रात्री कुठे झोपतो ?
होता होता छोटा
चंद्र गुडुप का होतो ?
आकाशात तारे का लुकलुकती असे ?
ये आई, सांग ना मजला....
तुझा भाऊ मामा
अन पप्पांचा, काका
तुझी ताई मावशी
मग ही गं आत्या का ?
दोघांची ही आई, ती आजी का असे ?
ये आई, सांग ना मजला....
भुंकती का हे कुत्रे ?
पक्षी उडती का सारे ?
पडतो पाऊस कसा ?
येती कुठून हे वारे ?
प्रश्न किती किती, मला पडती का असे ?
ये आई, सांग ना मजला....
डब्यात माझ्या लाडू
कधी मोसंबी, केळं
रोज राहूल खातो
कुरमुर्यांची भेळ
ये पप्पा तू तरी सांग, तो करतो का असे ?
ये पप्पा, सांग ना मजला....
गुलमोहर:
शेअर करा
कौतुक छान
कौतुक छान आहे कविता.
आभारी आहे
आभारी आहे जगू. जमलं म्हणायचं. सत्या, कहाँ हो भाई ??????????
अरे... मी
अरे... मी आलो काय धम्माल उडवली आहे तुम्ही.. झक्क्कास
आप आये
आप आये बहार आयी. आहात कुठे ? इथे तुमच्या प्रांतात नवशिके आक्रमण करताहेत. आमचे कावळे ही वाट पहाताहेत. लोभ असु द्या.