Submitted by सानुली on 21 August, 2012 - 14:47
कोणी अमेरिकेत गणपतीची मूर्ती बनवली आहे का? असेल तर मला जरा डिटेल्स सांगणार का? कुठ्ली माती, कुठले रंग वापरलेत? कुठे फर्नेस मधे नेलीत का? त्यातल्या त्यात eco-friendly options असतील तर आवडतील, म्हणजे पाण्यात विसर्जनही करता येईल. मदतीबद्दल आगाऊ (आयडी नव्हे :)) धन्यवाद!!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सानुली , मायबोलीकर अनु३ च्या
सानुली ,
मायबोलीकर अनु३ च्या घरी बनवतात गणपती बाप्पा ची मूर्ती..
एकदम मस्त .. सगळे कलाकार आहेत त्यांच्या घरी ..
तुम्ही तिला विपु केली तर ती माहिती देऊ शकेल.
आम्ही २ वर्षापुर्वी घरी
आम्ही २ वर्षापुर्वी घरी मुर्ती बनवली होती. A. C. Moore मधुन टेराकोटा रंगाचा Natural Clay आणुन बनवली. त्याला रंगवले नाही. नंतर घरीच बादलीमधल्या पाण्यात विसर्जन केले आणि गणपती विरघळल्यावर पाणी झाडांना घातले.
मी मागच्या वर्षी केलेला
मी मागच्या वर्षी केलेला सोनुली..
मायकल्स मधून क्ले विकत आणली. गणपती वाळवला फक्त. मूर्ती विसर्जीत करायची असल्यानं फर्नेस वगैरेची गरज पडली नाही.
रंगवायला वॉटरकलर वापरले.
सात दिवसाचा गणपती होता.. मूर्ती व्यवस्थित टिकली..
नंतर बादलीत विसर्जन केलं..
मागच्या वर्षी आम्ही आणी
मागच्या वर्षी आम्ही आणी नानबाने एकत्रच केली होती गणपतीची मुर्ती. आम्ही दरवर्षी घरीच मुर्ती बनवतो (गणपती आणी हरतालिकेची)
मायकल्स मधुन मॉडेलींग क्ले आणुन त्या पासुन बनवता येते, वॉटर कलर दिल्याने आणि (तो क्ले वॉटरबेस असल्याने मुर्ती विसर्जन केल्यावर पुर्ण विरघळते.
ह्या वर्षीचे बाप्पा रविवारीच बनवून झाले आहेत
धन्यवाद रुतु, चना, नानबा आणि
धन्यवाद रुतु, चना, नानबा आणि अनु३. मी प्रयत्न करते या वर्षी. सांगते तुम्हाला काय झालं ते.
आम्हीही केली होती २ वर्षे
आम्हीही केली होती २ वर्षे अमेरीकेत मुर्ती. विनायक-पूर्वा, किरण-अमृता ह्यांनीही केली आहे आधी. आम्ही मायकल्समधून एअर ड्राईड क्ले आणली होती. ३/४ दिवस लागता मुर्ती पूर्ण कोरडी व्हायला. नंतर रंगवायची. मला रंगांचे नक्की डिटेल्स आठवत नाहीयेत पण साधे वॉटर कलर्स नव्हते. काहितरी स्पेसिफीक होतं खरं.
विसर्जन बादलीत केलं होतं आणि नंतर ते झाडात घालून टाकलं होतं.
हो मी पण नॅचरल क्ले वापरली
हो मी पण नॅचरल क्ले वापरली होती.कलर्स मात्र अॅक्रलिक होते.
धन्यवाद मंडळी. पूर्वा --
धन्यवाद मंडळी.
पूर्वा -- नॅचरल क्ले कुठून आणली होतीत? अॅक्रॅलिक कलर्स मायकेल्स का?
आम्ही नेहमीच बसवायचो. मायकल्स
आम्ही नेहमीच बसवायचो. मायकल्स मधील माती आणि वॉटर कर्लस. एकदा मूर्ती मध्येच भंग होऊ नये म्हणून ओव्हन मधून भाजली होती. पण विरघळायला त्रास झाला. घरीच पाण्याच्या बादलीत विरघळवता येते वा मंदिरात तलाव असेल तर तिथे विसर्जित करता येते.
गेल्या पाच एक वर्षांपासून तयार मूर्ती मिळत आहेत.
मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या
मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्यांबद्दल आभार. ही पहा मूर्ती.
मायकल्स मधील माती आणि अॅक्र्॓लिक कर्लस.
सानुली, मूर्ती अतिशय सुरेख
सानुली, मूर्ती अतिशय सुरेख बनली आहे.
गणपतीबाप्पा मोरया!
छान झाली आहे मूर्ती
छान झाली आहे मूर्ती सानुली!!
आमचीबी इथे पहा: http://www.maayboli.com/node/37995
छान बनली आहे मुर्ती..मोरया
छान बनली आहे मुर्ती..मोरया
मस्त झालीये !! मुकूट नाही
मस्त झालीये !! मुकूट नाही केला का?
धन्यवाद सगळ्यांना. नानबा --
धन्यवाद सगळ्यांना.
नानबा -- मस्त झालीये मूर्ती तुझीपण.
पराग -- केला प्रयत्न, पण हाच छान दिस्तोय असं वाटलं आता पुढच्या वर्षी करेन
मोरया!
एकदम भारी केली आहे मूर्ती.
एकदम भारी केली आहे मूर्ती.
मी कधी मुर्ती घरी केलेली
मी कधी मुर्ती घरी केलेली नाही.
michaels madhun Amaco brand - Natural Clay आणली आहे मी.
पण किती दिवस आधी करता येते मूर्ती? मुर्तीला भेगा तर नाही ना पडणार? भेग असलेली मुर्ती पुजेत ठेउ नये म्हणतात ना?कृपया उत्तर द्या.गोंधळ उडालाय. online search केलं मी पण ही perticular info नाही मिळाली.
सुप्रिया -- मी पण हीच आणली
सुप्रिया -- मी पण हीच आणली आहे माती. आत्ताच मूर्ती करायला घे. म्हणजे वाळेल गणपतीपर्यंत. नाहीतर ओलसरच रहाते. भेगा नाही पडणार घरातच वाळवली तर. उन्हात, फॅनमधे ठेवून अशी नको वाळवुस.
यासाठी साचा वापरतात का? की
यासाठी साचा वापरतात का? की हातानेच बनवली. हाताने बनवणे असेल, तर मला जमणारच नाही.
हातानेच बनवतो दरवर्षी ..
हातानेच बनवतो दरवर्षी ..
सुरेखच बनल्येय मुर्ति
सुरेखच बनल्येय मुर्ति
धन्यवाद सगळ्यांना. या वर्षी
धन्यवाद सगळ्यांना. या वर्षी बाबा इथे आहेत, ते एकदम कलाकार असल्याने अजुन छान झालीये मूर्ती. फोटो टाकते आज्-उद्या.
हा गणपती या वर्षीचा.
हा गणपती या वर्षीचा.
किती सुबक मूर्ती आहे!
किती सुबक मूर्ती आहे!
छान जमलाय!
छान जमलाय!
सुंदर आहे मूर्ती! रंगवल्यावर
सुंदर आहे मूर्ती! रंगवल्यावर परत एक फोटो टाका.
गणपती बाप्पा मोरया! फारच
गणपती बाप्पा मोरया! फारच सुरेख मूर्ती!
सुरेख झालीये मूर्ती.
सुरेख झालीये मूर्ती.
आई शप्पथ कसली भारी बनवली आहे
आई शप्पथ कसली भारी बनवली आहे मूर्ती.
फारच जबरी आहे. ़कशी बनवली
फारच जबरी आहे. ़कशी बनवली किती वेळ लागला वगैरे लिहीणार का ?
धन्यवाद परत एकदा! रंगवली की
धन्यवाद परत एकदा! रंगवली की फोटो टाकेनच.
बनवायला सुमारे ४-५ तास लागले. पण कशी बनवली ते कसं लिहु कळत नाहीये. मधल्या स्टेप्सचे पण फोटो काढले असते तर कदाचित सोपं गेलं असतं. आता नुसतच लिहिणं कठिण आहे. काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर जरूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
काय सुरेख बनवली आहे मूर्ती!
काय सुरेख बनवली आहे मूर्ती! मस्त!
अरे वा ! काय सुरेख बनवली आहे
अरे वा ! काय सुरेख बनवली आहे मूर्ती
मस्तच झाली आहे मुर्ती. या
मस्तच झाली आहे मुर्ती. या आमच्या मागील दोन वर्षाच्या मुर्ती. मालकांनी बनवल्या आहेत.
पहिल्यांदाच गणपतीची मूर्ती
पहिल्यांदाच गणपतीची मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
हा जरा जवळून.
एयर ड्राय क्ले वापरला आहे.
रंग अजून द्यायचा आहे. शक्यतो अॅक्रेलिक रंग वापरायचे नाहीयेत.
त्यामुळे सोनेरी रंगासाठी काही उपाय असल्यास कळवा. (अन्यथा पिवळा)
हे करायला आणि शिकायला खूप मजा आली!
अरे, माझा प्रतिसाद उडवला
अरे, माझा प्रतिसाद उडवला का?
अॅडमिनच्या बैलाला हो...... आणि गणपतीच्या उंदराला पण हो.....
ह्या लिंक वर मुर्ती बनवायचा
ह्या लिंक वर मुर्ती बनवायचा व्हिडीयो आहे. मी यंदा हे वर्कशॉप प्रत्यक्ष अटेंड करून मुर्ती बनवली आहे. नंतर फोटो टाकेन.
https://www.udemy.com/sculpting-ganapati-idol/?couponCode=bm501
पराग तेथे फक्त कोर्सची
पराग तेथे फक्त कोर्सची जाहिरात आहे.
पण त्यात बनवलेले गणपती अगदी सुरेख आहेत!
हे बनवताना माझ्या लक्षात आलेले मुद्दे असे -
नक्की कशी मूर्ती बनवायची आहे ते चित्र डोळ्यासमोर असले तर उपयोग होतो. मी बनवताना काही घेतले नव्हते. निव्वळ मनाने बनवत गेलो. (चित्र असते तर ४ हात बनवले असते. पाश आणि अंकुश पण दाखवले असते.) कदाचित पोट जरासे छोटे केले असते. पितांबरावर अजून जरा काम केले असते.
गणपती (किंवा कोणतेही स्कल्प्चर) बनवताना प्रपोर्शन्स महत्त्वाचे असतात.
गणपतीचे पाय हात आणि पोट निरनिराळे बनवून मग जोडावेत.
कसे जोडायचे याची कल्पना आधीच सुस्प्ष्ट असावी.
हे एकदा जमले की उरलेली कलाकुसर काय काय करायची हे पाहावे.
Air dry clay and water
Air dry clay and water colors.
सहीच पराग,त्या लिंकसाठी
सहीच पराग,त्या लिंकसाठी धन्यवाद!! अगदी योग्यवेळी ही माहिती दिली आहेस.
निनाद, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट,
निनाद, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मूर्तीचे पाय बरोबर आलेले नाहीत. पायघोळ पितांबर नेसल्यासारखे केले तर जास्त चांगले दिसेल. कान व किरिटाचे पण प्रपोर्शन, सिमेट्री व्यवस्थित आले पाहिजे.
कॅम्लिन सारखे तिथे रंग मिळतात का? सोनेरी,पर्ल, सिल्वर आणि कॉपर रंगांचा एक सेट मिळतो. अॅक्रिलिक ने केले तर फिनिश जास्त छान येइल. नपेक्षा व्हेजिटेबल डाइज चा उपयोग करता येइल.
राग मानू नका.
हा हा.. घरच्याघरी असले हुंब
हा हा.. घरच्याघरी असले हुंब प्रयोग करून गणपतीची विटंबना करू नये अशी कळकळीची विनंती.
अन्यथा सनातन संस्थेला कळवले जाईल.
सानुली, मस्त झाली आहे मूर्ती
सानुली, मस्त झाली आहे मूर्ती
धन्यवाद पराग. मी हा दुवा
धन्यवाद पराग. मी हा दुवा सेव्ह केला आहे. कधी गणपतीची मूर्ती केली नाही मी. पुण्यात आल्यावर यंदा हा क्लास करायचा विचार आहे.
सीमा ऑसम, बाकीच्यांच्या
सीमा ऑसम, बाकीच्यांच्या मूर्ती पण छान
मी शनिवारी केली मुर्ती. कधी
मी शनिवारी केली मुर्ती. कधी रंगवता येइल? येणारा विकंत long weekend आहे. तेव्हा रंगवता येइल का?
सगळ्यांच्या मदतीबद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद. फोटो टाकिन रंगवल्यानंतर.
धन्यवाद अश्विनीमामी! राग
धन्यवाद अश्विनीमामी! राग वगैरे कसला? त्रयस्थ रिव्ह्युच तर हवा होता.
तुम्ही म्हणताय ते जाणवले होते पण क्ले तोवर कडक होत गेला. आणि माझा पेशंस पण संपत गेला
आता अजून एक बनवून पाहतो. पण या वेळी चित्र समोर ठेऊन बनवणार आहे.
नपेक्षा व्हेजिटेबल डाइज चा उपयोग करता येइल.
व्हेजिटेबल डाइजचा उपयोग करता येईल ही आयडिया भारी आहे, प्रयत्न करण्यात येईल...
आमच्या घरी म्हणजे केळकर
आमच्या घरी म्हणजे केळकर लोकांकडे मूर्ती आणतच नाहीत. गुळाचा गणपती करतात. मी लहान असताना आई-बाबा नुसती लहानशी ढेपच ठेवत. क्वचित मऊसर गुळाने सोंड, दागिने बनवत असू.
पण माझे चुलत भाऊ कलाकार लोक्स आहेत. आता इथे अमेरिकेत तो गुळाची कडक ढेप आणून मस्त मूर्ती घडवतो. साधी सुरी, स्क्रु ड्रायव्हर सोबत आरारूटची पावडर हात कोरडे राहण्यासाठी. आणि काय एकेक पोझ घेतलेले बाप्पा त्याने घडवले आहेत. फोटो पिकासावर टाकून इथे लिंक देईन जमलं तर.
पूजेनंतर निर्माल्य काढून सुपारीच्या गणेशाचे विसर्जन करत असू. आणि गूळ रोजच्या स्वयंपाकात वापरला तरी चालतो. किंवा विसर्जनच करायचे असेल तर भरपूर पाण्यात विरघळवून झाडात घातले तरी चालते. मुंग्या होतात मात्र. म्हणून खूप पाणी वापरून डायल्युट करायचे.
या वर्षीची मूर्ती
या वर्षीची मूर्ती रंगवल्यानंतर.
मुर्ती वाळायला किति वेळ
मुर्ती वाळायला किति वेळ लागतो?
Pages