SANGOLLI RAYANNA : The Foremost Freedom Fighter of India ! B: 15-Aug-1798 – D: 26-Jan-1831
ब्रिटीश राजवटीविरुद्ध सलग - सतत 6 वर्षे लढून, ब्रिटीश राजवटीला ' सळो की पळो ' करून सोडणाऱ्या आणि वेळोवेळी संकटात आणणाऱ्या धनगर समाजातील क्रांतीकाराकापै की एकाअशा महान क्रांतिकारकाचे, आद्य स्वराज्यनायकाचे नाव ' रायान्ना '
रायान्नाने ब्रिटीश राजवटीविरुद्ध पुकारलेल्या असहकार आंदोलनास जनतेचा, अनेक गावाचा पाठींबा मिळाल्याने ब्रिटीशांची अक्षरश: झोप उडाली होती. रायान्नाने पोर्तुगीझाकडून ( गोआ ), कोल्हापूर संस्थानकडून ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी पाठींबा मिळण्याचा प्रयत्न हि केला होता. रायान्ना नायकाला पकडण्यासाठी अनेक बक्षिसे, आमिषेब्रीटीशांनी जाहीर केले होते. पण त्याचा काही एक उपयोग झाले नाही, कारण प्रजेची साथ रायान्नास होती. रायान्नाने ब्रिटीश सरकारचे खजिने लुटून जनतेस वाटले, ब्रिटीश सानिक कॅम्पवर जोरदार हल्ले केले, पुणे - मुंबई पोस्टल सेवा बंद पाडल्यामुळे ब्रिटीश सरकारला रेवेन्यू गोळा करून मुंबईला पाठविणे फार कठीण झाले. रायान्नाने ब्रिटीश राजवटीविरुद्ध उभी केलीली हि स्वराज्य चळवळ हि आजच्या कर्नाटक, महाराष्ट्र , गोआ व आंध्र प्रदेशाच्या काही भागात जावून पोहोचली होती. ब्रिटिशांनी या भारताचे आद्य स्वराज्यनायकाची कार्याची नोंद आपल्या फाईल मध्येकरून ठेवली. नंदगड येथे रायान्ना नायकाची समाधी आहे. या समाधीस भेटदेण्यास, दर्शन घेण्यास फार दूरच्या खेडोपाड्यातील राष्ट्रीय समाजातील विविध जाती - जमातीचे लोक येतात. रायान्ना'सारखा शूरवीर पुत्र वाहवा आमच्या पोटी व्हावा, असा नवस नवविवाहित करून, प्रतिक म्हणून समाधी जवळ असलेल्या वडाच्या झाडावर लहान पाळणे येथे बांधतात.
संगोळी रायांन्ना
Submitted by मेंढका on 21 August, 2012 - 12:07
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हुबळी / धारवाडमध्ये संगोळी
हुबळी / धारवाडमध्ये संगोळी रायण्णाचा पुतळा आहे. हा कोण माणूस होता, त्याने काय केलं असं विचारून मी नवर्याला भंडावून सोडलं होतं - पण त्याला काहीच माहिती नव्हती . आज माहिती मिळाली त्यांच्याविषयी!
मेंढका, उत्तम माहिती. हे नाव
मेंढका,
उत्तम माहिती. हे नाव पहिल्यांदाच ऐकलं. अशीच अनेक क्रांतिकारकांची गाथा आपल्यापुढे येवो.
एक प्रश्न पडलाय. संगोळी रायण्णा जर हुबळी धारवाडच्या आसपास कार्यरत असतील तर मुंबई पुणे टपालसेवा कशीकाय बंद पाडू शकले?
आ.न.,
-गा.पै.
एका अपरिचित वीराबद्दल माहिती
एका अपरिचित वीराबद्दल माहिती मिळाली.
लेखात जागोजागी ब्रिटिश सरकार, ब्रिटिश राजवट असे उल्लेख आहेत. रायन्नांचा कार्यकाळ १७९८ ते १८३१ पाहता, ते चुकीचे वाटतात. कारण त्याकाळी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा कारभार होता आणि तेदेखिल जरी ब्रिटिशच असले तरी, ती एक खाजगी कंपनी होती. ब्रिटिश सरकारचा कारभार १८५८ पासून सुरू झाला.