किती.....

Submitted by ashishcrane on 14 August, 2012 - 05:42

.....किती.....

जगले किती अन् मेले किती.....
भरून हि झोळी त्यांची नेहमीच रिती....
आले किती अन् गेले किती....
काहीच मढी....मरुन हि राहतात जिती....

वाटले किती अन् म्हटले किती....
वाकले किती अन् झटले किती....
मानले किती अन् पटले किती....
खरे सुंदर किती अन् नटले किती.....

हिम्मत किती अन् ध्यास किती...
चोर किती अन् व्यास किती.....
सुंगंध किती अन् वास किती....
खरे किती अन् आभास किती....

राव किती अन् रंक किती....
गणितं किती अन् अंक किती...
आभाळ किती अन् पंख किती...
सहनशक्ती किती अन् डंख किती...

हरले किती अन् शिकले किती....
जन्मले किती अन् पिकले किती....
केले सुरु किती अन् टिकले किती....
शुद्ध किती अन् विकले किती....

जुने किती अन् नवे किती....
जबरदस्ती किती अन् हवे किती....
एकटे किती अन् थवे किती.....
भोवती किती अन् तुझ्यासवे किती....

जवळ किती अन् दूर किती....
गाव किती अन् पूर किती...
किंकाळ्या किती अन् सूर किती...
आवाज किती अन् काहूर किती...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहीले कडवे सोडले तर खाली प्रत्यक कडव्यात . नुसती किती -कितीचीच निरर्थक मांडावळ झाली आहे. या प्रत्यक कितीला प्रत्यक कडव्याच्या शेवटी त्याचामागील काही मथीतार्थ सांगणारी अशी पुरक ओळ असायला हवी.

थोडेसे कष्ट घेतलेत तर जमेल ही कविता चांगली

खरे सुंदर किती अन् नटले किती.....
खरे किती अन् आभास किती....

या दोन्हीचा अर्थ एकच तर होतो मग पुन्हा लिहायची गरज काय?
थोडा प्रयत्न करा आणि सुधारून टाका ही कविता Happy