मंगळावरील प्रयोगशाळा
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
20
क्युरिऑसिटी साधारण १२ तासांपूर्वी मंगळावर अवतरले. मंगळाचे एक वर्ष कार्य करु शकेल इतपत उर्जा या मंगळाचराला प्लुटोनियम द्वारे उपलब्ध आहे. ताशी ३० मिटर गतीने सरकत, अडीच फुटांपर्यंतचे अडथळे पार करत क्युरिऑसिटी या लाल ग्रहाची माय्क्रोब्सना सहन करण्याची वृत्ती आजमावेल. पण हे विज्ञानाबद्दलच नाही तर अर्थकारणाबद्दलही आहे.
ग्रहांशी माझे (फार)काही देणेघेणे नाही, पण यावर कोणीही काहीही न लिहिलेले पाहून राहवले नाही. म्हणून हा आल्प खटाटोप. सगळीकडे याबद्दल बरेच काही अर्थातच उपलब्ध आहे.
विषय:
प्रकार:
शेअर करा
खुद्द तुम्ही असताना कोण काय
खुद्द तुम्ही असताना कोण काय लिहिणार अस्चिग साहेब?
पण जमले का नाही ते त्यांना?
मला तर वाटले (मला काय? काहीही वाटू शकते - हा हा ) फिरत राहील अती विरळतेमुळे
४९००० भारतीयांच्या नावात तुमचे आमचेही असेल बहुतेक, पण वादळात नष्ट होईल
असेनात का, माणसाला कोणी ओळखते का हा शोधही (पोएटिकली) महत्वाचाच
-'बेफिकीर'!
पण हे विज्ञानाबद्दलच नाही तर
पण हे विज्ञानाबद्दलच नाही तर अर्थकारणाबद्दलही आहे. >> +१
तरीही its thrilling no doubt.
इथे लिहिल्याबद्दल
इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
नाहीतर बातमी वाचायची राहून गेली असती.
its thrilling no doubt. >> +१
घ्या प्लीज
आम्ही फॉलो करतो ना. सर्व
आम्ही फॉलो करतो ना. सर्व आंतरग्रहीय गोश्टी व एक तारा हललेला सुटत नाही आमच्या निरीक्षणातून. वंडर्स ऑफ द युनिवर्स परत परत बघतो. आणि ब्रायन कॉक्स चे ट्विटर/ फेसबुक फीड असते लक्ष ठेवायास. मला तर जाम इथे राहायलाच बोअर होते. मस्त अंतराळयानातुन भटकावेसे वाट्ते. टर्बो कॅट सारखे
नेहरू सेंटर मधे कोर्सेस आहेत ते ही करायाचा विचार आहे. तुम्ही अजून का नाही लिहीले यावर?
@मित लाइत्लि घ्या प्लीज
@मित
लाइत्लि घ्या प्लीज <<
गेलात ते गेलात! तिथेही १२ तासात आसपास किति कचरा करुन ठेवलात? कधि सुधारनार तुम्हि?
काही गोष्टी या मिशन बाबत
काही गोष्टी या मिशन बाबत महत्वाच्या होत्या:
(१) आपण हळुहळु का होईना, पुढे जातो आहोत.
(२) विज्ञानाला इतक्या दूरवर सुद्धा अचूकपणे क्लिष्ट गोष्टी करता येतात (ज्यांचा विश्वास नव्हता त्यातील काही 'कन्व्हर्ट' झाले असतील अशी आशा आहे). कॉमेंटरीच्या वेळी एकजण नेहमीची फ्रेज्/स्लँग उच्चारता झाला - 'अनबिलिव्हेबल'. मला ते खूप खटकले. इतक्य लोकांनी मिळून काहितरी साध्य केले आणि तुम्ही त्याला अविश्वासनीय म्हणता? उलट्या अर्थी जरी म्हणायचे असले तरी त्याच अर्थाच्या जास्त सकारात्मक शब्द नक्कीच वापरता आले असते.
शेवटची सात मिनिटे महत्वाची होती. त्याबद्दलचे हे एक चांगले कार्टून. त्यावरच त्याच्या जनकाचे नाव आहे.

छान आहे कि चित्र. नेट वर कायम
छान आहे कि चित्र. नेट वर कायम भेटणार्या मीमस चा उपयोग करून् घेतला आहे. खरेच मंगळावर, चंद्रावर राहता येइल का? कमसे कम ल्युनर कॉलनीतरी बघायला मिळावी.
वर उल्लेखलेले भाग प्रत्यक्षात
वर उल्लेखलेले भाग प्रत्यक्षात कुठे पडले ते दाखवणारे चित्र ...
“Scene of the Crime” image of Curiosity's landing site, showing scattered Mars Science Lab hardware. (Credit: NASA/JPL/Caltech)
इथे पोस्ट लिहील्यावर मग
इथे पोस्ट लिहील्यावर मग लोकसत्ता व इकॉ टाइम्स मधील कव्हरेज वाचले. गेल विवर जिथे क्यु. उतरले आहे त्यात आत पर्वतही आहे. मोहिमेचा खर्च १.६ बिलिअन डॉ. च्या पुढे आहे. काही पार्टस रशियाने बनविले आहेत. व भारतीय तंत्रज्ञ , शास्त्रज्ञांचा टीम मध्ये समावेश आहे. प्लुटोनिअम फ्युएल असलेल्या गाड्या मग पृथ्वीवर नाही का चालू शकत? इंधनाचा प्रश्न सुटेल की. काहीतरी संशोधन चालू असेलच. this mission is a triumph of sheer planning and execution. that too remotely. Everything functioned perfectly at such a far distance and so accurately. it is amazing.
ब्रायन ने एक चित्राची लिंक
ब्रायन ने एक चित्राची लिंक दिली आहे. हीट शील्डचे चित्र आहे.
http://www.nasa.gov/multimedia/imagegallery/image_feature_2328.html
आश्चिग या धाग्याशी असंबंधित
आश्चिग
या धाग्याशी असंबंधित पण तुम्ही दिसल्याने न राहवून विचारावासा वाटणारा प्रश्न.
जे विश्व सध्या ज्ञात आहे ( बिग बँग मधून तयार झालेले) त्या पलिकडे ग्रह, तारे नाहीत का ?
किरण, हा प्रश्न खगोलशास्त्रीय
किरण, हा प्रश्न खगोलशास्त्रीय सटरफटर धाग्यावर विचारला तर सोपे पडेल. त्या तिथे खूपशी उत्तरे आधी पासून आहेत. अर्थात साहेब काय म्हणतील तसे.
जशी आज्ञा धागे लक्षात ठेवावे
जशी आज्ञा
धागे लक्षात ठेवावे लागतील.
धागे लक्षात ठेवावे लागतील>>
धागे लक्षात ठेवावे लागतील>> हो कारण हे विश्व अनंत आहे. आपण फक्त चंद्र मंगळापरेन्त पोहोचलो आहोत किरण. सितारोंसे आगे दुनिया और भी है. कृपया सर्च जारी रखें!
मंगळ आणि ऑलिंपीक्सना जोडणारे
मंगळ आणि ऑलिंपीक्सना जोडणारे हे एक चित्र - विज्ञान आणि कॅपिटलीझमची विषम अंगे दाखवणारे.
त्याची पार्श्वभूमी अशी आहे की इथे टिव्हीवर ऑलिंपीक्स अनेक तास उशीरा दाखवले जातात
नासाचा उशीर प्रकाशाच्या गलथान गतीमूळे आहे.
किरण, तिकडेच उत्तर देईन.
नासाचा उशीर प्रकाशाच्या गलथान
नासाचा उशीर प्रकाशाच्या गलथान गतीमूळे आहे.>>> हा महान होता!
सात मिनिटावालं कार्टुन आणि
सात मिनिटावालं कार्टुन आणि शेवटचं चित्र लई भारी !
नासाचा उशीर प्रकाशाच्या गलथान
नासाचा उशीर प्रकाशाच्या गलथान गतीमूळे आहे >
हा एक नवा (अगदी तात्पुरता)
हा एक नवा (अगदी तात्पुरता) एक्स्क्युज