विलेपार्ले येथील गटग वेबमास्टर अजय गल्लेवाले व १९ मुंबईकर मायबोलीकरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. साडेसहापासूनच द शॅक रेस्तोरां मायबोलीकरांच्या आगमनानं गजबजू लागलं.माझं तर हे पहिलंच गटग,पण तसं अजिबात न वाटण्याचं मुख्य कारण वेबमास्तरांचे व्यक्तिमत्व. मायबोलीच्या यशाचं रहस्यच ते. दुसरं कारण कदाचित मैत्री दिवसाचा सुमुहूर्त असावा. यावर संकष्टीचा वचक होताच पण..
कालचा ग्रूप मूळ मायबोली परिवाराइतकाच प्रातिनिधिकपणे संमिश्र होता..तरूण तुर्क,मध्यमवयीन अर्क, ५०,-५० % स्त्रीपुरुष ,वेगवेगळे वयोगट,इंटरेस्टस शिवाय सेंट्रल विरुद्ध वेस्टर्न हा मुंबईकरांचा प्रिय सनातन वादाचा मुद्दा..अशा तर्हेतर्हेच्या तर्हेवाईक ३९००० (चु.भू.द्या.घ्या.) मराठी माणसांना एकत्र आणणं हे ,एखाद्या नव्या धर्मसंस्थापनेइतकंच कठीण, खायचं काम नाही ते,असा विचार करतानाच तितकाच ' रंगीबेरंगी' खाना हजर झाला (सौजन्य वेमा !!) व गप्पांबरोबरच खायचं कामही सुरू झालं.
अजयजींशी अनौपचारिक गप्पा मारणं खूपच सोपं होतं .सगळ्यांशी मिळत मिसळत त्यांनीच तर एक असं वातावरण निर्माण केलं की मैत्री दिवसाचा अर्थ आणि उद्देश सहज लक्षात आला..
पुढचे दोन अडीच तास गप्पा ,फिरक्या,आस्थेने केलेल्या परस्परांच्या चौकशा,खाणं-पिणं (फ्रूटज्यूस वगैरे :)) अर्थातच ) ,अमर्याद खिदळणं यात कसे गेले कळलंच नाही. मुंबईकरांना थोडा वेळ चक्क घड्याळाचा विसर पडला होता.
अजयजींना भावपूर्ण प्रवासशुभेच्छा देऊन परतताना लक्षात राहिलं ते..
वेबमास्तरांनी आरंभवून विस्तारलेलं मायबोली नावाचं घर..
नीधप ची वेस्टर्नचा टक्का वाढल्यामुळे वाढलेली एक्साईटमेंट
त्यासमोर सेंट्रलचे दमदार खेळाडू मंजूडी, (छोटीशी चार्मिंग ज्यूनिअर मंजूडी ),ललिता प्रीती
दोन्ही स्वयंनियोजित छायाचित्रकारांची (आशुतोष आणि सेनापती ???)प्रेमळ लगबग..
रोमातले रोमन्स मनी वसणारे
डूआयच्या चर्चा अन सामोरा आयडू ( त्याची व्यवितली पोज पाठमोरी आहे)
_नील_ अन आनंदमैत्रीचं इतरांना हसवत ठेवणं
शांतपणे बसून सर्वांचं निरीक्षण करणारी दोन कलाकार व्यक्तिमत्वे- पाटील अन नीलू
जुन्या जाणत्या उत्साहाने भरलेल्या अश्विनी के.,सुजा अन अनिताताई ,
दहा वर्षांपासून मायबोलीची सहप्रवासी पण तुलनेने लहान वयोगटातली मोनालिपी ,
जाई साहित्ययात्री माझ्या सहप्रवासचाही ट्रॅक ठेवणारी..मी धन्य झाले!
मामी,भुंगा न आल्याने माझ्या उत्सुकतेवर पडलेले पाणी .. उशीरा का होईना आलेले कीरू ..
या लहानशा गटगमध्ये भेटलेले जाणवलेले मराठी व्यावसायिकांचे उद्योजकांचे हूंकार,संघर्ष ..त्यांना शुभेच्छा.
.
मी फारच नवीन असल्याने काही संदर्भ, उल्लेख राहिले किंवा चुकले असतील तर क्षमस्व.राहिले असतीलच .अज्ञानातून अनुल्लेखही झाले असतील..अजूनही आयडी अन नावांचा गोंधळ होतोय म्हणून जरा जपून जपूनच लिहिलेय.
अत्यंत नवख्या मायबोलीकरणीचे हे मनोगत.पण परिवारभावना मुळीच नवी नव्हती.
शेवटी,या महानगरात वेस्टर्न की सेंट्रल - आम्ही १०५!
महाराष्ट्राचा एकूण टक्का मुंबईत प्रभावी असावा अन मुंबईकरांचा मायबोलीवर वाढत रहावा अशा शुभेच्छा.
जय हो!!!
भारती बिर्जे डिग्गीकर
_नील_ अन आनंदयात्रीचं इतरांना
_नील_ अन आनंदयात्रीचं इतरांना हसवत ठेवणं
>>
बहुदा हे आनंदयात्री नसावं अस वाटतय
चेक करणार का प्लिज
अरेव्वा! गटग छान संपन्न
अरेव्वा! गटग छान संपन्न झालेलं दिसतंय. मनात असूनही येणं झालं नाही. पण वेमांशी ववि मधे भेट झाली होतीच त्यामुळे खूप खट्टु व्हायला झालं नाही!
आनंदयात्रीचं >> आनंदमैत्री
आनंदयात्रीचं >>
आनंदमैत्री म्हणायचं असेल!
मस्त लिहिलं आहे पण १०५ मधले
मस्त लिहिलं आहे

पण १०५ मधले कौरव कोण ते सांगा बघू!
पण १०५ मधले कौरव कोण ते सांगा
पण १०५ मधले कौरव कोण ते सांगा बघू! >> वृ. वाचून असं वाटतंय की वेस्टर्न ची लोकसंख्या जास्त होती.
म्हणजे .....
भारती, ह्या धाग्याचे शीर्षक
भारती,
ह्या धाग्याचे शीर्षक वाचून असा बोध होतोय की अजून एखाद्या गटग ची घोषणा आहे की काय! "वेमा विलेपार्ले गटग वृत्तांत" असे काहीतरी योग्य व सूचक शीर्षक देता का प्लीज?
>>_नील_ अन आनंदयात्रीचं >> हो
>>_नील_ अन आनंदयात्रीचं >> हो मैत्रीच तो
भारती ताई साधा सुटसुटीत तरी मस्त वृतांत
>>सेंट्रल विरुद्ध वेस्टर्न हा मुंबईकरांचा प्रिय सनातन वादाचा मुद्दा>>
पण नील ने सांगितल्या प्रमाणे हा मुद्दा हल्लीच उपस्थित होऊ लागलाय. पूर्वीचे बहुतेक गटग शिवाजी पार्कातच होत असल्यामुळे हा वादच नव्हता. 
बादवे नीलचा सुपरमॅनचा किस्सा धमालच आणि वेमांचा अॅडमिन लॉगिन चा
होय निंबुडा, रिया,
होय निंबुडा, रिया, नवशिक्यांच्या चुका ! दुरुस्त करतेय :
कौरवपांडव नवा वादाचा मुद्दा दिला मीच. < कपाळावर हात > ! ;))
भारती, वाद वगैरे नाही, तुम्ही
भारती, वाद वगैरे नाही, तुम्ही १०५ लिहिले म्हणून गंम्मत केली थोडीशी.
मस्त लिहिले आहे भारतीताई
मस्त लिहिले आहे भारतीताई
नीलचा सुपरमॅनचा किस्सा धमालच आणि वेमांचा अॅडमिन लॉगिन चा>>> हे जरा तपशीलात लिहा, आम्ही लांब बसल्याने आम्हाला नुसताच हास्यकल्लोळ ऐकू आला.
भारती , छान लिहिलाय
भारती , छान लिहिलाय वृत्तांत.
बादवे नीलचा सुपरमॅनचा किस्सा धमालच आणि वे मांचा अॅडमिन लॉगिन चा ...
आमच्या कानावर फक्त धमाल हशाच आला...आम्हाला सांगा पाहू ते किस्से.:स्मित:
. बादवे नीलचा सुपरमॅनचा
.
बादवे नीलचा सुपरमॅनचा किस्सा धमालच आणि वे मांचा अॅडमिन लॉगिन चा ...
आमच्या कानावर फक्त धमाल हशाच आला...आम्हाला सांगा पाहू ते किस्से.
मी पण थोडं मिस केला इतरांशी बोलण्यात ....नीलू तूच सांग नीट.
शैलजा मी नाही सीरियस :)) आपणच आळीपाळीने कौरवपांडव.
आभार सर्वांचे.काही महत्वाचं राहिलं असेल ते अॅड करा ना..अधिक ते सरते न्यून ते पुरते करून घ्यावे
धन्स मोनालिपी.
बादवे नीलचा सुपरमॅनचा किस्सा
बादवे नीलचा सुपरमॅनचा किस्सा धमालच आणि वेमांचा अॅडमिन लॉगिन चा>>> हे अनुल्लेखीत झालेलेच चांगले. बाकिचे चाणाक्ष होतील नाहितर
भारती खुपच छान लिहिले आहे
भारती खुपच छान लिहिले आहे
हा तर तो किस्सा असा.... कधी
हा तर तो किस्सा असा....
पण लगेच त्याचा फायदा घेत त्यांनी पासवर्ड बदलून टाकला त्यानंतर दोन तीन दिवस तरी सुपर स्पीड एकदम मंदावला. त्या वेळी वेमा म्हणाले हे तर काहीच नाही अॅडमिन आयडीच्या बाबत असा प्रकार करण्याचा प्रयत्न अनेकदा झालाय

कधी एके काळी म्हणे सुपरमॅन नामक आयडीने आपल्या नावाला जागून सुपरस्पीडने विनोदाच्या बाफ वर लागोपाठ अनेक विनोद पोस्ट केले. ते ही विंग्रजीत... काही दिवस हा प्रकार चालू होता... तेव्हा वैतागलेल्या, करवादलेल्या निळूभावंनी आयडी पासवर्ड दोन्ही 'सुमॅ' टाकून लॉगिन केले आणि ते चक्क झाले.
पण सेंट्रल वालेच जास्त होते.
पण सेंट्रल वालेच जास्त होते. हो की नाही मंजु, लले, केश्वी, नीलु, सेना, आय्डु, _नील_, आशुतोष, आनंद, बा.बुवा, मी...अजुन कोण राहिलेय रे?

सो जरा मोजणी करा लोकहो
रच्याकने , तो म्हणी ----> शेर ----> गजल हा प्रवास पण लिहा. केश्वी तुच चांगले लिहिशील ते
एकाची दोन मोजणी नाही करायची
एकाची दोन मोजणी नाही करायची हं. आमच्याकडचे डू आय शोधावे लागतील. :))
>>तो म्हणी ----> शेर ---->
>>तो म्हणी ----> शेर ----> गजल>>> हो हो तेही..
दोन म्हणी मिळून एक शेर होतो आणि काहीतरी चार पाच म्हणी मिळून गझल वगैरे अशी मौलिक माहिती मिळाली
आमच्याकडचे डू आय>>> नाही हं
आमच्याकडचे डू आय>>> नाही हं भारती मी आयडू लिहिलेय डु आय नाही


दिपक, नशीब रे तु आयडी बदलुन आयडु केलेयस आधीच
असो, पण शेवटी आम्ही १०५ हे आलेच आहे की वर
धम्माल केलेली दिसतेय
धम्माल केलेली दिसतेय
भारती, वृत्तांत एकदम सही
भारती, वृत्तांत एकदम सही लिहिलाय. अप्रतिम शैली.
संकष्टीचा वचक >>>> भारीच्चे.
मामी,भुंगा न आल्याने माझ्या उत्सुकतेवर पडलेले पाणी .. >>>> बघितल्यावर अपेक्षाभंगाचं दु:खं पदरी पडण्यापेक्षा बरं हे!
धन्स रुणुझुणू,
धन्स रुणुझुणू, मामी..
मामी,भुंगा न आल्याने माझ्या उत्सुकतेवर पडलेले पाणी .. >>>> बघितल्यावर अपेक्षाभंगाचं दु:खं पदरी पडण्यापेक्षा बरं हे!
ह्याला म्हणतात विनय. :))
छान लिहिलंय मामी
छान लिहिलंय
मामी
मामी.. मस्त वर्णन भारती..
मामी..

मस्त वर्णन भारती..
माका सगळ्यात जास्त ईंटरेस्ट
माका सगळ्यात जास्त ईंटरेस्ट आसा तो, 'काल दही-हंडी कोणी फोडली?', ह्येच्यात...
बा-बु की नी...?...
भारती...
छान लिहिलंय... आवडलं...
ह्याला म्हणतात विनय. >> आणि
ह्याला म्हणतात विनय. >> आणि त्याला म्हणतात टांगारू
वृत्तांत सहीय
अॅडमिन आयडीच्या बाबत असा
अॅडमिन आयडीच्या बाबत असा प्रकार करण्याचा प्रयत्न अनेकदा झालाय>>
धन्स ललिता प्रीती ,वर्षू
धन्स ललिता प्रीती ,वर्षू नील,विवेक,इन्द्रधनुष्य. झकासराव.
दही हंडी व्हर्टिकल नाही फोडली. हॉरिझाँटल. नीधपने.
काल पार्ल्यातल्या वाहत्या रस्त्यावर शेवटचा फोटो काढताना .. :))
छान वृतांत वेमाना आणि
छान वृतांत
वेमाना आणि माबोकरांना भेटून खूपच मजा आली
नी चे यासाठी आभार
शँक सापडायला अडचण नव्हती
सुपरमँनचा किस्सा भारी होता
धमाल केली
शेवटी फोटो काढण्याच्या वेळी जाम मजा आली
नीलु , धमाल किस्से शेअर केलेस
नीलु , धमाल किस्से शेअर केलेस म्हणून धन्यवाद!
दोन म्हणी एकाखाली एक लिहिल्या की एक शेर होतो!
असे चार-पाच शेर लिहिले की गझल होते! असं कोणीतरी म्हणालं..:स्मित:
Pages