Submitted by अवल on 4 August, 2012 - 04:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अळूच्या उकडलेल्या वड्या ५ - ६
चिंचेचा कोळ अर्धी वाटी
गूळ एक मोठा - लिंबा एव्हढा खडा
तिखट १ चमचा
हळद पाव चमचा
मीठ चवीप्रमाणे
कोथिंबीर
कढीपत्त्याची ४ -५ पाने
तेल २ चमचे
जिरे अर्धा चमचा
पाणी अर्धा कप
क्रमवार पाककृती:
पातेल्यात तेल टाकून तापत ठेवा.
त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की त्यात कढीपत्ता टाका. हिंग टाका. तिखट, हळद, मीठ टाका. आता त्यात चिंचेचा कोळ टाका. गूळ टाका. पाणी टाका. कोथिंबीर टाका.
एक उकळी आली, गूळ नीट विरघळला की त्यात अळूच्या वड्या सोडा. उकळी आली की झाकण ठेऊन २ -४ मिनिटं शिजवा.
तयार आहे झणझणीत रसपात्रा.
वाढणी/प्रमाण:
दोघांना पुरेल
अधिक टिपा:
हे नुसतेच खायचे ( खरे तर ओरपायचे) जसे इडली सांबार खातो तसे. या नंतर मस्त मुगाच्या डाळीची खिचडी. आत्मा तृप्त
माहितीचा स्रोत:
पारंपारिक गुजराती पदार्थ, आजी-आईकडून शिकले.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच लागतो हा प्रकार. एका
छानच लागतो हा प्रकार. एका लग्नात खाल्ला होता मी.
मस्त लागत असेल असं त्याचा
मस्त लागत असेल असं त्याचा फोटोच सांगतो आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप च मस्त .....
खुप च मस्त .....
वा! छान प्रकार वाटतोय.
वा! छान प्रकार वाटतोय.
छान आहे. करुन बघणार. इथे
छान आहे. करुन बघणार. इथे उकडलेल्या वड्या मिळतात.
मस्त आहे रेसिपी...
मस्त आहे रेसिपी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लागत असेल असं त्याचा
मस्त लागत असेल असं त्याचा फोटोच सांगतो आहे>>+१
झकास!
झकास!
सोपा आहे करायला. इथे तयार
सोपा आहे करायला. इथे तयार अळूवड्या मिळतात त्यामुळे काम सोप्पं. पाण्यात ह्या वड्या मिळून येतात का, म्हणजे रस्सा पाणीदार लागत नाही ना?
मस्त आहे हा प्रकार. सायो,
मस्त आहे हा प्रकार.
सायो, वड्या मिळुन येत नाहीत ...आंबटगोड पाण्याबरोबर किंवा पाण्यात चुरुन खायच्या.
लई म्हणजे लईच भारी, फोटो
लई म्हणजे लईच भारी, फोटो अप्रतिम
हे स्वतःच करून बघणार
धन्स अ लॉट्स
एकदम तो पा सू
एकदम तो पा सू
मी केला. मस्त लागला. धन्यवाद
मी केला. मस्त लागला. धन्यवाद अवल.
सायो, रस्सा पाणीदार लागत नाही. चिंच आणि गुळाने दाटपणा येतो. मी दीपच्या वड्या घातल्या. काही तुकडे करुन घातल्या. त्यात तीळ-खोबरेही असते ते दिसते आहे-
बघितल्यावर शाकाहारी सात्त्विक गुजराती पदार्थ आहे असे वाटत नाही.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्तच! नक्की करून बघीन.
मस्तच! नक्की करून बघीन.
मस्त दिसतोय लोला. नक्की करुन
मस्त दिसतोय लोला. नक्की करुन बघणार.
मस्त दिसतोय हा प्रकार दोन्ही
मस्त दिसतोय हा प्रकार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोन्ही फोटो एकदमच तोंपासु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान
खूप छान
व्वा, एकदम तोंपासु दिसतोय हा
व्वा, एकदम तोंपासु दिसतोय हा प्रकार.
धन्यवाद सर्वांना. वा लोला,
धन्यवाद सर्वांना.
>>>बघितल्यावर शाकाहारी सात्त्विक गुजराती पदार्थ आहे असे वाटत न<<< अगदी अगदी ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा लोला, मस्त दिसतोय. अगदी जमलाय
मी ही आज केली ही भाजी. मस्त
मी ही आज केली ही भाजी. मस्त लागली चवीला. फ्रोजन अळूवड्या वापरल्यावर करायलाही काहीच खटपट नाही. रस मात्र मी अंगासरशी ठेवला.
अवल अळूवड्या कशा करतात ते
अवल अळूवड्या कशा करतात ते सांगितले तर बरे होइल.
इथे जागूने सांगितली आहे बघा
इथे जागूने सांगितली आहे बघा
: http://www.maayboli.com/node/21775?page=1