न्यॉकी/न्योकी साठी :
स्वीट पोटॅटो / भोपळा किंवा बटाटे / रताळी यातिल काहिही किंवा सर्व
शिंगाड्याचे पिठ/ उपवासाची भाजणी / वरीचे पिठ
चविला मिठ
जीरे पावड ऐच्छिक
सोबत: पुढिलपैकी कहिही ऐच्छिक
दही (तिखट -मिठ किंवा हिरवी मिरची - मिठ घालुन, किंवा गोड दही)
साजुक तुप
चोचवलेली काकडी
किंवा
कोथिंबीर पेस्टो :
कोथिंबीर - धुवुन आणि चिरुन
काजु - थोडावेळ गरम पाण्यात भिजवुन
लाल सुक्या मिरच्या - थोडावेळ गरम पाण्यात भिजवुन
आल्याचा तुकडा
थोडासा लिंबाचा रस
जिरे - भरडुन किंवा पावडर
चवीला मिठ, साखर
तेल (मी ऑऑ वापरले - उपवासाला चालते का ते माहित नाही)
मागे मी बटाट्याच्या न्यॉकी / न्योकी ची पाककृती दिली होती.
काल खुप दिवसांनंतर परत न्यॉकी केली. घरात स्वीट पोटॅटो होता म्हणून म्हंटलं त्याची पण न्यॉकी करुन बघु. मग विचार केला उपवासाची न्यॉकी केली तर??? आणि मग करुनच बघितली
जे नेहमी उपवास करत असतिल त्यांच्यासाठी अजुन एक छान पौष्टिक पदार्थ
*****
क्रमवार कृती:
१. स्वीट पोटॅटो / भोपळा किंवा बटाटे / रताळी यातिल काहिही किंवा सर्व उकडुन / रोस्ट करुन घ्या. थंड झाल्यावर साले काढुन पोटॅटो मॅशरने मॅश करा किंवा किसणीवर किसुन घ्या. तुकडे / गुठळ्या राहु देऊ नका.
२. यात चवीला मिठ आणि जिरेपुड घालुन घ्या नीट मळा.
३. मिश्रणात आता शिंगाड्याचे पिठ / उपवासाची भाजणी / वरीचे पिठ घाला. पिठ घालताना एका वेळेस थोडे थोडे घाला - अगदी जस्ट सगळं मिश्रण एकत्र येऊन मऊ गोळा होण्याइतपतच. हे मिश्रण हलकेच मळुन घ्या. त्याचे २-४ भाग करा.
४. ओट्यावर थोडे पिठ भुरभुरवुन त्यावर एक भाग अगदी हलके मळुन त्याची अंगठ्याऐवढी जाड (साधारण दीड सेमी व्यासाची) सुरनळी बनवा (गोळा रोल करा). सुरीच्या पात्याला पिठ लावुन या सुरनळीचे इंच रुंदीचे तुकडे करा.
५. एका पिठ भुरभुरवलेल्या ट्रे मधे हे तुकडे वेगवेगळे मांडुन ठेवा. एकावर एक ठेवलेत तर चिकटतिल. उरलेल्या गोळ्यांच्या अश्याच सुरनळ्या करुन तुकडे करुन घ्या.
६. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. उकळत्या पाण्यात न्यॉकीचे गोळे एकावेळेस थोडे थोडे घाला...गोळे एकाच लेयर मधे असायला हवेत.. एकावर एक आले तर चिकटतिल. न्यॉकी आधी तळाला बसतिल पण लगेच मिनीटभरात पाण्यावर तरंगायला लागतिल. तरंगायला लागताच न्यॉकी चाळणीवर काढुन घ्या.
७. गरम गरम न्यॉकी खा. किंवा नॉनस्टीक पॅनवर किंचित साजुक तूप टाकुन खरपूस परतुन घ्या. किंवा तुम्हाला आवडेल तशी दह्या बरोबर, ककडी बरोबर खा
मी कोथिंबीर पेस्टो बरोबर खल्ली
कोथिंबीर पेस्टो:
८. चिरलेली कोथिंबीर, भिजलेले काजु आणि लाल मिरच्या, आल्याचा तुकडा, लिंबाचा रस, मिठ, साखर, जिरे मिक्सर / चटणी ग्राईंडर मधे टाका. थोडे तेल घालुन भरड वाटुन घ्या आणि न्यॉकी बरोबर खा नुसताच खायला पण मस्त लागतो हा पेस्टो
१. स्वीट पोटॅटो / भोपळा यांना जास्त पानी असेल तर एखादा बटाटा कुस्करुन घालता येइल.
२. न्यॉकी उकडलेली असल्यामुळे बरिच पौष्टिक आहे
३. न्यॉकी करताना मिठ / जिरे घातले नाही तर न्यॉकी गोड दही-साखर / दुध याबरोबर पण खाता येइल
४. मी स्वीट पोटॅटो आणि वरी चे पिठ व थोडी उपवासाची भाजणी वापरली आहे. बटाट्याचे / साबुदाण्याचे पिठही वापरता येइल बहुतेक.
५. कोथिंबीर पेस्टो ऐवजी साधी कोथिंबीर-मिरची - नारळाची चटणी पण छानच लागेल.
६. या न्यॉक्या उपासासाठी करायच्या नसतिल तर उपासाच्या पिठांऐवजी मैदा वापरता येतो
मस्त, वेगळाच प्रकार.
मस्त, वेगळाच प्रकार.
वर्षाचा प्रश्न मलाही पडलाय.
वर्षाचा प्रश्न मलाही पडलाय. सांगा ना. पोराच्या डब्ब्याला अजून एक ऑप्शन
तुम्ही केलेली डिश म्हणजे अफलातून चवीची असणारच. थँक्स फोर रेसीपी.
सही आयडिया.
सही आयडिया.
आत्ताच करुन गट्ट्म केले मस्त
आत्ताच करुन गट्ट्म केले
मस्त रेसिपी.
पुढच्या न्योक्यांना हसण्याचा चान्स दिला नाही 
लाजोमावशीने दिलेली रेसिपी चुकून लेकीच्या नजरेस पडल्यावर 'आज हेच कर' अशी मागणी झाली. ( तरी बरं तुझ्या बाकीच्या कठिण रेसिप्या तीला दिसल्या नाहीयेत कधी. )
इतक्या सोप्या रेसिपीत पण मी चुक केली. पहिला घाणा पाण्यात एक मिनीटाऐवजी चुकून जरा जास्त वेळ ठेवला आणि सगळ्या न्योक्या हसायला लागल्या
एकदम भारी! खरचं खुप क्रिएटिव
एकदम भारी! खरचं खुप क्रिएटिव डिश आहे,
ही अशी क्रिएटीव्ह लोकं फक्त
ही अशी क्रिएटीव्ह लोकं फक्त फुड नेटवर्क वगैरेवर दिसतात असा समज होता माझा! ( म्हणजे तू आता खरंच जा मास्टरशेफला)
किती भारी आहेस तू!!
बस्के +१. खरंच भारी आहेस तू.
बस्के +१. खरंच भारी आहेस तू.
नीट वाचली की ही रेसिपी मस्त
नीट वाचली की ही रेसिपी मस्त आहे असं वाटतंय....त्यातल्या त्यात रताळं मला इतर प्रकारांत आवडत नाही पण बटाट्यापेक्षा रताळं खालेल्लं चांगलं असं म्हणतात तर तो खपवायला पण ही युक्ती चांगली आहे..
फक्त तो को चा पेस्तो फार टेम्प्टिंग वाटत नाहीये...
(सॉरी थोडं वैट दिसत असेल पण ती पाकृ समहाउ छान लागेल असं वाटत नाहीये) कदाचीत काही जगप्रसिद्ध पेस्टोकॉम्ब्पोपुढे हे रूचत नसेल...
पण एकंदरीत मस्त प्रकार...आईला सांगून पाहाते फोनवर..तिला श्रावणात थोडं व्हेरिएशन करता येईल....:)
जबरी !
जबरी !
बस्के +१. रताळ्याची न्योकी
बस्के +१.
रताळ्याची न्योकी करुन बघेन.
इथे पाण्यात उकळणं अभिनव अन
इथे पाण्यात उकळणं अभिनव अन हेल्दी वाटलं.>>>>>>> same here lajo....... मला पण तळण्यापेक्षा उकडायचय हे बघूनच जास्त आनंद झाला.
श्रावणातलं व्हेरिएशनसाठी वेका+१. 
चतुर्थीला करून बघणेत येइल
परत एकदा धन्यवाद @ वर्षा आणि
परत एकदा धन्यवाद
@ वर्षा आणि चिन्नु... न्यॉकी डब्यात द्यायची असेल तर तुपावर खरपुस परतुन द्या. सोबत चटणी / दही वेगळे द्या.
@ सावली... धन्यवाद गं, लग्गेच करुन बघितल्याबद्दल
@ बस्के... थॅंक्यु
@ वेका... पेस्टो करायलाच पाहिजे असे नाही.. तरी करुन बघायला हरकत नाही... आवडेल तुम्हाला... उपास नसेल तर यात लसूण सुद्धा घालता येइल
भोपळा आवडत असेल तर त्याची न्यॉकी करुन बघा.
@ टोकु...
_________/\___________ अजुन
_________/\___________
अजुन काय लिहु बोल तुच.
मस्तय. हे पण करुन बघणार. (पण
मस्तय. हे पण करुन बघणार. (पण उपवास नाही करणार !)
मस्तच ! नक्की करणार
मस्त. तळण्याएवजी बेक करुन
मस्त. तळण्याएवजी बेक करुन बघायला पाहिजे (हेल्थी ओप्शन)
लाजो, अतिशय टेम्टिंग
लाजो,
अतिशय टेम्टिंग दिसतायेत.. तुझ्या क्रिएटिव्हिटीला सलाम !
मस्त रेसीपी.....आवडली लाजो
मस्त रेसीपी.....आवडली
लाजो ह्यात राजगिर्याचं पीठ वापरता येईल का? ते बाईंड होईल की नाही शंका आहे मला.
परवा चतुर्थीला करुन पाहिली ही
परवा चतुर्थीला करुन पाहिली ही रेसिपी. शिंगाडा पीठ कमी घातलं गेल्यामुळे काही न्योक्या विरघळल्या. पण नंतरचा घाणा मस्त झाला. खूपच छान आणि सोपी रेसिपी... दर उपासाला करणार.
मस्त झाली न्योकी. मी
मस्त झाली न्योकी.
मी बटाट्याची केली. बाइन्डिन्गला उपासाची भाजणी. नंतर शॅलो फ्राय करताना तूपावर जिरं-मिरची घातली, मग न्योक्या घालून परतलं. बरोबर दही आणि काकडी घेतली.
उपासाचा वेगळा पदार्थ झाला. धन्यवाद.
बस्के +१११११११११११
बस्के +१११११११११११
Pages