जिम्नॅस्टीक्स

Submitted by मंजूडी on 28 July, 2012 - 07:51

नेत्रसुखद आणि चित्तवेधक असा जिम्नॅस्टिक्स हा खेळ ऑलिंपिक्समधे तीन प्रकारात खेळला जातो - आर्टीस्टीक जिम्नॅस्टीक्स, रीदमिक अर्थात् तालबद्ध जिम्नॅस्टीक्स आणि ट्रॅम्पोलिन.

१. आर्टीस्टीक जिम्नॅस्टिक्स

- ऑलिंपिकमध्ये आर्टीस्टीक जिम्नॅस्टीक्स या खेळाचा अंतर्भाव सर्वप्रथम १९२४ साली केला गेला. यामध्ये पुरुषांसाठी वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा खेळवल्या गेल्या.

- त्याच्या पुढच्याच ऑलिंपिकमध्ये म्हणजे १९२८ साली महिलांसाठीही जिम्नॅस्टीक्सच्या सांघिक स्पर्धा खेळवल्या गेल्या, परंतु महिलांना आपल्या वैयक्तिक कामगिरीसाठी पदक जिंकण्याच्या संधीसाठी १९५२ साल उजाडावे लागले.

- यंदा लंडन ऑलिंपिकमध्ये आर्टीस्टीक जिम्नॅस्टीक्ससाठी १९२ प्रतिस्पर्ध्यांमध्ये १४ सुवर्णपदकांसाठी स्पर्धा रंगणार आहे.

-या पारंपरीक जिम्नॅस्टीक्स प्रकारामध्ये पुरुषांना फ्लोअर एक्सरसाईझ, पोमेल हॉर्स, रोमन रींग, वॉल्ट, पॅरलल बार आणि हॉरीझाँटल बार या सहा साधनांवर आपले कौशल्य सादर करायचे असते तर महिलांना फ्लोअर एक्सरसाईझ, बॅलन्सिंग बीम, वॉल्ट आणि अनईव्हन बार या चार साधनांवर आपले कौशल्य दाखवायचे असते.

- वैयक्तिक कामगिरीसाठी या प्रत्येक साधनासाठी पुरुषांसाठी सहा व महिलांसाठी चार स्पर्धा, सर्व साधनांवर आपले अष्टपैलुत्व सिद्ध करण्यासाठी पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी एकेक स्पर्धा आणि सांघिक कामगिरीसाठी पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी स्पर्धा अश्या तब्बल चौदा स्पर्धा यंदा खेळवल्या जातील.

२. रीदमिक जिम्नॅस्टीक्स

- ऑलिंपिकमध्ये केवळ महिलांसाठी खेळवला जाणारा रीदमिक जिम्नॅस्टीक्स हा एकमेव खेळ आहे.

- १९८४ साली लॉस अ‍ॅजेलिस ऑलिंपिकमध्ये रीदमिक जिम्नॅस्टिक्स या खेळाचा अंतर्भाव सर्वप्रथम केला गेला.

- यंदा लंडन ऑलिंपिकमध्ये रीदमिक जिम्नॅस्टीक्ससाठी ९६ प्रतिस्पर्ध्यांमध्ये वैयक्तिक आणि सांघिक अश्या २ सुवर्णपदकांसाठी स्पर्धा रंगणार आहे.

- १३ मीटर X १३ मीटर च्या चौरसात खेळाडूला संगीताच्या तालावर हातात साधन घेऊन आपले कौशल्य सादर करायचे असते. या सादरीकरणादरम्यान हातातील साधन सतत हलते राहिले पाहिजे ही एक बारकीशी अट असते.

- हूप, बॉल, रीबीन आणि क्लब ही चार साधने या खेळासाठी वापरली जातात.

३. ट्रँपोलिन

- २००० सालच्या सिडनी ऑलिंपिकमध्ये ट्रॅंपोलिन हा खेळ सर्वप्रथम खेळवला गेला.

- या खेळामध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येक देशाच्या संघात दोन पुरुष आणि दोन महिला खेळाडूंचा समावेश असतो.

- १०० स्टीलच्या स्प्रिंगा असलेल्या आणि केवळ ६ मिमि. जाडीच्या पातळ पट्ट्यांपासून बनवलेल्या ५.०५ मीटर लाम्ब आणि २.९१ मीटर रुंद गादीवरून १० मीटर उंचीपर्यंत उडी मारत खेळाडुला आपले कौशल्य सादर करायचे असते.

- शरीराचा तोल सावरत उडी मारताना हवेमध्ये एक, दोन आणि तीन समरसॉल्ट (सोप्या भाषेत कोलांटीउडी) घेताना खेळाडूचे कसब पणाला लागते.

जिम्नॅस्टीक्सच्या या एकूण तीन प्रकारात मिळून तब्बल ३२४ स्पर्धक सहभागी होणार आहेत. सर्व स्पर्धा नॉर्थ ग्रीनविच अरीना येथे पार पडणार आहेत. या सर्व स्पर्धा आपल्यासाठी नक्कीच मनोरंजक आहेत तेव्हा, नक्की बघा!

मूळ माहिती :
१. http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/71...
२. http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/73...
३. http://www.london2012.com/mm/Document/Publications/General/01/25/61/06/G...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, http://www.london2012.com/schedule-and-results/ इथे मिळेल ही माहिती . घड्याळाच्या चिन्हाच्या शेजारी लंडन्/माय टाइम असे दोन पर्याय आहेत. त्यातला माय टाइम निवडा. तसंच सिंगल डे, लिस्ट हे पर्याय निवडा.

सांघिक फेर्‍या इथे बघायला मिळतील - www.youtube.com/watch?gl=IN&hl=en&clint=mv-google&v=2LLOQhQGUEQ

स्त्रिया आणि पुरुष दोन्हींमध्ये अमेरीकेचा संघ जोरदार मुसंडी मारतो आहे. वरील लिंकमधील चायनाच्या संघातील मुलींचे बॅलन्सिंग बीमवरचे सादरीकरण लक्षपूर्वक बघा. चित्तवेधक हालचालींचा सुखद प्रत्यय.

गेल्या वेळी चायनाने जिंकलेलं गोल्ड मेडल अमेरीकन महिलांनी ह्यावर्षी खेचून आणलं!. गेल्यावेळी त्यांची एक सदस्य (मला नाव आठवत नाहीये) बीमवरून लँड होताना पडली आणि त्यांचं गोल्ड गेलं. चायनीज महिला यंदा चौथ्या स्थानावर घसरल्या..

पुरूषांची वैयक्तिक जिमनॅस्टिक फायनल पहातय का कोणी ? जबरी सुरु आहे.. !!

दोन जपानी आघाडीवर आहेत. खरतर अमेरीकन लेयवा (?) पण मस्त करतोय फक्त त्याचा बीम परफॉर्मन्स जरा गंडला आणि तो मागे पडला.. बाकीचे तीनही सही केलेत त्याने.

फायनली तानाका सोडून दुसर्‍या जपान्याला सुवर्ण ! त्याची सगळी लँडीग्ज केव्हडी स्टेबल होती !!!
अमेरिकन लेवयाने पण कांस्य गाठलेच. बीम नंतर चारही प्रकार तुफान केले !!

पुरुषांसाठी बीम? Uhoh
तुला पोमेल हॉर्स म्हणायचं असावं पग्या.. Happy

मी उचिमुराचा वॉल्ट परफॉर्मन्स पाहिला फक्त, आणि आज रीझल्ट बघता तोच त्यात पहिला आलाय Happy म्हणजे मला नशिबाने उच्च परफॉर्मन्स बघायला मिळाला.

मंजू हो.. मी नंतर वाचले नियम.. Happy

म्हणजे मला नशिबाने उच्च परफॉर्मन्स बघायला मिळाला. >>> Happy कालचे बरेचसे परफॉर्मन्स उच्च होते ! बरेच जण पोमेल हॉर्सवरच गंडले जरा.. मुकूंद किंवा इतर जाणकारांनी जरा डिटेलमध्ये लिहा बरं प्रत्येक प्रकाराबद्दल.

हे खरंच आहे-
Gymnastics-has athleticism overtaken artistry and joy?

पूर्वी कसे हलके, नाजूक, लवचिक खेळाडू असायचे. आता धटिंगण असतात. फ्लोअर एक्झरसाईजला दणाद्द्ण आवाज येतो पायांचा. Proud

कालच जिम्नॅस्टिक मिस केलं बहुतेक त्यामुळे आज अमेरिकेन टीमच्या गॅबी आणि अ‍ॅलीच का होत्या फक्त हे लक्षात आलं नाही. जॉर्डिन आणि आणखीन एक अ‍ॅडियन्समध्ये बसलेल्या दिसल्या. त्या एलिमिनेट झाल्यात का?

सायो, जॉर्डीन टीम चॅम्पियनशिपमध्ये होती. इंडिविज्युअलच्या फायनल राऊंडला पोचलेल्या २४ जणींत डग्लस आणि अलेक्झांड्रा या दोघीच अमेरीकन होत्या.

लोला, खरंय Happy लेव्हल ऑफ डिफिकल्टी वाढली पण आर्टीस्ट्री हरवत चालली आहे. म्युझिक चालू असून देखिल पायांचा आवाज येतो. शिवाय ऑलिंपिकसारख्या पातळीवर खेळतानाही धबाधब पडतातही Sad