माझी समीक्षा ..

Submitted by कमलाकर देसले on 27 July, 2012 - 09:08

माझी समीक्षा ..

का बरे घेतोस देवा एवढी माझी परीक्षा ;
शिकवण्यासाठीच देतो ,की मला तू रोज शिक्षा ?

कोसळू दे पर्वतांचे मेघ आकाशातले. पण-
बाणु दे अंगात माझ्या या धरित्रीची तितिक्षा..

हे मला दे ,ते मला दे. मागणे जमणार नाही ;
कर्ण होणारा कधी का ,मागतो रे सांग भिक्षा ..

पाप-पुण्याचे रसायन मिसळले माझ्या मनीही;
पण विवेकानेच करतो रोज मी माझी समीक्षा..

मी जिथे आहे तिथे उमलेल,गंधाळेल.ऐसी -
जीवना द्यावीस मजला जीवनाची तूच दिक्षा..

गुलमोहर: 

छान!

वा देसले साहेब
मस्त.... कवाफी खूप आवडली. .....खासकरून तितिक्षा हा काफिया
शेवटचे तीन शेर जास्त आवडले त्यातही 'भिक्षा' सर्वोत्तम वाटला
......
......

रसायण = रसाय असे हवे
(मला माहिती आहे ही टंकलेखनातली त्रुटी असणार ..तरी आपलं सांगून ठेवलेलं असतं बरं नै का ?)

सरजी, सॉरी
खरे तर असे व्हायला नको (च ). मला आवडलं तुम्ही लक्षात आणून दिलं . बदल केलाय . तुमच्या प्रतिक्रीयेतून मी तुम्हाला नेहमी "महेसूस" करतो . मला तूम्हाला भेटायला आवडेल . त्यातही तुम्ही माझ्या पांडुरंगाच्या गावी रहातात . बघूया . कधी येतो योग . तुका म्हणे येथे न चले तातडी l प्राप्त काळ घडी आल्याविण ll

आणि हो वैभवजी , टंकलेखनाच्याच कशाला अशाही लिहितांना चुका होऊ शकतात आमच्या . पायाभरणी करणारं आमचं प्राथमिक शिक्षण म्हणजे नुसता आनंद होता . माध्यमिकला आल्यावर भाषेचे गांभीर्य कळू लागले . त्यामुळे ..........

वाह्!

हे मला दे ,ते मला दे. मागणे जमणार नाही ;
कर्ण होणारा कधी का ,मागतो रे सांग भिक्षा ..

पाप-पुण्याचे रसायन मिसळले माझ्या मनीही;
पण विवेकानेच करतो रोज मी माझी समीक्षा..

आवडले!

देसलेसाहेब आधी मला सर म्हणायचं बंद करा बघू .....:) अहो मी तुमच्या मुलाच्या वयाचा असेन

[अवलोकनातला तुमचा फोटो पाहून केलेला केवळ अंदाज आहे हा .....!! आता प्लीज माझा फोटो मागू नका बुवा नाहीतर माझा हा अंदाज वर-वरून किती फसवा आहे याचा तुम्हाला अंदाज येईल वगैरे !! (अहो काय सांगू देसले साहेब ...मला माझ्या प्रामाणिकपणामुळे त्या बागेश्रीसारखा मधुबालाचा फोटोपण लावता येत नाही हो माझ्या अवलोकनात!!!:( ) ].....;)

अहो मी तुमच्या मुलाच्या वयाचा असेन<<<

आता प्लीज माझा फोटो मागू नका<<<

नाहीतर वडिलांच्या वयाचा म्हणावे लागेल Proud Light 1

(अवांतर - गझल वाचून प्रतिसाद देतोच)

वरील दिलखुलास प्रतिसादकान्चा मी आभारी आहे (:राग:)

____

बेफीजी :नाहीतर वडिलांच्या वयाचा म्हणावे लागेल >>>>> Rofl + _/\_ साष्टांग अगदी !!!!

मी जिथे आहे तिथे उमलेल,गंधाळेल.ऐसी -
जीवना द्यावीस मजला जीवनाची तूच दिक्षा.<<<

सुंदर खयाल

शेवटून आधीच्या शेरातील दोन्ही ओळी स्वतंत्रपणे आवडल्या

=================

का विपू सार्‍या सदस्यांच्या अशा अगदी रिकाम्या
कोण झाला बॅन जो फिरवायचा प्राचीन रिक्षा Light 1

-'बेफिकीर'!

बेफीजी मला आपल्या वरील शेरावर पर्याय सुचवावा वाटतोय

तो असा की.........

खाली तुम्ही "-बेफिकीर" असे जे लिहिले आहे ते खोडा ...वरील शेरातील प्रश्नाला उत्तर दिल्यासारखे वाटते

(उगाच कुणाचीतरी बदनामी आपण कशाला करा नै का ;)?)

त्यापूर्वी दिवा आहे वैवकु, विठ्ठलभक्तांच्या निरागस नजरेला तो दिसणार नाही हे मान्य, पण सांगणे कर्तव्य आहे, नाही का?

बाकी, बदनाम या शब्दाची व्याख्या मी निर्माण केलेली आहे, त्यामुळे अधिक बदनाम होणे संभवत नाही Lol