बॅडमिंटन

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 03:14

- ९ दिवस, १७२ खेळाडू, ५ सुवर्ण पदके

- ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटनचा समावेश १९९२ साली झालेल्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये प्रथम केला गेला.

- ऑलिम्पिक मध्ये वापरले जाणारे फुल बनविण्यासाठी लागणारी पिसे गूज पक्ष्याच्या डाव्या पंखाची असतात.

- १३.४ मीटर लांबीच्या मैदानात मध्यभागी जाळी लावलेली असते.

- दुहेरीच्या सामान्यांना पूर्ण मैदान वापरले जाते तर एकेरीच्या वेळेस आतील बाजूस असलेली रेष वापरली जाते.

- वापरण्यात येणार्‍या फुलास १६ पाकळ्या असतात आणि ते प्रचंड वेगात जाऊ शकते. ४०० किमी प्रति तास इतकाही वेग हे फुल गाठू शकते.

- मुख्य उद्देश जाळीच्या पलीकडे फुल मारून प्रतिस्पर्धी ते परत आपल्याकडे मारू शकणार नाही हे साध्य करण्याचा असतो.

- प्रतिस्पर्धी फुल परतवू न शकल्यास १ गुण मिळतो.

- मारलेले फुल जाळीत आडकल्यास किंवा मैदानाच्या बाहेर गेल्यास गुण प्रतिस्पर्ध्याला मिळतो.

- प्रत्येक गुण सर्व्हिस करून सुरु होतो. सर्व्हिस करणार्‍या खेळाडूने गुण गमावल्यास प्रतिस्पर्धी खेळाडू पुढच्या गुणाची सुरुवात करतो.

- प्रत्येक सामना तीन गेम्सचा असतो. २१ गुण आधी मिळवणारा खेळाडू तो गेम जिंकतो. २ कमीतकमी गुणांच्या फरकाने गेम जिंकणे आवश्यक आहे. २९ - २९ अशी बरोबरी झाल्यास पुढचा गुण मिळवणारा खेळाडू गेम जिंकतो.

- पदकांसाठी एकूण पाच स्पर्धा आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी.

- एकेरी आणि दुहेरी साठी स्पर्धकांचे गट केले जातात. प्रत्येक खेळाडू गटातील सर्व खेळाडूविरुद्ध एक सामना खेळतो.

- १६ गटांतील विजेती बाद फेरीत जातात.दुहेरीत ८ सर्वोत्तम जोड्या बाद फेरीत जातात.

- बाद फेरीत सामना हरल्यास स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर.

- बाद फेरीतील पहिले चार स्पर्धक आणि चार जोड्या उपांत्य फेरीत खेळतात. उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत खेळतात तर पराभूत स्पर्धक कांस्य पदकासाठी सामना खेळतात.

स्पर्धक -

चीनचे वर्चस्व ह्या खेळात आहे. पण त्यांना इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरियामधील स्पर्धकांचे तगडे आव्हान आहे. तसे भारतातील खेळाडूंचेही आव्हान आहे.

लीन डान हा चीनचा पुरुष खेळाडू संभाव्य विजेता आहे. भारतात तर्फे सायना नेहवाल, पी.कश्यप हे एकेरीत तर अश्विनी पोनाप्पा - ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू - ज्वाला गुट्टा ह्या जोड्या दुहेरीत आहेत. एखाद्या पदकाची अपेक्षा नक्कीच भारताला ठेवता येईल.

मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/50...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता कांस्य पदकासाठी लढत... Sad तीसुद्धा परत चिनी खेळाडू बरोबरच... आणि सायनाला १३ नंतर एकही गुण मिळाला नाही... वँगनी सलग १० गुण घेतले..

सायनाला १३ नंतर एकही गुण मिळाला नाही... वँगनी सलग १० गुण घेतले.. >> मी तेच तर म्हंटले ना... मॅच सोडल्या सारखी खेळतेय म्हणून... Sad असो

वँगचं कोर्ट कव्हरेज भारी होतं. शिवाय ती वर्ल्ड नं. १ आहे, वर्ल्ड चँपियनशिपची विजेती आहे.

तरीही, मॅच ३ गेम्सची व्हावी अशी फार्फार इच्छा होती.

कांस्यसाठी शुभेच्छा.. तिथे सुद्धा टफ आहे प्रतिस्पर्धी. आधीच्या ६ सामन्यात साईना फक्त २ वेळा जिंकली आहे तिच्याविरूद्ध Sad तिला कांस्य मिळावे अशी सदिच्छा!!

वाइट्ट वाटतंय.
वँगविरुद्धच्या सहा सामन्यांत आतापर्यंत सायना एकदाही जिंकलेली नाही. पण दुसर्‍या उपांत्य फेरीतल्या दोघी चीनी खेळाडूंना तिने याआधी हरवलेले आहे. तेव्हा उपांत्य फेरीच्या निराशेतून बाहेर पडून सायनाने कांस्यपदक जिंकावे अशी शुभेच्छा.

वुमेन सिंगल फायनल भारी झाली !! वँगने दुसर्‍या गेममध्ये जोरदार कमबॅक केला ! तिसरा गेमपण एकदम नेक टू नेक सुरु होता.. पण ऐनवेळी लीने चुका टाळत बाजी मारली..
वँग हरल्याने मला सुप्त आनंद झाला.. Happy आता मेडल सेरेमनी असेल.

फायनल अप्रतिमच झाली.. वँगने प्रतिकार करत दुसरा सेट जिंकला तेव्हाच सामन्यातील चुरस वाढली होती. पण मधेच सेरेना आणि शारापोव्हचा एकतर्फी सामना पहावा लागल्याने तिसर्‍या सेट मधली सुरवातीची रंगत मिसली. शेवटच्या काही रॅली मधे वँग दमल्यासारखी वाटली आणी तिथेच लीने बाजी मारली.

वँगचे दुर्दैव... सायनाला कांस्य.

केवळ तांत्रिकतेवर मिळालेले मेडल. त्यामुळे आनन्द नाही. सायना जिंकली असती असे वाटत नाही हे कटु असले तरी सत्य आहे. सेलेब्रेशन अपराधी वाटते... उलटे झाले असते तर काय प्रतिक्रिया असत्या ?

बाळू जोशी.. कटू सत्य आहे खरे... पण सेमी पर्यंत पोहचणे हे ही तितकेच महत्वाचे होते Happy

सेमी पर्यंत पोहचणे हे ही तितकेच महत्वाचे होते >>> अनुमोदन. सेलिब्रेशन करू नका पण सायनाला कमीही लेखू नका !

साईनाने मुलाखतीत सांगितले की तिची प्रतिस्पर्धी थकल्यासारखी वाटत होती त्यामुळे नंतर तिने केवळ लॉग रॅलीजवर जोर द्यायला सुरुवात केली. गोपीचंदनेही सांगितले की सेमी-फायनलमध्ये साईनाने वँगच्या वेगाने खेळ करण्याचा प्रयत्न केला जो चुकला. पण त्यातून धडा घेत साईना व्यवस्थित खेळत होती आणि नक्कीच जिंकू शकली असती. पहिल्या गेममध्ये तीने शेवटी शेवटी त्याची चुणूक दाखवली होतीच. अटीतटीचा सामना होऊन जिंकालेली बघायला आवडले असते एवढे मात्र नक्की

केवळ तांत्रिकतेवर मिळालेले मेडल >> मॅच संपेपर्यंत फिटनेस टिकवणंपण तेव्हढंच महत्वाचं असतं जे साईनानं केलं. शिवाय सेमीजपर्यंत आली (तेही अगदी सहजरीत्या) तेही काही कमी नाही...

<सायना जिंकली असती असे वाटत नाही हे कटु असले तरी सत्य आहे>
बाजो, कांस्यपदकासाठीच्या सामन्यातल्या प्रतिस्पर्धी खेळाडूशी आतापर्यंत झालेल्या सामन्यांतले अलीकडचे दोन सायनाने जिंकले होते. त्यामुळे सायना जिंकली नसती हे जे तुम्हाला वाटतेय , तसेच वाटायला हवे असे नाही. सामना पाहता आलेला नाही. पण पहिल्या गेमचा २१-१८ हा गुणफलक दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमधला खेळ दाखवतो. त्यामुळे तुमची कमेंट अन्यायकारक वाटली. अपराधी का वाटावे? सायनाने तिच्या प्रतिस्पर्ध्याला जखमी केले होते का? सगळ्याच सामन्यांमध्ये नशीबाचा काही ना काही भाग असतोच. तो कधी लाइन्सकॉलच्या रूपात येतो. कधी आणखी कसा.

काल बॅडमिंटनचा पुरुष दुहेरीचा एक सामना पाहिला. जिंकलेल्या डॅनिश खेळाडूंच्या अश्रूपातात कोर्ट धुऊन निघाले. त्यामुळे वाटले की चला एक तरी सुवर्णपदक चिनी तावडीतून सुटले. मग कळले की हा उपांत्य फेरीचा सामना होता.

अपराधी का वाटावे? सायनाने तिच्या प्रतिस्पर्ध्याला जखमी केले होते का? सगळ्याच सामन्यांमध्ये नशीबाचा काही ना काही भाग असतोच. तो कधी लाइन्सकॉलच्या रूपात येतो. कधी आणखी कसा.>>>

मयेकर + १००.
सायना जरी चौथ्या नंबरावर आली असती तरी तिचा जयजयकारच केला असता. वयाच्या केवळ बावीसाव्या वर्षी दुसरे ऑलिंपिक खेळणे, सेमीफायनलपर्यंत पोचणे, खेळातील नंबर १ ला झुंजवणे ह्या सोप्या गोष्टी नाहीत. महाराष्ट्र टाईम्समधे खूप छान प्रकारे सायनाच्या पदकाबद्दल लिहिले आहे :

सायना नेहवाल विजयी झाल्याची घोषणा होताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला . त्यात सायना नेहवाल आणि झिन वँग या दोघांच्याही खेळाला प्रेक्षकांनी दाद दिल्याचे लक्षात येत होते . सायनाने हात वरकरून प्रेक्षकांना अभिवादन केले . तिच्या चेह - यावर आनंद होता मात्र तो सामना खेळून मिळालेल्या विजय नसल्याने तिने अगदी चेह - यावर शांत भाव ठेवले होते आणि एखाद्या महान खेळाडूला शोभेल अशाच पद्धतीने लोकांचे अभिवादन स्वीकारले .

Pages