Submitted by deepac73 on 26 July, 2012 - 12:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
वांग न भाजता केलेल म्हणून झटपट भरीत म्हटले आहे
१ भरताचे वांगे
१ कान्दा बारीक चिरून
१ मिरची बारीक चिरून (चवीनुसार)
२-३ लसूण पाकळ्या
२ चमचे तेल
२-३ चमचे दाण्याचे कूट
२-३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
१ चमचा तिखट
चवीनुसार मीठ, हिन्ग हळद
क्रमवार पाककृती:
१. वांग्याचं साल सुरीने किन्वा Peeler ने सोला आणि बारीक चिरून घ्या.
२. कढईत तेल गरम करून कान्दा, मिरची आणि लसूण परतून घ्या.
३. आता वांग घालून एकत्र करा आणि झाकण ठेवून १ वाफ काढा. पाण्याचा १ हबका मारा.
४. चवीनुसार, तिखट, मीठ, हिन्ग हळद घालून शिजू द्या.
५. शेवटी कोथिंबीर आणि दाण्याचे कूट घालून २-३ मिनीटे शिजू द्या.
भाकरीबरोबर गरम वाढा
वाढणी/प्रमाण:
१ मध्यम वांग्याचं भरीत २-३ जणान्साठी
माहितीचा स्रोत:
माझे उद्योग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाकृ चांगली वाटतेय, पण फोटो
पाकृ चांगली वाटतेय, पण फोटो कुठाय?
आणि असं वांगं बारिक चिरून घेतलं म्हणजे भाजीच झाली की, पटकन शिजतं का?
चिरण्याऐवजी जर साल काढून मिक्सरवर फिरवून घेतलं तर?
ए ३० मि मधे भरीत पण होइल अगं!
ए ३० मि मधे भरीत पण होइल अगं! (किंवा अरे
)
म्हणजे वांगं भाजायचा कंटाळा आला तर छान कल्पना आहे! भरीत भाकरी असे वाचुन पाणी सुटले पण तोंडाला !
मा.वे. मधे लवकर होईल असं
मा.वे. मधे लवकर होईल असं वाटतय. एकदा करून बघायला हवं.
भाजी नाही म्हटले कारण बाकी
भाजी नाही म्हटले कारण बाकी कृती भरीताची आहे